Submitted by के अंजली on 28 June, 2012 - 04:45
वेळी अवेळी मनात
असा भेटतो पाऊस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस
वारा पिंजारतो जसा
उगा ढगांचा कापूस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस
झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस
अशी आल्हादली माती
पोटी अत्तर सुवास
वर दाटूनी ढगांत
पडे उन्हात पाऊस
गुलमोहर:
शेअर करा
वा, वा, सुरेखच.......
वा, वा, सुरेखच.......
मस्त्.....पाऊसी...पाऊसी
मस्त्.....पाऊसी...पाऊसी कविता............
झकास!! आत्ता इथे उन्हातच पाउस
झकास!!
आत्ता इथे उन्हातच पाउस पडतोय. एकदम मस्त वाटलं त्याच वेळी हे वाचून
शशांक, योगुली आणि मंदार
शशांक, योगुली आणि मंदार
आभार...
आवडेश
आवडेश
'झाड सरीस म्हणते थांब नको ना
'झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस'
हृदयस्पर्शी..
रिया आणि भारती आभार!
रिया
आणि भारती 
आभार!
सुरेख. आवडली
सहीच...
सहीच...
कविता वाचून छान फ़्रेश फील
कविता वाचून छान फ़्रेश फील आला.
उन्हात पडणार्या पावसाबरोबर इंद्रधनु आलं असतं
रंगत आणखी वाढली आली असती.
आवडली ग!
आवडली ग!
मस्तच.
मस्तच.
उकाका - अनुमोदन.
उकाका - अनुमोदन.
झाड सरीस म्हणते थांब नको ना
झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस.... आफाट
वर दाटूनी नभांत... या लाईनचे रिपीटेशन असह्य होत जाते... नावडीचे पाहुणे आल्या सारखं
कविन,चिमुरी,उल्हासजी,वर्षाराण
कविन,चिमुरी,उल्हासजी,वर्षाराणी,विभाग्रज,मंदार आणि शाम..
आभार.
पुन्हा एकदा मेघ बरसले....
पुन्हा एकदा मेघ बरसले....