अशीही कधी कविता करावी
मन भरकटत कल्पित होईल
येईल जोवर भानावर असे
लेखणीही प्रवास तो लिहूनी ठेवील
अशीही कधी कविता करावी
सौन्दर्यही मी अचूक टिपावे
बाहुत आलेल्या स्वप्न्परीने
कागदावरही अस्तित्वाचे दाखले द्यावे
अशीही कधी कविता करावी
कागद ग्रीष्म दिवसालाही थकवा
शाईमध्ये मिसळावे थेंब शीतळ
अन प्रत्येक शब्दामागून पाऊस यावा
अशीही कधी कविता करावी
विना यमकाचे म्हणावे गाणे
व्हावा लिलाव माझ्या कल्पनेचा
खावे मी ही चार-दोन आणे
ठेव मनाच्या कुपीत माझी मखमली लय
गाणे गातीलच सारे मला अक्षरांचे भय
मंद पावसाचा
रुणुझुणू ताल,
नाद पैंजणाचा
तुझे मित बोल.
मनास ही माझ्या
पडे कशी भुल,
तुझ्या लोचनात
किती जावे खोल.
आभाळात माझ्या
चांदण्याची झुल,
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुल.
स्पर्श चंदनाचा
भाव ते मलुल,
श्वास गंधकाचा
सांडतो विपुल.
वेडावले मन
फिरे गोल गोल,
जशी पाखराला
पडे रानभुल.
अरे अरे बळीराजा ||
तू नावाचाच राजा ||
तुझं भांडवल करून |
पुढारी मारतात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
तुझ्या राज्यामध्ये असतो दुष्काळ ||
ओला असो वा सुका ||
तुझ्यासाठी तो फक्त काळ ||
तुझी स्वप्ने होत जाती वजा ||
अरे अरे बळीराजा ||
महागाईने कहर केला ||
भाव मिळेना शेत मालाला ||
तुझा कर्जाचा डोंगर वाढतच गेला ||
दलाल बघत्यात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
कर्ज फिटता फिटेना ||
मदत मिळता मिळेना ||
निसर्ग बी साथ देईना ||
सतत कर्जाचा तो बोजा ||
अरे अरे बळीराजा ||
शेतामध्ये गाळतो तू घाम ||
मुखी तुझ्या हरीनाम ||
शेत हेच तुझे चारीधाम ||
मिळत नाही कधी रजा ||
अरे अरे बळीराजा
अरे अरे बळीराजा ||
तू नावाचाच राजा ||
तुझं भांडवल करून |
पुढारी मारतात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
तुझ्या राज्यामध्ये असतो दुष्काळ ||
ओला असो वा सुका ||
तुझ्यासाठी तो फक्त काळ ||
तुझी स्वप्ने होत जाती वजा ||
अरे अरे बळीराजा ||
महागाईने कहर केला ||
भाव मिळेना शेत मालाला ||
तुझा कर्जाचा डोंगर वाढतच गेला ||
दलाल बघत्यात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
कर्ज फिटता फिटेना ||
मदत मिळता मिळेना ||
निसर्ग बी साथ देईना ||
सतत कर्जाचा तो बोजा ||
अरे अरे बळीराजा ||
शेतामध्ये गाळतो तू घाम ||
मुखी तुझ्या हरीनाम ||
शेत हेच तुझे चारीधाम ||
मिळत नाही कधी रजा ||
अरे अरे बळीराजा
त्याच्या इवल्या हातावरती छडी मारली जेंव्हा
कंठ दाटला, परी मला ना रडता आले तेंव्हा
अत्ता अत्ता हासत होता फुलासारखा गाली
क्षणात एका चर्येवरती रुद्र उदासी आली
जणू अचानक उजाड झाली वासंतीच फुलबाग
भानावरती येता येता लज्जीत झाला राग
शिस्त मोडली नव्हती अथवा गुन्हा न केला काही
एका अंकावरुनी होता चुकला गणित पुन्हाही
गणितच नाही सुटले म्हणुनी जगणे विस्कटते का
आयुष्याचे गणित कुणाचे गणिताने सुटते का
मला आठवे माझ्यामधले अवली मूल शहाणे
गणित जमले तरीही कोठे जमले अचूक जगणे
खिन्न मनाने त्याचा मग मी हात घेतला हाती
थरथरणार्या हातामध्ये सोपविली 'ती' काठी
काळ्या ढगात लपली वर्षाराणी
वाजत गाजत येई ती वर्षाराणी
ढोल ताशानी ढग हे गर्जती
चमचम चपला नाचे त्रिभुवनी
झरा हासला डोंगरा मधूनी
उन्मत्त नदी हसली रानी
वारा धुंद बेहोश होउनी
सरीं वरती सळसळे पानी
गंध मातीचा मना मोहवी
भिजले अंग मनही भिजुनी
पाय नाचले पाण्यावरती
थुई थुई मोर नाचे वनी
एक बिचारी झरोक्यामधुनी
होती बघत साश्रुनयनी
होती जणु ती घायाळ हरीणी
सरल्या दिवसाना याद करुनी
काळ्या ढगातुनी बरसत येई
कुणा दु:ख आनंद घेऊनी
ज्याच्या त्याच्या मापामधूनी
आनंद दु:ख घ्यावे भरुनी
प्रेमा मधले शब्द बोलले
मुके पणाचे बोल बोलले
शब्द हसले गाली खुलले
लाल गुलाबी रंग सजले
नजर बोलली नजरे मधूनी
हृदय वेधले नजर तीरांनी
जखमा नाजुक स्पर्श मोहरे
स्पर्शा मधूनी अंग शहारे
हाता मधले हात आपुले
जवळ यावे मिठीत बसावे
पाय आपुले मंद चालले
रात्र दाटे चांदणे खुलले
जन्मोजन्मीचे नाते आपुले
जन्मांतराने फिरुनी यावे
असेच खुलले असेच फुलले
जीवन आपुले प्रीती मधले
एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!
बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!
ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं!
कायमच, सुख मिळालं की दु:ख
मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून......
(फेस बुकवरील एका ग्रुपमध्ये लिहा ओळीवर कविता या उपक्रमात
"वर ढग डवरले" ही ओळ दिली गेली होती.
त्या ओळीवर काही सहज स्फुरल्याने हा असा विस्तार केला)
वर ढग डवरले
लागे पाऊस-चाहूल
वर ढग डवरले
खाली ज्याचे त्याचे मन
ढगांमधे गुंतलेले
वर ढग डवरले
कुणी मनी मोहरले
झुलविती ढग जणू
आठवणींचे हिंदोळे
वर ढग डवरले
कुणा दु:खाचे उमाळे
जुन्या पुराण्या जखमा
ढगांसंगे कुरवाळे
वर ढग डवरले
कुणी चिंतेने कावती
भिजण्याच्या निषेधार्थ
काळी निशाणे दावती
वर ढग डवरले
हसे पाऊस त्यातून
वागण्याच्या एकेकाच्या
तर्हा तर्हा न्याहाळून
डवरल्या ढगांतून
सारखाच बरसतो