Submitted by कल्पी on 2 April, 2011 - 09:30
सगळी निरवानिरव झाली
सांजसावल्या चढु लागल्या
भुकेचा पण भोंगा झाला
तिला काय कळत
घरातलं एक माणुस कमी झालेलं
सुटली ती मोकाट
जांभयावर जांभया
लाज वाटत होती मनाला
पण पोटाचे आतडे शांत बसायला तयार नव्हतेच
कावळे आले खोल गेलेल्या पोटात
आणी जाणीव झाली
जाणारं जातं
पण व्यवहार कुणाला सुटले आहेत
ते अव्याहत सुरुच राहणार ना
जगण्यासाठी
हाडामासाचे शरीर श्वास घेइल तेव्हा
शक्ती पुरायला नको
उठले मी ...........अश्रु गिळले आणी
बसले पानावर
नजरा दिसत होत्या गोतावळ्याच्या
काय बाई आहे
नवरा जाऊन काही तास झाले नाहीत आणी
गिळायला बसली
केवळ याच भावनेने
घास हातातला हातात राहील्या
आणी मनाच्या संवेदना जाग्या झाल्या
डॊळे भरुन आले
समोरचे ताट सोडुन मी हमसुन हमसुन रडु लागले
कल्पी जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अप्रतिम........
अप्रतिम........
इथे कसेही वागा नावे
इथे कसेही वागा
नावे ठेवतातच!
कारण सगळ्यांचे मत एक कधीच नसते
मस्त कविता!
धन्यवाद
धन्यवाद
कल्पी.., 'भाव' कळला... छान
कल्पी.., 'भाव' कळला... छान रचना.!
ते... तुमचं नाव मुळ (मुक्तक)
ते... तुमचं नाव मुळ (मुक्तक) कवितेशी जरा आणखी एक ओळ खाली घेउन लिहाल का...?
(मग हा प्रतिसाद बदलतो)