या आईला तर काही, काही कळत नाही..
------------------------------------------
या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा..जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते..खाण्यासाठी रागे भरते
इतक्या सक्काळी सक्काळी ..भूक लागत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही .................................१
दूध पितां पिता कार्टून , बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते..बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते..रडू देत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही..................................२
कपडे, भांग, पावडर, शूज..सारं करून देते
बस येईल म्हणून मला ..बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून..भरभर येते
फूल तोडून देते तिला..कौतुकच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................३
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू...एव्हढेच म्हणते
अभ्यास काय दिलाय माझा.. हेच पाहत बसते
तिचं चित्रं काढलेलं...लक्ष देत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही...................................४
होमवर्क..खाणं, क्राफ्ट ..डायरी शोधते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं, कळतच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही..................................५
दमून जाऊन झोप येते..आईला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला या, जरा वेळ नाही
पापा घेत राहते तेव्हां ..अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला चालत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही.................................६
संध्या
३१ ऒगस्ट २०१०
११:१९ PM
( या आधी ऑर्कूटवर पोस्ट केलेली )
संध्या, ही कविता पण
संध्या, ही कविता पण आवडली.
-------
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू...एव्हढेच म्हणते
अभ्यास काय दिलाय माझा.. हेच पाहत बसते
तिचं चित्रं काढलेलं...लक्ष देत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही
-------
- हे माझ्याबाबतीत झालेलं आहे. पु.ले.शु.
मस्त लिहलंय.
मस्त लिहलंय.
मस्त लिहिलय आवडली कविता...
मस्त लिहिलय
आवडली कविता...
मानसी, हंसा, चिमुरी
मानसी, हंसा, चिमुरी
मानसी...बहुतेक सगळीकडे असंच असतं
खुपच छान..
खुपच छान..
मस्त! लहान मुलांचे विचार
मस्त!
लहान मुलांचे विचार आपल्याला समजत नाहीत असं आपण म्हणतो,
आणि लहान मुलंपण 'या मोठ्यांना काही कळतच नाही' असं म्हणतात
आवडली कविता !
या पोरीला तर काही, काही कळत
या पोरीला तर काही, काही कळत नाही. >>>
छान लिहिलयं.
मस्त. ईथे वाचुन रियलाईज झाल,
मस्त. ईथे वाचुन रियलाईज झाल, मी पण आधी घरी जाउन आधी लेकाचा ड्बा चेक करते
प्रचंड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्
प्रचंड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड आवडली.... शो शो शो शो श्वित!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त
मस्त
मस्त लिहलंय.
मस्त लिहलंय.
सहीये!
सहीये!
मस्त...
मस्त...
मस्त आहे.
मस्त आहे.
छानच
छानच
सुंदर मांडलंय एक लोभस नातं !
सुंदर मांडलंय एक लोभस नातं !
आणि लहान मुलंपण 'या मोठ्यांना
आणि लहान मुलंपण 'या मोठ्यांना काही कळतच नाही' असं म्हणतात ...@ चैतन्य, अगदी !!
एकदम मस्त ! अस होतं बर का ! दुसरा सांगेपर्यंत आपण असं करतो हे जाणवत नाही. माझ्या बाबतीत खूपदा होतं हे..
@ मोनाली ,
मन मानसी, गब्बर, सानी, भरतजी, सनि, वत्सला, अजो, बागुलबुवा, विशाल, भाऊ... तुम्हा सगळ्यांच्या प्रतिकिया वाचून खूपच छान वाटलं... थँक यू फ्रेंडस
खुपच छान.. साधी आणि मस्त..
खुपच छान..
साधी आणि मस्त..
माझा आवडता विषय आहे... घरोघरी
माझा आवडता विषय आहे... घरोघरी मातीच्याच चुली
आई इतकं करते म्हणूनच पिल्ल
आई इतकं करते म्हणूनच पिल्ल तिलाच चिकटतात. पूर्वी बाबांना टरकून असायचो आम्ही. आता पिल्ल अजिबात भाव देत नाहीत
मस्त
सुंदर...अगदी लहान मुलीच्या
सुंदर...अगदी लहान मुलीच्या शब्दांत वाचली. क्यूट.
एक शेर आठवला..
रहने दो बच्चोको वैसेही
बच्चो जैसे
चार किताबे पढके
वोभी हमारे जैसे बन जायेंगे
उमेश
उमेश
सुंदर कविता.. माझ्या बाबतीत
सुंदर कविता.. माझ्या बाबतीत जरा उलटं चित्र असतं.. माझी श्रावणी म्हणते 'आई, तुला कसं काय सगळं कळतं गं?' त्यावर माझं नेहमीचं उत्तर असतं 'मी तुझी आई आहे ना म्हणुन! आणि तुलाही सगळं कळतं ना. तसंच!'......
मस्त पल्ले >> अगदी १०० मोदक
मस्त

पल्ले >> अगदी १०० मोदक
छान कविता......
छान कविता......
हल्लीच्या पिल्लांना बुद्धी
हल्लीच्या पिल्लांना बुद्धी आपल्यापेक्षा जास्तच आहे !!
या आईला (आणि बाबांनाही) तर काही कळत नाही
शंभर टक्के सहमत
छान..
छान..
सांज संध्याजी झक्कास.
सांज संध्याजी
झक्कास.
मस्तच
मस्तच
खूपच गोड..........
खूपच गोड..........
Pages