मावळतीचं आयुष्यं

Submitted by कमलेश पाटील on 19 April, 2011 - 22:23

तुझ्या आठवणींच्या चेहर्‍यावरती;
आता वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्यात;
रस्त्यावर बसणार्‍या भिकार्‍याच्या चेहर्‍याप्रमाणे.

धुसर आणी विरळ होत जाणार्‍या तुझ्याविषयी;
काही न वाटण्याच्या काळात नकळत;
वाटतात त्या काहीच न घडल्याप्रमाणे.

कधीतरी वाटत राहत काहीतरी चुकतंय;
खोल आत काहीतरी हातातून निसटतय;
देवार्‍यात मंद जळाणार्‍या नंदादीपाप्रमाणे.

मनावरची तुझ्या विचारांची जिवघेणी वलयं;
उदबत्तिच्या धुरासारखी हवेत विरुन जातायत;
सुगंधीत करुन माझ मन गाभार्‍याप्रमाणे.

नव्याने भेटलेला तुझा आकार आणी भुतकाळातला वकार;
या दोघांविषयी सारखंच प्रेम वाटू लागलयं;
एखाद्या शोडषवर्षीय निष्पाप नवतरुणीप्रमाणे.

पण मावळतीकडे झुकू लागलेल्या आयुष्याच्या सावल्या;
मला परवानगीच देत नाहीत तुझ्याकडे उगम पावण्याची;
पण मी मात्र पुन्हा पुन्हा पल्लवित होतेय मावळतीच्या सुर्याप्रमाणे.

गुलमोहर: