मन जाते पंढरीला

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2012 - 06:08

मेघ सावळे सावळे
आले क्षितीजाच्या तटी
मना आठवे आठवे
माय भिवरेच्या तटी

वेध लाविते जीवाला
कसे साजिरे सगुण
विटेवरी ठाकलेले
परब्रह्म विलक्षण

हाकारितो जनालागी
प्रेम करुणा सागर
भक्तिसुखात नहा रे
यारे सारे सान थोर

तुका, ज्ञाना, नामदेव
येती दर्शनासी संत
त्यांजसवे वैष्णवांचे
थवे भजनात दंग

असा सोहळा रंगतो
एकादशी आषाढीला
तन जरि प्रपंचात
मन जाते पंढरीला.....

गुलमोहर: 

.

खूप छान
मोठी गोड आहे ही रचना
सुंदर
शशांकराव तुम्ही नेहमीच मस्त लिहिता बुवा !!कसं काय जमतं हो इतकं छान......मला काहीतरी आयडीया असेल तर द्या ना ....प्लीज

असा सोहळा रंगतो
एकादशी आषाढीला
तन जरि प्रपंचात
मन जाते पंढरीला....

कविता अगदी उत्तम आहे ! पण , मला शेवटची रचना अगदी भावणारी वाटली.

सर्वांचे मनापासून आभार.......
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल.......
श्री ज्ञानदेव तुकाराम.....
पंढरीनाथ महाराज की जय.......

देवकाका - तुम्ही जी मधुर चाल लावली आहेत ती या रचनेपेक्षा जास्त अप्रतिम आहे, भक्तिरसाने ओथंबलेली आहे.........