(आज 'तिचं' लग्न आहे....स्वत:ला किती अडवले तरी ही कविता लिहीली गेलीच....)
एक पातळ स्वन्र 'आज' अधुरे राहणार..
माझ्या कवितेतला चंद्र ढगा-आड जाणार..
आतुरतेने पाहिलेली वाट मी ज्या दिवसाची,
तो दिवस आज येऊन कुणा दुसर्याचाच होणार..
अंतरपाटामागे 'वरमाला' तिची 'फसवली' जाणार,
अष्टकांचे 'बोल' मग काळीज पोखरत राहणार..
रुसून जातील सात फेरे वाट पाहत 'जोडव्यांची',
मंगळसुत्राच्या बेडीत 'तो' गळा 'अबोल' होणार..
बडबडलेल्या जिभेला 'शब्द' नाही सुचणार..
अनुरागाच्या किड्यांना पंख नाही फुटणार..
बस्...'आज' अखेरचे भेटून येतो एकदाचे..
पुन्हा कधी तिला माझा विचार देखील नाही शिवणार..
ह्रुदयाचं काय माझ्या, उगाचच 'तडकणार',
'एका' कविचं प्रेम पुन्हा 'कवितेतच' उरणार,
खेचला जाईल 'वार्यातून वारा' जरी कोसभर..
कुरवाळलेल्या जखमांतून 'हे' "वादळ" आज चिघळणार...
...............'हे' "वादळ" आज चिघळणार...
हुरहुर आणि वेदना काय मस्त
हुरहुर आणि वेदना काय मस्त लीहिलिये...............छान, सुरेख........
ह्रुदयाचं काय माझ्या, उगाचच 'तडकणार',
'एका' कविचं प्रेम पुन्हा 'कवितेतच' उरणार,
खेचला जाईल 'वार्यातून वारा' जरी कोसभर..
कुरवाळलेल्या जखमांतून 'हे' "वादळ" आज चिघळणार...
हे अप्रतिम..........
अफाट काव्य आहे अठराव्या शतकात
अफाट काव्य आहे
अठराव्या शतकात दिल्ली लुटली गेली तसे आम्ही लुटले गेल्यासारखे ओळी वाचत आहोत
कोणीही यावे आणि टप्पल मारून जावे अशी आमची मनस्थिती झालेली आहे
आपल्या दु:खात सहभागी आहोत. या वयातील प्रेम अनेकदा शारिरीक आकर्षणापर्यंत पोचून थांबूही शकते. आपल्याला एक उत्तम जोडीदार लवकरात लवकर मिळो अशी मल्हारीमार्तंडाचरणी प्रार्थना. अर्थात, आपल्या प्रेमभावनेचा मुळीच अनादर करायचा नाही आहे. ते कवी बेफिकीर तर लग्नाला वीस वर्षे होऊनही सातत्याने याच भावनेत नाहून निघताना दिसतात.
कळावे
गंभीर समीक्षक
योगुली...खुप जळतंय गं आतल्या
योगुली...खुप जळतंय गं आतल्या आत...!! सगळं कळूनही अजाण रहावंसं वाटतंय....
>>>>>>>
गंभीर समीक्षकजी... दुखः कसले हो..? तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला यातच मला आनंद आहे..
असो..
ता.क.<<<ते कवी बेफिकीर तर लग्नाला वीस वर्षे होऊनही सातत्याने याच भावनेत नाहून निघताना दिसतात.>>> कवी बेफिकीरजींच्या नावातच सारे काही आहे....
उतरलय ! हे तुझ्यासाठी... जे
उतरलय !
हे तुझ्यासाठी... जे आपले नव्हतेच त्यासाठी कशाला झुरायचे
http://www.maayboli.com/node/35967
"पातळ स्वप्न" प्रेयसी
"पातळ स्वप्न"
प्रेयसी "पातळ" (पाचवारी किंवा लग्न आहे म्हणून नव्वारीही असेल
) नेसून समोर आहे लग्नात म्हणून का???? 
की तुम्ह्ह"तलम" वगैरे असा काही शब्दप्रयोग करायचा होता.........
"पातळ स्वप्न"
वर्षा_म आणि भुंगा... आभारी
वर्षा_म आणि भुंगा...
आभारी आहे कविता वाचल्याबद्दल...
किरण कविता इतकी नाही भावली
किरण
कविता इतकी नाही भावली
<<<"पातळ स्वप्न" प्रेयसी
<<<"पातळ स्वप्न" प्रेयसी "पातळ" (पाचवारी किंवा लग्न आहे म्हणून नव्वारीही असेल ) नेसून समोर आहे लग्नात म्हणून का????
की तुम्ह्ह"तलम" वगैरे असा काही शब्दप्रयोग करायचा होता.........
>>>
पातळ स्वप्न हा शब्द प्रयोग नविन असेल आपल्यासाठी..... प्रत्येक शब्द पहील्यांदा कुठे ना कुठे वापरला जाणारच...!
ज्या स्वप्नात पुर्णत्वाची घनता नव्हती , ते पाण्यासारखे पारदर्शक आणि प्रवाही होते , ते असून सुद्धा नव्हतेच..
म्हणून ते "पातळ स्वप्न" या कल्पनेत बांधले गेले...
समस्या गंभीर आहे.
समस्या गंभीर आहे.
कविता गांभीर्यानं लिहिली आहे
कविता गांभीर्यानं लिहिली आहे असं वाटलं: तसं असेल तर कविता अप्रतिमच आहे असे मी म्हणेन.
पण जसे इतर प्रतिसाद सुचवतात तशी ती कुचेष्टेची कविता असेल तर 'आवडली नाही' असे म्हणेन.
आवडली
आवडली
pradyumnasantuजी.. कवितेची
pradyumnasantuजी.. कवितेची चेष्टा करणे मला आवडत नाही..... प्रतिसादांमध्ये ज्याने त्याने आपापले मत व्यक्त केलंय... ज्यांच्या प्रतिसादांवरून आपल्याला ही कुचेष्टेची कविता वाटली, ते मला किंवा मी त्यांना नीट ओळखतही नाही... आपण काव्याचे उत्तम जाणकार आहात.. आपल्यालाही ही कुचेष्टा वाटावी हे माझं दुर्दैव आहे..
मा.बो. म्हणजे आपल्या मनातले भाव वाटून टाकायचा कोनाडा असे मी आजपर्यंत समजत होतो , पण मला कळून चुकलंय कि इथे कविता 'भावात' नाही तर 'शब्दांत' तोलली जाते... ती वाचली जाते तर मुल्यमापन करण्यासाठीच.... कोणीही उठून तिचं समीक्षण करत बसतं... कविला काय म्हणायचंय , अमूक ओळ कविने का लिहीली असेल.... कोणी विचार सुद्धा करत नाही...
असो...
मला जे वाटतं मी तेच लिहीतो.... कुणाला आवडण्यासाठी किंवा प्रतिसादांसाठी मुळीच नाही...
तरीही आपल्यासारख्या जाणकाराचा प्रतिसाद मिळणे हे मी माझं भाग्य समजतो...!!
धन्यवाद...
विभाग्रज , रीया.... कविता
विभाग्रज , रीया.... कविता वाचल्याबद्दल आभारी आहे...
Kiran.. न आवडूनही कविता वाचलीस आणि प्रमाणिकपणाने आपले मत व्यक्त केलेस... धन्यवाद..!!
आवडली
आवडली
धन्यवाद स्मितू...!!
धन्यवाद स्मितू...!!