तरंगतळे

Submitted by भारती.. on 28 June, 2012 - 05:58

तरंगतळे
आत हलणार्‍या चित्रांगी प्रतिमांचा
अविश्वास वाटतो आताशा..

आता आपण फक्त निरखावे
मधले अंतर आणि आडवाटा
अचानक जवळ आणणार्‍या

मग यापैकी कशावरही न विसंबता
थोर व्हावे एकमेकांइतके.
अवकाश व्हावे एकमेकांचे .

शिल्लक रहातीलच आदिम आग्रह
जे कधी जपावेत समारंभाने.
कधी मोडावेत समारंभाने.

सारे गुंतवळे व्यापून एकच तरंगतळे.
निळ्या सहजतेने.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भरतीजी आपला हा प्रयत्न छान आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला गद्य स्वरुपाच्या कविता फारशा आवडत नाहीत.

आणि...
आत हलणार्‍या चित्रांगी प्रतिमांचा
अविश्वास वाटतो आताशा..

..............ही लय यमकासह संपुर्ण कवितेत आली असती तर काय सांगु, हिच कविता अफलातुन झाली असती.

आणि हो,.. शेवट परिपुर्ण असला तरी अर्धवट वाटतो. तो म्हणजे रचणेच्या अशा मांडणीमुळे. तसा कवितेचा आशय खुपच वेगळा आणि मौलीक आहे.

कृगैन.

ऑर्फीने फारच महत्त्वचा मुद्दा मांडलाय त्याचे आभार व अभिमंदन

_____________________________________________
आत हलणार्‍या चित्रांगी प्रतिमांचा अविश्वास वाटतो आताशा.............

आताशा वाटतं ....
आपण फक्त निरखावं... मधलं अंतर ;
आणि आडवाटा... अचानक जवळ आणणार्‍या!

मग यापैकी कशावरही न विसंबता......
थोर व्हावं...एकमेकांइतकं !
अवकाश व्हावं...एकमेकांचं !.

शिल्लक रहातीलच आदिम आग्रह.....
जे कधी जपावेत...समारंभानं!
कधी मोडावेत...समारंभानं !

उरावं.............
सारे गुंतवळे व्यापणारं एकच तरंगतळं,
निळ्या सहजतेचं .......निळ्या सहजतेनं

.....................निळ्या सहजतेचं .......निळ्या सहजतेनं !!!
_____________________________________________

भारती ताई मी काही जुजबी विरामचिन्हे वापरून काही मात्रा बदलून हीच कविता अशी वाचली मला मूळ कविता आवडलीच तशी ही पण छान वाटते आहे
आपले मत कळवावे ही विनंती

ऑर्फिअस आणि वैभव,माझ्या अंगणात तुमचं एकमत झाल्याचं पाहून गंमत वाटली,आनंद झाला.मित्रहो,दोघाचेही मुद्दे छान ,मला अंतर्मुख करणारे आहेत्.वैभव,तुमच्या दुरुस्त्या आवडल्या.जास्त पारदर्शकता येते.

ऑर्फिअस माझी कवी म्हणून भीती अशी की चांगला मुक्तछंद लिहिण्याची क्षमता मी गमावता कामा नये.What abt this point,young men??