Submitted by पाषाणभेद on 19 April, 2011 - 16:52
भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०४/२०११
गुलमोहर:
शेअर करा
पाभे, तुम्ही जबर्दस्त
पाभे, तुम्ही जबर्दस्त वर्साटाईल कलाकार आहात. - जबर्या!
खूप शुभेच्छा!
-आ. निनाव.
पाषाणभेदा -छान जमलीय. उत्तम
पाषाणभेदा -छान जमलीय. उत्तम !!