एप्रील मास येता, स्मरते तुझी जयंती
जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती II धृ II
कितवी तुझी जयंती,आम्हा न ज्ञात आहे
पण साजरी करावी,ऐसा प्रघात आहे
झोपेतल्यास जागे,करते तुझी जयंती II १ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती
बनतोय कार्यकर्ता,ज्याला न कामधंदा
सरसावतो स्वतःला,जमवावयास चंदा
दिसणार ती गचांडी,धरते तुझी जयंती II २ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती
कोणी मिरवणुकीची,करतो तयारी आहे
कव्वाल कोण यावा,ठरते सुपारी आहे
राखावयास शांती,झुरते तुझी जयंती II ३ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती
गुटखा कुणास लागे,लागे कुणास दारु
मच्छी-मटण विना तर्,जेवण नको विचारु
सिगरेट धुम्रवलयी,विरते तुझी जयंती II ४ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती
प्रज्ञा व शिल-करुणा,विसरुन आज आहे
जयभीम बोलण्याची,आम्हास लाज आहे
निर्वाण दिन पवेतो,पुरते तुझी जयंती II ५ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती
---डॉ.कैलास गायकवाड
महान नेत्यांचे आदर्श
महान नेत्यांचे आदर्श जपण्याऐवजी जयंत्या-पुण्यतिथ्यांचे निव्वळ उत्सव साजरे करण्याच्या प्रवृ्त्तीकडे पाहून मन विषण्ण होतं. तुमच्या कवितेत ही विषण्णता पुरेपूर उतरली आहे.
काळजाची कळ सांगणारी अप्रतिम
काळजाची कळ सांगणारी अप्रतिम कविता .
व्वा, कैलासराव!! खरीखुरी
व्वा, कैलासराव!!
खरीखुरी व्यथा मांडलीत...
सत्य परिस्थिती. छान रचना.
सत्य परिस्थिती. छान रचना.
आत्ताच थोपुवर वाचली........
आत्ताच थोपुवर वाचली........ छान आहे....वास्तवच आहे हे.....
बेशिस्त दिसली. त्यामागचा
बेशिस्त दिसली. त्यामागचा भाबडेपणाही दिसावा. पण कविता सुंदर.
छान
छान
डॉक्...किती विदारक सत्य
डॉक्...किती विदारक सत्य मांडलत तुम्ही!! प्रत्येक संवेदनशील मनुष्याच्या मनातील ही खदखद आहे.
>>महान नेत्यांचे आदर्श
>>महान नेत्यांचे आदर्श जपण्याऐवजी जयंत्या-पुण्यतिथ्यांचे निव्वळ उत्सव साजरे करण्याच्या प्रवृ्त्तीकडे पाहून मन विषण्ण होतं. तुमच्या कवितेत ही विषण्णता पुरेपूर उतरली आहे.
उकाकांच्या अभिप्रायात या रचनेचे सार उतरले आहे. आम्हा जवळजवळ सर्वांच्याच मनातले भाव.
धन्यवाद डॉक. हे सत्य सगळ्यांनाच उमगो ही आशा.
mastach !!
mastach !!
कविता वास्तव मांडतेय यात शंका
कविता वास्तव मांडतेय यात शंका नाही. मात्र पुढे गेलेल्यांनी मागच्यांचे बोट धरून रस्ता दाखवला तर ही परिस्थिती बदलेल असं वाटतं. आशावादाला जागा आहे.
जळजळीत सत्य मांडलय....
जळजळीत सत्य मांडलय.... जबरदस्त डॉक.... जियो..!!!
सुंदर रचना आवडलीच
सुंदर रचना
आवडलीच
खूप सुंदर................
खूप सुंदर................ जळजळीत वास्तव
जयभीम बोलण्याची,आम्हास लाज
जयभीम बोलण्याची,आम्हास लाज आहे>हे मात्र चुकीचे आहे
लहानपणी मराठीच्या पुस्तकात एक धडा होता,,,"महापुरुषांचा पराभव"...त्यात एक ओळ होती,,,,अनुयांया मुळे थोर महापुरुषांचा पराभव होतो...तुमची कविता वाचुन मला हेच आठवल....
कितवी तुझी जयंती,आम्हा न
कितवी तुझी जयंती,आम्हा न ज्ञात आहे
पण साजरी करावी,ऐसा प्रघात आहे
व्वा ! खरंच सुंदर शब्द-रचना !
फार आवडली.
फार आवडली.
सुंदर्... !!! आवडलीच!!
सुंदर्... !!!
आवडलीच!!
फक्त "जयभिम"चा उल्लेख टाळला
फक्त "जयभिम"चा उल्लेख टाळला असता तर सर्वसमावेशक व सार्वकालीक सत्यावर आधारित कविता बनली असती.