रुदन..

Submitted by shashank pratapwar on 19 April, 2011 - 10:13

माझे आभाळ निखारे,
तुला वाटते चांदण,
माझ्या उदास दाराला,
लावू नकोस तोरण.

निमिषांचा खेळ पाठी,
तुझा स्पर्श या खांद्याला,
उन्मळून पडे सारे,
बांध फुटे आधाराला.

सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन.

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

"सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन."

...... छान

संपुर्ण कविता भावली..
विशेषकरून...
>>सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन. >> हे जास्ती आवडलं.. Happy

माझ्या आवडत्या १०त..

पुलेशु!!

सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन.
-------------------------- क्या बात !!!

सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन.........वाह!

सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन...>>>......वाह.. भिडलेच !!
संपुर्ण कविता अप्रतिम !!

आयशप्पथ..! सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही...!

सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन.>>

व्वा!! Happy