Submitted by vaiddya on 19 April, 2011 - 13:54
जंगलातल्या झाडांवर
शेवाळ चढतं
तसं आजुबाजुच्या
टेकडयांवर
हे शहर
चढत आहे.
आणि
मेंदूला
करकचून टाकणारी
भांगेसारखी झिंग
शहराला चढलेली ..
आकाशालाही लाजवेल
इतकं चढत जाणार्या
अनावर विजिगीषु लालसांखाली
बुजत चाललेल्या
माणूसपणाचं थडगं आहे
हे शहर !
गुलमोहर:
शेअर करा
मस्तंय! कोलटकरांची 'उतरंड'
मस्तंय!
कोलटकरांची 'उतरंड' कविता आठवली.
ट्रॉयवर ट्रॉय..
व्वा...!
व्वा...!
वास्तव
वास्तव मांडलंय.
------------------------------------------------------------
फोफावलेलं Infrastructure आणि रोडावलेलं Culture
अशी अवस्था झालेय या शहराची.
आवडली
आवडली
धन्यवाद ...
धन्यवाद ...
खरंच जबरदस्त आहे ही कविता.
खरंच जबरदस्त आहे ही कविता. कशी काय मिसली आजवर
कविता आवडली. शेवटच्या
कविता आवडली.
शेवटच्या paragraph शी रेंगाळलो.