कविता

आठवण...!!

Submitted by नुतन्दे on 28 June, 2012 - 12:14

आठवण...!!

तुझी आठवण आली की
विचारांचे आभाळ मनात दाटते,
डोळ्यांत पाणी अन् ओठांन् वर्ती स्मित हास्य आणते...

सोबतचा एक-एक क्षण
हा नविनचं वाटायला लागतो,
तो फ़क्त प्रत्येक क्षणांणची आठवण देऊन
डोक्यात फ़क्त विचार ठेऊन जातो...

कारण; घालवलेले प्रत्येक क्षण हे सुख-दुखा:चे होते
तुझी आठवण आली कि, मन मात्र 'वेडे' होते....

कळत-नकळत मला तो क्षण हि आठवतो
मग मात्र तुझा तिरस्कार मनात दाटतो,
पानावलेल्या डोळ्यांनि ऊर भरुन येतो
अन् शेवटी केवळ " आठवण " हा एकच् शब्द ऊरुन जातो.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कथा कुणाची व्यथा कुणा

Submitted by shilpa mahajan on 28 June, 2012 - 08:27

.

कथा कुणाची व्यथा कुणा

पाणवठ्यावर पाणी भराया ,वाट फार दूरची
विहीर खणाया सुरु केली पण गती कासवाची
पाणी मिळते तरी ते ठरते संजीवन सर्वांचे
जल न मिळाले हरण जाहले माहीच्या प्राणांचे .

अगे भूमी ही नच तव कन्या, पोटी का धरलीस?
रथचक्रासम गिळून टाकण्या कर्ण का समजलीस?
दोष तुला मी देऊ कशी तू उगा नाही चिडलीस
मनुजाने तुज खोल छेदले, त्याने दुखावलीस.

माझी माही खेचून घेऊन राग तुझा का शमला?
तुला छेद देणारा माते सांग कुठे परि लपला ?
छेदून तुजला ,तशीच सोडून स्वस्थ घरी तो निजला

गुलमोहर: 

तरंगतळे

Submitted by भारती.. on 28 June, 2012 - 05:58

तरंगतळे
आत हलणार्‍या चित्रांगी प्रतिमांचा
अविश्वास वाटतो आताशा..

आता आपण फक्त निरखावे
मधले अंतर आणि आडवाटा
अचानक जवळ आणणार्‍या

मग यापैकी कशावरही न विसंबता
थोर व्हावे एकमेकांइतके.
अवकाश व्हावे एकमेकांचे .

शिल्लक रहातीलच आदिम आग्रह
जे कधी जपावेत समारंभाने.
कधी मोडावेत समारंभाने.

सारे गुंतवळे व्यापून एकच तरंगतळे.
निळ्या सहजतेने.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पडे उन्हात पाऊस..

Submitted by के अंजली on 28 June, 2012 - 04:45

वेळी अवेळी मनात
असा भेटतो पाऊस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

वारा पिंजारतो जसा
उगा ढगांचा कापूस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस

अशी आल्हादली माती
पोटी अत्तर सुवास
वर दाटूनी ढगांत
पडे उन्हात पाऊस

गुलमोहर: 

वारीच्या निमित्ताने (आषाढीचा सोहळा )

Submitted by अनिल तापकीर on 28 June, 2012 - 01:56

आषाढीचा सोहळा, आवडे मनाला |
जावे पंढरीशी, ध्यास हा जीवाला ||

संत सज्जनांनी, दावियेली वाट |
चालता पार, दुस्तर भवघाट ||

पंढरीचा देव, उभा विटेवर |
भक्तांसी भेटण्या, होतसे आतुर ||

एकमेका दोघे, भेटण्या आतुर |
धावती आषाढीला, सोडूनी घरदार ||

सासुरवाशीण लेक, ओढ माहेरची |
तयापरी गति, होई वारकऱ्यांची ||

मातेला तळमळ ,लेकीच्या येण्याची |
तैशीच अवस्था, माझ्या विठूरायाची ||

वाळवन्टी जमती, टाळमृदंग गर्जती |
नामाची महती, नाचुनिया गाती ||

जैसे जलामाजी, लवण विरघळती |
होता दर्शन, देवभक्त एक होती ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उधार हसणे हसतो

Submitted by निशिकांत on 27 June, 2012 - 10:43

मी उधार हसणे हसतो
नगदीत आसवे पुसतो
आप्तांच्या रेशिम गाठी
मी गळ्याभोवती कसतो

आयुष्य पोरके जगतो
त्वेषातच मी फरपटतो
मजला हे ठाउक नाही
प्रेमाला अंकुर फुटतो

अंगणी जरी तो फुलतो
मजसाठी सुगंध नसतो
केवड्यासवे असणारा
तो सर्पच माझा असतो

कंटकावरी मी निजतो
अन् वेदनेस पांघरतो
या जगास चिंता नाही
मी जगतो अथवा मरतो

तो तारा दुरून बघतो
अन् त्यात जरासे रमतो
दुर्दैव तोच का तारा
तुटतो अन् खाली पडतो

गजला मी जेंव्हा रचतो
का एक शब्द अडखळतो?
मी पुन्हा पुन्हा मिसरे ते
लिहिलेले वाचुन पुसतो

जो कोणी भाळी लिहितो
मी सवाल त्याला करतो
हा भेद भाव का देवा?
जगतो कोणी गुदमरतो

गुलमोहर: 

उद्या ( झब्बु )

Submitted by वर्षा_म on 27 June, 2012 - 06:34

मुळ कविता : http://www.maayboli.com/node/35965

=====================

एक नवे स्वप्न उद्यासाठी पडणार
तूझ्या कवितेला नवा चंद्र लाभणार
आतुरतेने पाहलीस वाट तू ज्या दिवसाची
तो दिवस उद्यावर येऊन ठेपणार..

अंतरमनामधे 'छबी' तिची 'वसवली' जाणार,
प्रेमाचे 'बोल' मग मनात साचत राहणार..
सरुन जातील काही दिवस वाट पाहत 'अंगठीची',
साखरपुड्याच्या बंधनात तुम्ही अडकणार..

नावाजलेल्या कविला 'शब्द' नाही सुचणार..
माबोवरी नवी कविता नाही पडणार..
बस्...'आज' अखेरचे लिहुन घे एकदाचे..
पुन्हा कधी कवितेचा विचार देखील नाही शिवणार..

ह्रुदयाचं काय तूझ्या, तिच्याभोवती 'फिरणार',

गुलमोहर: 

'आज....'

Submitted by किरण..... on 27 June, 2012 - 06:08

(आज 'तिचं' लग्न आहे....स्वत:ला किती अडवले तरी ही कविता लिहीली गेलीच....)

एक पातळ स्वन्र 'आज' अधुरे राहणार..
माझ्या कवितेतला चंद्र ढगा-आड जाणार..
आतुरतेने पाहिलेली वाट मी ज्या दिवसाची,
तो दिवस आज येऊन कुणा दुसर्‍याचाच होणार..

अंतरपाटामागे 'वरमाला' तिची 'फसवली' जाणार,
अष्टकांचे 'बोल' मग काळीज पोखरत राहणार..
रुसून जातील सात फेरे वाट पाहत 'जोडव्यांची',
मंगळसुत्राच्या बेडीत 'तो' गळा 'अबोल' होणार..

बडबडलेल्या जिभेला 'शब्द' नाही सुचणार..
अनुरागाच्या किड्यांना पंख नाही फुटणार..
बस्...'आज' अखेरचे भेटून येतो एकदाचे..
पुन्हा कधी तिला माझा विचार देखील नाही शिवणार..

गुलमोहर: 

मन जाते पंढरीला

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2012 - 06:08

मेघ सावळे सावळे
आले क्षितीजाच्या तटी
मना आठवे आठवे
माय भिवरेच्या तटी

वेध लाविते जीवाला
कसे साजिरे सगुण
विटेवरी ठाकलेले
परब्रह्म विलक्षण

हाकारितो जनालागी
प्रेम करुणा सागर
भक्तिसुखात नहा रे
यारे सारे सान थोर

तुका, ज्ञाना, नामदेव
येती दर्शनासी संत
त्यांजसवे वैष्णवांचे
थवे भजनात दंग

असा सोहळा रंगतो
एकादशी आषाढीला
तन जरि प्रपंचात
मन जाते पंढरीला.....

गुलमोहर: 

धनी पोहोचतील सुखे, गडी वाजवा नगारे

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 27 June, 2012 - 04:31

Pages

Subscribe to RSS - कविता