चंद्रा च्या कुशी खालून

Submitted by निनाव on 19 April, 2011 - 14:31

***हि कविता थोडी जुनी आहे. इथे देत आहे. ***

-- चंद्रा च्या कुशी खालून --

चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
त्यास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?

दिवस उजाडुच नये कधी
वाटत तिला ही असेल
मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना
जीव तारकांचा का आवळत असेल?

चंद्रा च्या कुशी खालून
खेचून पदर अलगद पहाटे
उतरत आंथरुणातून रात्र जेंव्हा असेल
सुटलेल्या केसांमधुनी
लाज आवरत पदरा खालील
मन तिचे का बांवरत नसेल?

मधु-चंद्र काय असावे
चंद्रास का ते कळत असेल?
रोजच असते रात्र त्याचीच
मोह मिलना चे का उमगत असेल?

चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
त्यास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?

गुलमोहर: 

श्री, अशोकदा, किके, राजेश्वर: आभार.

राजेश्वर : जुनी ह्या साठीच कि कविता दोन्-तीन आठवड्यांपुर्वी लिहुन झाली होती. मा बो वर लगेच प्रकाशित करणे झाले नाही.