तरंगतळे

तरंगतळे

Submitted by भारती.. on 28 June, 2012 - 05:58

तरंगतळे
आत हलणार्‍या चित्रांगी प्रतिमांचा
अविश्वास वाटतो आताशा..

आता आपण फक्त निरखावे
मधले अंतर आणि आडवाटा
अचानक जवळ आणणार्‍या

मग यापैकी कशावरही न विसंबता
थोर व्हावे एकमेकांइतके.
अवकाश व्हावे एकमेकांचे .

शिल्लक रहातीलच आदिम आग्रह
जे कधी जपावेत समारंभाने.
कधी मोडावेत समारंभाने.

सारे गुंतवळे व्यापून एकच तरंगतळे.
निळ्या सहजतेने.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तरंगतळे