Submitted by bnlele on 15 April, 2012 - 12:11
दुश्काळग्रस्त महाराष्ट्रात पक्षांना वाचविण्यासाठी "एक घास पक्षाचा" ही अभिनव आणि सहृदई चळवळ जन्माला आली आहे.
परंतु सद्य स्थितित राजकीय "पक्षांतर्गत घडामॊडीच्या संदर्भात शब्द्छल करण्याचा मोहझाला तो असा:-
राजधानीतून सुटलं फर्मान-
हवास तू हवा इथे !
दूरस्थ पक्षि निघाला वेगे
धरून चोचित काडी गवताची.
मनात उठलं शंकांच वादळ,
हादरल घरटं अचानक वावटळ ?
क्षणि उडाला सैरावैरा पाचोळा,
नसता गाफिल नव्हता विरंगुळा.
कुटुंबियांची कां फिरली माथी-
चुकवून नजरा गुप्त खुणवती,
हात बांधुनी पोटांवरती -
अतृप्त आहे भूक सांगती.
कुरणं-शेतं मुक्त दिली चरेल त्याला,
संचय माझा - कां खुपला इतरांना?
दिला सदैव एक-एक घास प्रत्येकाला,
फर्मान कां अन् अवेळी कशाला?
वाटतय नक्कीच हवाय घास -
त्या मोठ्याच पक्षाला !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हां आता संदर्भ लागतोय
हां आता संदर्भ लागतोय