धाक

Submitted by उमेश वैद्य on 31 March, 2011 - 11:32

धाक

’तिची’ मुलं बेताल झाली
वागु लागली कशीही....
कधी तिलाच ओरबाडत...
कधी तिनंच त्यांच्यासाठी निर्मीलेल्या
छान छान गोष्टींचा नाश करीत...
जिवघेणी भांडत....आपापसात....
तिच्याच पोटातून उर्जारसाचा............
उपसा करत अमर्याद.........
तो जाळून, तिनंच त्यांच्यासाठी तयार केलेली
मऊशार दुलई टराटरा फ़ाडत.....
आईची माया झुगारत.......
उन्मत्त, बेमुर्रवतखोर, हरामखोरी.....
चालूच....
’ती’ खिन्न झाली
तिन आपली व्यथा आपल्या मित्राला सांगीतली
आपल्या मुलांना कळू नये अशी ...त्याच्या पोटात खोलवर....
तिची ही कैफ़ियत त्यानं ऎकली मात्र
तो संतापला.... उसळला...
तुझ्या मुलांना जरा धाक घालतो म्हणाला
’तिची’ ही मुल त्यालासुध्दा छळत होतीच
त्यानं असा धाक घातला ...........
मुले ओरडली........
त्सुनामी आली..... त्सुनामी आली..
आणि ’तो’ ’तिला’ म्हणाला....शांत हो.....
एवढ्यान भागल नाही तर सांग....
मग पहातो.....

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: