होणारे होईल जे कविता किरण

होणारे होईल जे.........

Submitted by Kiran.. on 3 May, 2011 - 14:45

होणारे होईल जे,
तुम्ही का जागे ...........||धृ ||

भयापोटी टाळली जी,
मृत्यूची ठिकाणे
कोसळावी वीज घरी,
बुडावे शहाणे
चिंतेपायी उरावेत,
तगादेच मागे .............. || १||

वार्धक्याच्या चाहुलीने,
यौवन गिळावे
बोळक्या या दातांनी हो,
चणे कैसे खावे
आज नव्या वस्त्राचेही,
विरतील धागे ................||२||

काडी काडी घरट्याला,
शोधीत फिरावे
दाणापाणी पिलांसाठी,
चोचीत भरावे
पंख तुझे त्यांना दे रे,
सांज हेच सांगे..............||३||

गाडलाशी तंबू तेव्हा,
कर्तव्याच्या द्वारी
पदरात निराशाच,
पडली रे सारी
स्वतःसाठी, स्वतःतून,

गुलमोहर: 
Subscribe to RSS - होणारे होईल जे कविता किरण