कविता

आषाढी

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 30 June, 2012 - 00:26

पंढरपुरासी जन हो चला
एकादशी आषाढीला ||

भक्त मंडळी सारी जमली,
भिवरथडीही भरूनी आली,
घेण्या हरिनामाला
एकादशी आषाढीला ||

कुंकू बुक्का घेउनी तुळशी,
रांग लावण्या करिती दाटी,
दर्शन घेण्याला
एकादशी आषाढीला ||

टाळ मृदंग चिपळ्या घेउन,
नाचति वैष्णव करिती भजन,
घेती विठु नामाला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अभंग

Submitted by निशिकांत on 29 June, 2012 - 22:41

दु:खाचे आगार i संसार सागर l
करी बेडा पार I विठ्ठला रे II १ II

विठ्ठलची आस I विठ्ठलची ध्यास I
विठ्ठलची घास I प्रसादाचा II २ II

पंढरीची वारी Iआलो तुझ्या दारी I
नको रे मघारी I प्रपंचात II ३ II

केली पायपीट I झाली तुझी भेट I
चरणीची वीट I स्वर्ग माझा II ४ II

संसारात दंग I असंगाशी संग I
जाहलो नि:संग I दर्शनाने II ५ II

तुझी रे सावली I मनाला भावली I
माउली पावली I धन्य झालो II ६ II

मनोभावे सेवा I केली तुझी देवा I
वैकुंठीचा मेवा I भिक्षा देई II ७ II

मोहाचा आजार I जाहलो बेजार I
नको येरझार I पांडुरंगा II ८ II

निशिकांता सोड I प्रपंचाची ओढ I

गुलमोहर: 

" हे माझे पंढरपूर ! "

Submitted by विदेश on 29 June, 2012 - 21:51

हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |

वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |

सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |

कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |

घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||

गुलमोहर: 

पाऊस आणि मन

Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 13:11

छेडीतो सतार, इंद्राचा गंधार
झुले मेघमल्हार, देऊन हूंकार.

ओथंबले मेघ, कोसळल्या धारा,
ओलावली माती, गंधाळला वारा.

खळाळले पाणी, ओसंडला पुर
धुंदावल्या कळ्या, नाचु लागे मोर.

उसवले मन, आठवला पुर
उलगल्या गाठी, सुठे गुंतलेले दोर.

गजबजले पार, मनातले घर
उघडता दार, गेली उडून पाखरं.

---------------------------------------------
पुर्व प्रसिध्दी :- दिवाळी अंक ' प्रतिभा' २००८
---------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पहिला पाऊस

Submitted by सौरभ उपाध्ये on 29 June, 2012 - 09:30

पहिला पाऊस
रिमझिम सर पावसाची , मन जायी मोहरून ;
ओल्या मातीच्या गंधाने, माझाच मी गेलो हरवून.

पाहताना त्या सरीला , ऐकू आली अलगुज;
थेंबा-थेंबाच्या स्वरांनी, सूर उमलले आज.

सुटे सोसाट्याचा वारा, झाडे घेती खुला श्वास;
येत्या पावसाची होती,त्यांनाही वेडी आस.

पाखरे लपण्यासाठी ती,सारी सैराभैरा झाली;
उन्हाच्या चटक्यांना, आज शीतलता आली.

असा निसर्गाचा खेळ, जणू वेगळा परीस;
माझ्या मनी दाटलेला,असा पहिला पाऊस.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विठ्ठलाची वारी

Submitted by हेमंत पुराणिक on 29 June, 2012 - 07:54

नजरेत दया हृदयात माया
कटेवरी हात विठ्ठलाचे
चिपळीचा नाद मृदुंगाचा ताल
वारकरी नाचती पंढरीचे
खांद्यावरी गठुड डोईवरी टोपली
टोपलीत तुकडे भाकरीचे
आषाढ सरींनी भिजे हे अंग
परी मुखी नाम पंढरीचे
डोळ्यात सुखली भुकेची आसव
पोटाला खळगी तरी पंढरीची धाव
दिसावा पंढरी भेटावा पंढरी
जीवात भक्ताच्या तळमळ होई
ज्ञानाची पालखी तुक्याची पालखी
नाचतो वारकरी भीमातीरी
भजनी रंगतो कीर्तनी रंगतो
रिंगण घालतो वारकरी
भक्तीचा भुकेला भावाचा भुकेला
विटेवरी उभा विठुराया
जरी विटेवरी उभा पंढरपुरी

