Submitted by atulgupte on 31 March, 2011 - 04:28
नको विचारूस, नकोच सांगूस गुपित राहू दे जरा
नकोच देऊस नाव नात्याला भाव हृदयातील खरा.
दगडास पूजिले, नवसही केले हाती रिकामाच घडा
माणूस म्हणुनी जगा जरा रे माणसातील देवच खरा.
मंदिरे बांधली दौलत वाहिली देवाच्या चरणासी
जीव भुकेल्या जर खाऊ घातले तोची धर्म खरा.
राधा चा अन मीरा चाही एकच तो सावळा
प्रीत असो वा भक्ती हृदयी प्रेम भाव तो खरा.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मंदिरे बांधली दौलत वाहिली
मंदिरे बांधली दौलत वाहिली देवाच्या चरणासी
जीव भुकेल्या जर खाऊ घातले तोची धर्म खरा. >>>>
एकदम पटणारे, खरेखुरे.....
छान सन्देश निस्वार्थ प्रेम
छान सन्देश निस्वार्थ प्रेम भाव हा खरा मह्त्वचा.