अनिल तापकीर

वारीच्या निमित्ताने (आषाढीचा सोहळा )

Submitted by अनिल तापकीर on 28 June, 2012 - 01:56

आषाढीचा सोहळा, आवडे मनाला |
जावे पंढरीशी, ध्यास हा जीवाला ||

संत सज्जनांनी, दावियेली वाट |
चालता पार, दुस्तर भवघाट ||

पंढरीचा देव, उभा विटेवर |
भक्तांसी भेटण्या, होतसे आतुर ||

एकमेका दोघे, भेटण्या आतुर |
धावती आषाढीला, सोडूनी घरदार ||

सासुरवाशीण लेक, ओढ माहेरची |
तयापरी गति, होई वारकऱ्यांची ||

मातेला तळमळ ,लेकीच्या येण्याची |
तैशीच अवस्था, माझ्या विठूरायाची ||

वाळवन्टी जमती, टाळमृदंग गर्जती |
नामाची महती, नाचुनिया गाती ||

जैसे जलामाजी, लवण विरघळती |
होता दर्शन, देवभक्त एक होती ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वारीच्या निमित्ताने (अलौकिक गुरुशिष्य)

Submitted by अनिल तापकीर on 25 June, 2012 - 04:01

तुज येथे कोणी बोलाविले विठ्ठला | प्रार्थील्यावाचुनी आलासी का?| असे चक्क भगवंतांना बोलणारे, संत निळोबाराय हे खरोखरच महान होते. गुरुकृपा व्हावी ती देखील जगद्गुरू तुकोबारायांकडून हा अट्टाहास मनी बाळगून देहूला आले. परंतु हे होणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती. कारण तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन कित्येक वर्षे झाली. आणि त्यांच्या कडूनच आपल्याला अनुग्रह मिळावा असा निळोबारायांचा ध्यास होता. त्यापायी आपले घरदार सोडून ते देहूला आले. जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते तिथे म्हणजे गोपाळ पुऱ्यात धरणे धरून बसले. अन्नपाणी वर्ज्य करून अखंड तुकोबारायांचा धावा आरंभिला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षित आहे )

Submitted by अनिल तापकीर on 27 April, 2012 - 02:55

हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे
***************************************************************

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नियतीने खेळ मांडिला |

Submitted by अनिल तापकीर on 26 April, 2012 - 03:12

नियतीने खेळ मांडिला |
खेळणे केले मानवाला ||

कोणाला बैसविले धनाच्या राशीवरी |
तर कोणाला मिळेना भाकरी |
तिच्यापुढे मानवही झुकला |
नियतीने खेळ मांडिला ||

कोणास मिळे वाहन अलिशान |
कोणाला मिळेना पादत्राण |
नाही न्याय कोणा कळला |
नियतीने खेळ मांडिला ||

नियती अदृश्य शक्ती ईश्वराची |
जगावरी सत्ता तियेची |
महिमा नाही कोणा उमगला |
नियतीने खेळ मांडिला ||

प्रत्येकाला बाहुले बनविते |
आपुलिया छंदे नाचविते |
खेळविणे आवडे तिजला |
नियतीने खेळ मांडिला ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जो आवडे सर्वांना तोचि,

Submitted by अनिल तापकीर on 19 April, 2012 - 03:12

देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली ती आमची 'ननु' म्हणजे चुलत भावाची मुलगी बोलायला लागल्यानंतर. तिचे बोबडे बोल, खुदकन गालावर खळी पडून हसणे. तिचे चिमुकले हात ती गळ्यात टाकून मान डोलवत बोलणे सगळेच लाजवाब होते. दिवसभर कितीही काम केले कितीही थकलो तरी ननुच्या नुसत्या जवळ येण्यानेच सारा थकवा दूर व्हायचा. वाड्यातील सर्वच जणांना तिने जणू भुरळ घातली होती. तिच्याबरोबर बोलताना बहुतेक जन आपापली बोबडे बोलण्याची हौस भागवून घ्यायचा. बाकीचे इतर सख्खे , सख्खे चुलत भाऊ देखील स्वताच्या मुलांना कपडे आणताना ननुला देखील कपडे घ्यायचे .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घे उत्तुंग भरारी,

Submitted by अनिल तापकीर on 2 April, 2012 - 02:13

घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत

रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस

एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही

सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे

चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझा बाप

Submitted by अनिल तापकीर on 29 March, 2012 - 03:03

भासला माझा बाप मज वटवृक्षासमान
देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन

नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ
लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ

झिजला, कष्टला,राबला अपार
धैर्याने रोखले संकटांचे डोंगर

आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक
गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अशी कठोर का झालीस तू ?

Submitted by अनिल तापकीर on 28 March, 2012 - 06:54

अशी कठोर का झालीस तू ?
हृदयापासून हृदयाला
का वेगळे केलेस तू?
आयुष्यभर एक, रहावायाच्या,
झाल्या होत्या आणाभाका ,
कसला प्रसंग आला,
सांग तुझ्यावरी बाका,
प्रेम हे इतके दुबळे,
असू शकते का?
कुठल्याही प्रसंगाने,
ते पुसू शकते का?
*
*
विचारूनी पहा तू ,
तुझ्या अंतरमनाला,
शेवट असतो का?
खऱ्याखुर्या प्रेमाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अशी कठोर का झालीस तू ?

Submitted by अनिल तापकीर on 28 March, 2012 - 06:18

अशी कठोर का झालीस तू ?
हृदयापासून हृदयाला,
का वेगळे केलेस तू?
आयुष्यभर एक, रहावायाच्या,
झाल्या होत्या आणाभाका ,
कसला प्रसंग आला,
सांग तुझ्यावरी बाका,
प्रेम हे इतके दुबळे,
असू शकते का?
कुठल्याही प्रसंगाने,
ते पुसू शकते का?
*
*
विचारूनी पहा तू ,
तुझ्या अंतरमनाला,
शेवट असतो का?
खऱ्याखुर्या प्रेमाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चुकलेला निर्णय --भाग-१

Submitted by अनिल तापकीर on 22 March, 2012 - 07:54

सगळ्यांची नुसती धावपळ उडाली होती.जो तो एकमेकांवर ओरडून खेकसून उरकायला सांगत होता. साडे अकराचा साखरपुडा होता. आणि जागेवरच सव्वा अकरा झाल्यामुळे थोरले चुलते नि वडील अस्वस्थ झाले होते. साखरपुड्याच्या ठिकाणी पोहचायला पाऊन तास तरी लागणार होता. ४०७ टेम्पो दाराशी लागला नि सर्वांनी बसायला सुरुवात केली. नवरदेवासाठी त्याच्या मित्राची स्विफ्ट कार आणली होती. आम्ही म्हणजे मी नि माझे मित्र सगळेच टू व्हिलरवर जाणार होतो . नवरदेवाच्या कारमध्ये बसण्यासाठी कलावर्यांची स्पर्धा लागली होती.......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अनिल तापकीर