Submitted by कल्पी on 1 April, 2011 - 11:02
आज आठवे तुझ्या वेणा
तु दिव्याच्या काजळीला
गालावरील तिट केले
उसने हासुन सदैव तु
संसाराचे गीत केले
पाणी देउन फ़ोडणीला
तेलाचे तवंग आले
सुग्रस तुझ्या रुचिरेला
मायेने अभंग केले
ऊनपावसाचे संगीत तुझे
चिंब होउनी गात होतीस
ओलेत्याची करुनी पैठणी
शोभा नावे करीत होतीस
चटनीची करुनी वाटणी
आजोळाला स्मरत होतीस
भरजरी तुझ्या बालपणाचे
किस्से आठवुन रडत होतीस
संकट आले कित्येक वेळा
तेरी टसमस झाली नाहीस
आई तुझ्या पायाशी
तुझी लेकरे फ़ुलत होती
कसे विसरु या उपकारा
संसाराच्या या बलिदाना
आईविना जन्मच सुना
आज आठवे तुझ्या वेणा
कल्पी जोशी
०८/०३/२०११
गुलमोहर:
शेअर करा