उद्या ( झब्बु )

Submitted by वर्षा_म on 27 June, 2012 - 06:34

मुळ कविता : http://www.maayboli.com/node/35965

=====================

एक नवे स्वप्न उद्यासाठी पडणार
तूझ्या कवितेला नवा चंद्र लाभणार
आतुरतेने पाहलीस वाट तू ज्या दिवसाची
तो दिवस उद्यावर येऊन ठेपणार..

अंतरमनामधे 'छबी' तिची 'वसवली' जाणार,
प्रेमाचे 'बोल' मग मनात साचत राहणार..
सरुन जातील काही दिवस वाट पाहत 'अंगठीची',
साखरपुड्याच्या बंधनात तुम्ही अडकणार..

नावाजलेल्या कविला 'शब्द' नाही सुचणार..
माबोवरी नवी कविता नाही पडणार..
बस्...'आज' अखेरचे लिहुन घे एकदाचे..
पुन्हा कधी कवितेचा विचार देखील नाही शिवणार..

ह्रुदयाचं काय तूझ्या, तिच्याभोवती 'फिरणार',
'एका' कविचं प्रेम पुन्हा 'कवितेत' न उरणार,
खेचला जाशील 'वार्‍यासम' तू जन्मभर..
भुतकालीन जखमांतून "वादळ" नाही चिघळणार...
...............'हे' जुने "वावटळ" निघुन जाणार

गुलमोहर: 

उल्हासनगरचा ओरिजिनल माल अमेरिकेतील न्यूयॉर्क, शिकागो अशा काही शहरात डुप्लिकेट म्हणून विकावा तसे हे काव्य दिसत आहे

कवी व गप्पक पाध्यांप्रमाणेच आम्हीही वाचन नंतर करूच

कळावे

गंभीर समीक्षक

|(