जगण्यासाठी
Submitted by कल्पी on 2 April, 2011 - 09:30
सगळी निरवानिरव झाली
सांजसावल्या चढु लागल्या
भुकेचा पण भोंगा झाला
तिला काय कळत
घरातलं एक माणुस कमी झालेलं
सुटली ती मोकाट
जांभयावर जांभया
लाज वाटत होती मनाला
पण पोटाचे आतडे शांत बसायला तयार नव्हतेच
कावळे आले खोल गेलेल्या पोटात
आणी जाणीव झाली
जाणारं जातं
पण व्यवहार कुणाला सुटले आहेत
ते अव्याहत सुरुच राहणार ना
जगण्यासाठी
हाडामासाचे शरीर श्वास घेइल तेव्हा
शक्ती पुरायला नको
उठले मी ...........अश्रु गिळले आणी
बसले पानावर
नजरा दिसत होत्या गोतावळ्याच्या
काय बाई आहे
नवरा जाऊन काही तास झाले नाहीत आणी
गिळायला बसली
केवळ याच भावनेने
घास हातातला हातात राहील्या
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा