होणारे होईल जे.........

Submitted by Kiran.. on 3 May, 2011 - 14:45

होणारे होईल जे,
तुम्ही का जागे ...........||धृ ||

भयापोटी टाळली जी,
मृत्यूची ठिकाणे
कोसळावी वीज घरी,
बुडावे शहाणे
चिंतेपायी उरावेत,
तगादेच मागे .............. || १||

वार्धक्याच्या चाहुलीने,
यौवन गिळावे
बोळक्या या दातांनी हो,
चणे कैसे खावे
आज नव्या वस्त्राचेही,
विरतील धागे ................||२||

काडी काडी घरट्याला,
शोधीत फिरावे
दाणापाणी पिलांसाठी,
चोचीत भरावे
पंख तुझे त्यांना दे रे,
सांज हेच सांगे..............||३||

गाडलाशी तंबू तेव्हा,
कर्तव्याच्या द्वारी
पदरात निराशाच,
पडली रे सारी
स्वतःसाठी, स्वतःतून,
व्हावे मग राजे.............. ||४||

किरण

गुलमोहर: 

भयापोटी टाळली जो >>> इथे जी हवे ना?
मृत्यूची ठिकाणे
कोसळावी वीज घरी,
बुडावे शहाणे
चिंतेपायी उरावेत,
तगादेच मागे .............. || १|| >>> हे कडवे समजले नाही...

बाकी कविता छान आहे. Happy सगळी कडवी फार आवडली.... विशेषतः शेवटचे. Happy

सानी
धन्यवाद..

टाळली जो..यातला जो हा जरी, जेव्हा या अर्थासाठी बोलीभाषेत वापरतो तसा वापरावासा वाटला. कडव्याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. पाहू कुणी दिला तर.. (स्वतःच स्वतःच्या कवितेचा अर्थ देणं हे जरा अवघड काम आहे Happy )

मस्त रे...किरण्या... पुर्ण समजली नाही पण्... खरंच छान आहे.

(स्वतःच स्वतःच्या कवितेचा अर्थ देणं हे जरा अवघड काम आहे ) >> हे स्वत:चीच कविता स्वतःलाच न समजल्याचे लक्षण आहे.

छान कविता....

कडव्याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. पाहू कुणी दिला तर.. >> आता घ्या अर्थ समजून.....

हे स्वत:चीच कविता स्वतःलाच न समजल्याचे लक्षण आहे.>> हा पहिला अर्थ....

तरी अजुन फुल्या, बेफिकीर, भुंगा इ. साहेबांचे येथे हजेरी लागलेली नाहि.... मग बघा कसे अर्थाचे अनर्थ ( सॉरी अर्थच अर्थ) मिळते ते... Lol Lol Lol

-धने(श)ष

@ चातक

एखाद्याला मृत्यूचं भय वाटल्यानं त्यानं मृत्यूची शक्यता असनारी ठिकाणं टाळली. घरी राहणंच पसंत केलं तर घरावर वीज पडून तो मृत्युमुखी पडला. थोडक्यात उद्याच्या चिंतेने आज मरण्यात काही अर्थ नाही असा एकंदर सूर कवितेत आहे. म्हातारपणीच्या काळजीने तारूण्य निघून जातं, मुलांची शिक्षणं, लग्नं इतकं करूनही पुढे निराशाच पदरी पडू शकते.

आयुष्यात स्वतःसाठी दोन क्षण जगणे होतच नाही.. असा सर्वसाधारण अर्थ असावा असं दिसतंय.

प्रत्येकाचा कवितेकडे बघण्याचा अर्थ निराळा असतो. त्याला ती कविता जशी दिसेल तोच त्या कवितेचा अर्थ असतो असे संकेत आहेत. त्यामुळं कवीने नाईलाजाशिवाय अर्थ देऊ नये असं म्हटलं जातं. अर्थात तुम्ही एक प्रथितयश साहीत्यकार असल्याने तुम्हाला या बाबी माहीत असणारच म्हणा. ( तुमचं मत खूपच बोल्ड आहे बुवा पण तुमच्या नेहमीच्या ज्ञात प्रोफाईलने ते दिले गेले असते तर... Wink )

श्री. सोनावणे साहेब, हे मी समजुन आहे की, कविता करताना मनातल्या भावना शब्दात उतरवणेच नाही; तर त्या शब्दातुन दुसर्‍याला समजाउन देणे हे फार अवघडच नाही; तर अशक्यप्राय काम आहे. कारण त्या क्षणीचे 'फिलींग्स' 'भावनांना' कधी कधी शब्दात बांधताच येत नाही. त्या शब्दांच्या पलीकड्ल्या असतात.

'किरण्यके आणि मी' आमच्यात एक समंजस असा करार आहे माबोवर. त्यांच्या कडुन मला अपेक्षीत असलेला प्रतिसाद माझ्या प्रतिसादाखालीच आहे. मी त्यावर समाधानी आहे. हे त्यांनाही न बोलता माहीत आहे.

तरी, आपण कवितेला अर्थ लावुन, वेळकाढुन, समजउन, टायपण्याचे केले हे खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला झालेल्या तसदी बद्दल मी मनापासुन दिलगीर आहे.

( तुमचं मत खूपच बोल्ड आहे बुवा पण तुमच्या नेहमीच्या ज्ञात प्रोफाईलने ते दिले गेले असते तर... ) >> Lol

तरी अजुन फुल्या, बेफिकीर, भुंगा इ. साहेबांचे येथे हजेरी लागलेली नाहि.... मग बघा कसे अर्थाचे अनर्थ ( सॉरी अर्थच अर्थ) मिळते ते.

>>>>>

धनेश उचक्या लागल्या ना रे मला....... किती मनापासून आठवण काढलीस........ !!! Wink
सध्या जरा निरर्थक अर्थ काढण्याच्या कौशल्याला गंज चढलाय. ईथला माझा वावर कमी झाल्याचे हे लक्षण असावे बहुतेक Proud

आणि किरण्यके आणि चातक प्रभृती जोमात असताना, आपण पामरांनी रोमातच रहाणे बरे...... Happy

किरण्यके आणि चातक प्रभृती जोमात असताना, आपण पामरांनी रोमातच रहाणे बरे...... >> अगदि बरोबर..

बाकि दोघे कुठे आहेत.... वाट बघुन बघुन दमलो.. बहुतेक त्याना उचक्या लागल्या नसतिल... Happy