घर कुठलंही असो, सकाळी साडे आठ- नऊची वेळ
तव्यावरच्या पोळीला, कुणी बाई लावत असते तेल ।
ओट्यामागच्या खिडकीतून येत असतो सूर्यप्रकाश
पोळ्या लाटून भाजायचं काम, चालू असतं सावकाश ।
ज्याला कधीच 'पोळत' नाही, अशा गोल 'पोळ'पाटावर
भाजली जाणारी प्रत्येक पोळी, लाटली जाते काठावर ।
एखादी पोर जशी वाढते, बापाच्या अंगा-खांद्यावर खेळत
तशीच पोळी गोल होते, पोळपाटावर लोळत ।
सासरी जाताना, लेक रडते बापाच्या गळ्यात पडून
तशीच कधी राहते पोळी, पोळपाटावर अडून ।
तरी जावंच लागतं पोरीला, बापाचं घर सोडून,
पोळीलाही तव्यावर ठेवतात, उचलून अगर तोडून ।
तव्यासारखा तापट नवरा, शेगडीसारखी सासू
तरी फुलायचं आनंदानं, लपवायचे आसू ।
असंच करते पोळी, अन् पोळली जाते, भाजली जाते
तोडून, चावून चवीने मग, जेवणामध्ये खाल्ली जाते ।
ती पोळ्या करणारी बाईसुद्धा पोळीच असते खरोखर
पोळले जातात तिचेही हात, पोळीच्याचबरोबर ।
पूर्वी काय, आत्ता काय, चूल तीच, शेगडी तीच
पोळून काढते सगळीकडून अशी त्यातली आग तीच ।
पण ती बाई रडते का? - रडत नाही, काम करते,हसत असते
ओट्यामागच्या खिडकीबाहेर, मोगऱ्याची वेल बघत असते ।
पोळ्या लाटताना होणारा बांगड्यांचा आवाज असतो सोबत
तुटूनसुद्धा तृप्ती द्यायला बाई असते राबत ।
मग ती पगारी बाई असो,
आजी किंवा आई असो
पोळ्या करणारी बाई घेऊन येते पोळीचाच 'वारसा',
पण, आपण फक्त पोळी खातो, गरम पोळी
त्या वारशाशी आपला संबंध नसतो फारसा !!
- चैतन्य
(तळटीप- याला कुणी गद्य म्हणा वा पद्य, जसं सुचलं तसं लिहिलं आहे, आवडल्यास उत्तम, न आवडल्यास उत्तम.
)
जे काही आहे ते आवडलं ब्वॉ
जे काही आहे ते आवडलं ब्वॉ
चैतन्य...किती साध्या शब्दात
चैतन्य...किती साध्या शब्दात व्यक्त केलस रे स्त्रीचं जीवन!! आवडली कविता!
छान रे चैतन्य, तुला एक गोड
छान रे चैतन्य, तुला एक गोड गोड पप्पी...
(लाजु नको..आवडली रचना)
मस्त रे ! छानच लिहीलयस !
मस्त रे ! छानच लिहीलयस ! आवडली कविता !
चैतन्य, साधीशीच पण सुंदर रचना
चैतन्य, साधीशीच पण सुंदर रचना आहे.
खरच, मस्त जमली, अप्रतिम. अजुन
खरच, मस्त जमली, अप्रतिम.
अजुन काय लिहु, मित्रा. मस्त मस्त मस्त.
मस्तच रे चैतन्य
मस्तच रे चैतन्य
छान आहे
छान आहे
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे !
आवडली कविता ! चांगलं लिहिलंय
आवडली कविता !
चांगलं लिहिलंय !!!
जमून आलेली पोळी..........
जमून आलेली पोळी..........
“ज्याला कधीच 'पोळत' नाही, अशा
“ज्याला कधीच 'पोळत' नाही, अशा गोल 'पोळ'पाटावर
भाजली जाणारी प्रत्येक पोळी, लाटली जाते काठावर”
...... पोळणे, पोळपाट या शब्दांचा आशयपूर्ण शब्दखेळ मस्तच.
पोळी, तवा, चूल इ. प्रतीकांचा वापर चपखल.....
वेगळ्या पद्धतीने विषयाची मांडणी..... कविता आवडली.
जम्याच रे... प्रचंड आवडेश
जम्याच रे... प्रचंड आवडेश
प्रतिसादांबद्दल सर्वांचा
प्रतिसादांबद्दल सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे !
अरे काय अभिनव कल्पना आहे!!!!
अरे काय अभिनव कल्पना आहे!!!! फारच आवडली ही कविता
तिची लय तर सुंदर आहेच... पण त्यातला संवेदनक्षम भाव फार छान पोहोचलाय...
"आधी हाताले चटके मग मिळते भाकर" म्हणणार्या बहिणाबाईंचीच आठवण झाली. त्यांनी चटके सोसले आणि ते दु:ख आणि अनुभूती त्यांच्या कवितेत उतरली. चैतन्य, तुला स्त्री चे जीवन इतके छान उमगले, तुझ्या संवेदनशीलतेचे कौतुक करावे तितके थोडे!!!
एकदम भावूक. आवडली.
एकदम भावूक. आवडली.
मस्त!
मस्त!
पोळी आणि स्त्रिची तुलना
पोळी आणि स्त्रिची तुलना पहिल्यांदाच पाहिली पण छान जमली.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुनश्च आभार !
ग्रेट.
ग्रेट.
फार सुंदर!!!!
फार सुंदर!!!!
अरे वा ! मस्त ! आवडली
अरे वा ! मस्त ! आवडली
सुंदर...
सुंदर...

सुंदर कविता .सुसंगतपणे सुंदर
सुंदर कविता .सुसंगतपणे सुंदर विचार फुलवत रुजवत जाते .आवडली.