गुलमोहर: 

वारी

Submitted by shilpa mahajan on 29 June, 2012 - 04:42

पंढरीची वारी

नेमे करिता पंढरी वारी हात जोडितो फक्त
यंदा करूया अदला बदली , विठू मी अन तू भक्त !

वैकुंठीच्या महालातुनी कुटीत माझ्या येई
पंढरीची मानुनिया वारी पायी चालत येई

लुळा लंगडा वारकरी तुज भेटे जो जो कोणी
तुझ्या कृपेचे पाज तीर्थ त्या दोन्ही कर भरभरुनी

कृतार्थ त्यांचे आशिष आणेल पाणी तुझ्या नयनात
यंदा करूया अदला बदली , विठू मी अन तू भक्त !

भजन सुरांचा बुक्का उधळी तू माझ्या अंगणात
कृतार्थ होईल माझी झोपडी ,चरण स्पर्श दे फक्त

मोक्षसुखाची माळ तुळशीची घाली मम कंठात
देहभान मम गळून पडू दे, प्राण घेई पदरात

चरणी तुझ्या मी विलीन होता कोण देव अन भक्त ?

गुलमोहर: 

एकादशी

Submitted by उमेश वैद्य on 29 June, 2012 - 04:18

एकादशी

पंढरीत आता पांडुरंग नाही
उगीच का करीता विठाई विठाई
दीन दुबळ्यांच्या हृदयी आश्रया
गेला तो कधीच निघोनिया

पाच कर्मेंद्रीये पाच ज्ञानेंद्रीये
आणिक हे मन एकादश
वाहून सोडीन चरणाचे ठाई
उरेल मग तो पांडुरंग

ऐशा विठठलाचे घडावे दर्शन
एरव्ही ती वारी वरपांग
उम्या म्हणे देवा ऐशी एकादशी
तैसी ती घडणे तुझ्या हाती

उ. म. वैद्य २०१२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बसsssss जगायचं.......!!!

Submitted by मराठी टायगर on 29 June, 2012 - 02:17

बसsssss जगायचं.......!!!
ओजंळ भर पीठासाठी तो
खेळ डोंबाऱ्याचा रंगला होता
भुकेल्या त्या पिल्ला साठी
आईचा तो पराकाष्ट होता...!!!

आजही मीठ भाकरीचे पैसे
पदर पसरूनही नाही सुटले
झोपडीच्या वेशीवरचे पोर
मग पुन्हा पाणीच पिऊन झोपले...!!!

उद्याचे काही माहित नाही हा
तर जीव घेणा खेळ आयुष्याचा
कितीही दुखः सहन केले तरी
प्रयत्न हा झीद्दीने जगण्याचा...!!!

उपासमार , भुकमारीने पोर ते
असेच कुपोषित जगत आहे
भ्रष्टाचार कितीही वाढून देखील
माझा भारत तर महानच आहे...!!!

गुलमोहर: 

तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 02:07

चालताना पाठी तुझ्या रुणूझुणू नाद ते,
काय सांगू तुला सखी नवल आज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

गडणीला साजणी तू काय लाजते?
खोल जरा मनातले तुझ्या राज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

चंद्रमौळी म्हणेल तो स्वर्गलोक तुला,
इंद्राणीची चाल तुला गजब साधते.
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

काय सांगू अदा तिची घायाळल्या वाटा,
शृंगाराचे साज तिचे नखरेबाज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -.-.-.-.-
वाचक मित्रांना नम्र विनंती :- याच शिर्षकाची माझी एक गझल- गझल विभागात आहे. दोनीमधील तुलनात्मक प्रतिक्रीया द्यावी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता