कविता

गंधार घेतले तू

Submitted by सांजसंध्या on 27 June, 2012 - 02:53

कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू
आईस रडवण्याचे, आभार घेतले तू

वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे
मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू

मातीत वेदना ही, का उगवते अजूनी
झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू

अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे
तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू

रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू

कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू

- संध्या

गुलमोहर: 

ए आई....तू बरोबर केलंस

Submitted by तनवीर सिद्दीकी on 26 June, 2012 - 23:14

ए आई....तू बरोबर केलंस

काही नाही गं...ए आई....तू बरोबर केलंस मला मारून..
मीच पापी ग या जन्मा येवून पण तुझे अभ्र हुकले असते

कसं होणार?..पुढे काय?..खूप प्रश्न सोबत झाले असते
हे अभागी पुण्यव्रण आजन्म तुझ्या ललाटी आले असते
पाळण्यात दिसती पाय माझे दिशा तेव्हाच ठरली असती
मी रडताना पाहणाऱ्या खूळखुळ्याचे मात्र कौतुक झाले असते

काही नाही गं...ए आई....तू बरोबर केलंस मला मारून..
मीच पापी ग या जन्मा येवून पण तुझे अभ्र हुकले असते

मी मुलगा असतो तर नवसाचे पेढे तुझे वाटूनही उरले असते
कर्ज माझ्या जन्म - बत्तास्यांचे मीच आमरण भरले असते

गुलमोहर: 

विनंती विठ्ठला

Submitted by shilpa mahajan on 26 June, 2012 - 15:02

विनंती विठ्ठला

देवशयनी एकादशी ही आली हो विठ्ठला
निजण्या आधी दोन घास हे खाऊन घ्या पोटाला.

कटीवरचे ते हात काढुनी क्षणभर पसरा पुढे
हातावरती आम्हा ठेवू द्या भाव भक्तीचे पेढे

आढेवेढे नकोस घेऊ तुज नाम्याची आण,
त्याच्यासंगे जेवलास तू, ठाऊक मजलागून .

कबिरासंगे न थकला तू शेले विणता विणता

गुलमोहर: 

रांगोळी

Submitted by आर्पित on 26 June, 2012 - 12:26

रांगोळी
OgAAAHtCndVaE3gMMXFt_HHUb56wSzYZlOk59UKDFGTrrxvufRVVldJiKwPvMKW__KvT1_73sW9nie9p5lw8N4s4SHMAm1T1UD6cmQ5gnPYxD5VV9_xqmOEFEdqZ.jpg

नविन कोरे रंग दुकानातून आणले
आणता आणता रंग आपापसात भांडले
सोडून पुड्या डब्यात भरल्या
भारता भारता थोड्या थोड्या सरल्या
पंढरी रांगोळी पायलीभर घेतली
रांगोळीची हौस म्हणून खिश्यांवर बेतली
ठिपके जोडून रांगोळी आखली
रंग भरताना मात्र कंबर वाकली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कालगती

Submitted by suneha on 26 June, 2012 - 04:47

माणसांच्या काँक्रीटी गर्दीत -
कडेला शिस्तीत उभी असलेली हिरवाई, कशीनुशी.
गतानुगतिकतेकडे, केविलवाण्या वेगाकडे
हताशपणे बघणारी.

डोळ्यांच्या कडेला, कोरडेपणाला झुगारून,
हट्टानं आलेला ओलावा-
अन आल्यानंतर ओशाळगत झालेला.

उरभर प्रेम घेऊन निघालेला मेघ-
घनवर्षावाच्या अतीव इच्छेनं.
आपुलकीची नजर, मायेची ओढ
शोधता शोधता फसगत झालेला.

यंत्रमानव तयार करणारा माणूस
फिरतोय काळाच्या चक्रावरून,
भोवंडून जाईपर्यंत.
आपलं मानवयंत्र झाल्याची जाणीवही नाही,
इतका निर्विकार, बधीर अन बेधुंद

२६.६.२०१२

गुलमोहर: 

आगीचे अभंग

Submitted by SHANKAR_DEO on 26 June, 2012 - 03:28

घशास कोरड पाण्याचा ओरड
व्यर्थ रडारड करु नका ll
सुखाचे आलय आहे मंत्रालय
कुणाचीही गय येथे नसे ll
राज्य हे टग्याचे आणिक बघ्यांचे
पोकळ फुग्यांचे रंगलेले ll
घेतले हे कष्ट कुणाची ही दृष्ट
कोण नतद्रष्ट आग लावी ll
मंत्रालय जळे कुणाला ना कळे
असे कसे चाळे कुणी केले ll
फाईल जळते कोणा ना कळते
आंधळे दळते भ्रष्टाचार ll
आगीची ही भूक कुनाचीही चूक
सारे होती मूक पाहूनीया ll
लागली हो आग जळालेली बाग
याचा कुणी माग काढायचा ll
राजेशाही थाट आता लागे वाट
रस्त्यावर खाट आता आली ll
प्रगतीची झिंग आम्ही मोठे किंग
फुटू नये बिंग कुणाचेही ll
जळाले घोटाळे लावा तोंडा टाळे
भ्रष्टाचारी चाळे पुन्हा करु ll

गुलमोहर: 

माहीसाठी उमटलेली कळ

Submitted by pradyumnasantu on 25 June, 2012 - 23:31

जा गं जा, जाऊन ये, शहाणी माझी बाई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
वाढदिवस ना आज तुझा? मोठी तू होणार
बसून बाबांच्या स्कूटरवर शाळेला जाणार
बर्थडेचे काढू फोटो चल चल कर बरं घाई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
पाहत होतो वाटच मी, बाहेर कधी ती पडते
हात पिरगाळुन तिचा मज नोट कधी हाती येते
पाचच वर्षांची मुलगी ती काय विरोध करेल
हूं की चूं जर करेल कार्टी माझ्या हाती मरेल
आईची तू पाळच आज्ञा करू नको कुचराई
नाक्यावरच्या दुकानातुनी साखर घेउन येई
*
कृपा ईश्वराची चोराचा क्रूर इरादा फसला
त्याला ओळखणारा पोलिस रस्त्यावरती दिसला
नको तावडीत त्याच्या म्हणुनी चोर सटकुनी गेला
पण....

गुलमोहर: 

कविता माझ्या मामाच्या

Submitted by अंबरीष on 25 June, 2012 - 11:01

******
आशीर्वाद मागतो मी
ह्या माऊलीचरणी
सेवा घडू दे हातुनि
साहित्यहि निर्मूनि
*****
एक स्वप्न
पाहिलेले
स्वप्न एक
फुललेले
एक स्वप्न फुलताना
विरत विरत चाललेले
एक स्वप्न मोरपंखी
स्वप्न एक स्वप्निल
एक स्वप्न जरतारी
एखादे कोमेजलेले
साक्षी हा सार्‍याचा मी
फुलणार्‍या स्वप्नांचा
अन
दाहक स्वप्नभंगाचा!
*****
शिक्षणक्षेत्रातले शहाणे
सरस्वतीवंदनेला विरोध करतात
व्यासपीठावरुन मात्र बोलताना
संस्कृतीच्या बोंबा मारतात.

*****
विठ्ठला!
तुला पाहिले
अन् पाहतच राहिलो
तुझं सावळं सुंदर रुप पाहताना
विसरलो देहभान.
कर कटिवरी
समचरण सुंदर
असे मन मोहवणारं रुपडं

गुलमोहर: 

किती दूर राहिले शहर मानसामधले..

Submitted by भारती.. on 25 June, 2012 - 06:23

किती दूर राहिले शहर मानसामधले ..

मन उदास आहे आणि खूप एकाकी..सांज ढळते आहे आणि अधिकृत वातावरण तयार होतेय एकटेपणाचे.अटळ गतकालरंजनाचे.

या एकटेपणापासून पळण्याचे किती उपाय योजले,किती दूरदूरवर शोध घेतले.
परिणाम एकच झाला,स्वतःपासूनही दूर गेले.
पण म्हणून आणखी कुणाच्या जवळ जायची गोष्टच नको.
असे थोडेच असते,स्वतःपासून दूर म्हणजे कुणाच्या जवळ?
मग तो कोणता चकवा होता जो निरंतर आशा जागवीत होता?

मग अगदी जगाकडे पाठ फिरवून एका एकांतिक भिंतीसमोर उभी राहिले मी.
तेव्हाही हे धडधडते हृदय कुणाची कशाची वाट पहात होते ?
कुठे गेला तो आत्मसन्मान?

हे किती कथानकांचे तुकडे विखुरले आहेत अवती भवती.

गुलमोहर: 

माझी सर्व बोटे सारखीच...!!!!!

Submitted by तनवीर सिद्दीकी on 25 June, 2012 - 06:16

स्वतंत्र देशात जन्मही झाला
प्रत्येक 'दिनी' झेंडाही खिश्याला
कधी हारे-तुरे केली, कधी नारे - 'खा' रे केली
अर्ध्या सुट्टीसाठी भाषणाला टाळीही दिली

पण जरा कुठे देशभक्तीची अंगावर संधी असली ..........तर मी करंगळी दाखवतो...!!!!!...(थोडा बिझी रे...)

सवलत-कायद्यात शाळा
होतकरू फायद्यात गाळा
आयकर ढापून ''माळा''
अस्सल सज्जनतेचा चाळा

पण जरा कुठे फुकटची कौतुक अंगठी दिसली........... तर मी अनामिका दाखवतो..!!!.....(आभार..आभार...)

कधी भासतो बोंबलणारा भ्रष्टाचार
कधी त्रासतो माजलेला हाहाकार
कधी हासतो दैवातला अत्याचार
कधी दिसतो नसत्याचा प्रचार

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता