पैलतीर

Submitted by manisht on 8 May, 2011 - 05:50

भौतीक सुखासंगे धावलो
भोक्ता मी साधनांचा
पैलतीर दिसे आता
अंतःकाळ जवळी आला

न कुठे बांधिली नाती
न कोणी सखे सोबती
भवती मुंगळे सुखाचे
न कोणी अंती संगती

विषय भजनी लगलो
स्तवलो बोल फुकचे
मुखे हरिनाम घेतले नाही
आता हरिध्यास लागे

पिकले पान वेलीवरचे
देठही न हिरवे आता
उडे अंतराळी आत्मा
उरे फक्त पाचोळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा.. वा.. अप्रत्तिम कविता....!
सर्वच कडवे अगदी मना पासुन आवडले.

एकदम 'स्टँडर्ड' रचना.