नेमाने घडते सारे

Submitted by श्यामली on 8 May, 2011 - 02:16

नेमाने घडते सारे...थांबले कुठे ना काही
तरीही सलते अजुनही आता; नाहीस ग आई

प्राजक्ताचा तसाच दरवळ
वेलींवर फुलतेही जाई...
नाहीस तू ; तरीही..आई

अंगणातली तुळस तुझ्या ग
आता गाते अंगाई
नाहीस तू; म्हणून.. आई

दार काढते दृष्ट आता अन
आशीर्वाद उंबरा देई
नाहीस तू; म्हणून ..आई

गुलमोहर: 

श्यामली, बडे अर्से के बाद.तब्बल पाच ४ महिन्यांनी कविता वाचतोय तुमची. अगदी खरं आहे.. नेमानेच घडतं आहे सारं १४ वर्षापासून. Sad

धन्यवाद लोकहो,
असल काही लिहायच नाही अस ठरवूनसुद्धा..हे लिहिलच काल मी. असो..
नाखु. खरय लिहाव वाटल नव्हत हेच खरं, आवर्जून कळवलत त्याबद्दल तुमचे विशेष आभार.