मी? - एक मासा!

Submitted by निनाव on 19 April, 2011 - 15:45

मी?
एक मासा.
नुकताच जन्मास आलेला
आताच पोहायला शिकलेला
खोल पाण्यास भीत नसलो जरी
अजुन शिरत नाही मी सहसा
मोठे मासेच नसतात तिथं फक्त
आप्-आपले काटे लावून बसतात
तिथं मासेमार ही !
पण,
राहवत नाही मला
खोल सागराचा मोह
आवरत नाही मला...
मग जातो तोल मनाचा
अन घेतो दीर्ध श्वास मी
मारतो मग एक मोठी उडी
आणि...
क्षणांत सर्वं कसं गार-गार, आणिक शांत
हरवून जातो मग त्या निळ्या पाण्यांत मी
सागर तळी,
मोती शिंपल्यात...
वाटत नाही मग काट्यांची भिती
अन मोठ्या माश्यांची ही
काटे नसतातच मुळी माझ्या साठी
मी छोटा आहे ना अजुन
जातो निघून दोन फासांच्या मधून
शिवाय, पकडून मला उपयोग तसा नाही
मेहनतच जास्त - भाव काही नाही!
होते धडक मोठ्या माश्यांशी कधी
स्पर्श काट्यास नकळत होते कधी
पण धडपडत नाही मी
अन अडकत नाही मी
पकडले तर जायचेच आहे-
आज्-न-उद्या
म्हणून का पोहायचेच नाही कधी?
इतरांचे पोहणे अखेर
खोलावर
बघायचे तरी किती?
मला साधा मासा व्हायचे आहे
- देवमासा नाही
मला माझ्या सारखे पोहायचे आहे
- कुणा सारखे नाही
अन मला साधे पोहायचे आहे..इतरांसोबत
-पाण्यातले खेळ शिकायचे नाही
जग पाहायचे आहे मला- जग जिंकायचे नाही!
.
.
.
मी,..
एक मासा
भिजलेला
सागरातच वसलेला
माश्यांच्याच वस्तीत
थोडसं अंगात भिनलेला
अल्हड
वेळ कमी असलेला
काट्यांस लपलेला
किनारी लागण्याच्या आधी
घेतो आहे भिजून...
पाण्यात
मी, एक मासा!

गुलमोहर: