विनोदी लेखन

मॅच

Submitted by कवठीचाफा on 14 December, 2011 - 10:55

"येत्या सहामाहीत आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच घेतोय" सकाळच्या प्लॅनिंग मीटिंग नावाच्या टाईमपास सेशनमधे बॉसनं तोफ डागली.
" आँ "
" कसली ?"
आणि काहीश्या चमत्कारिक आवाजात प्रतिक्रिया उमटल्या
" आपण येत्या सहामाहीत पुण्यातल्या कंपनीच्या टीम बरोबर क्रिकेटची मॅच घेणार आहोत " बॉसच्या या निवेदनावर आमच्या गोटात उत्साह सळसळला.
" मॅच स्टेडियमवर असेल, किमान पन्नास ओव्हर्सची आणि सीझन बॉलवर खेळायची आहे " उत्साह आणखी वाढला
" आपल्याला ट्रेनिंग द्यायला एक प्रशिक्षक बोलावला आहे तो परवा येईल, त्याच्या बरोबर रोज किमान दोन तास सराव करणं गरजेचं आहे " उत्साह चरमसीमेला भिडला.

गुलमोहर: 

स्वप्न

Submitted by राजेश्वर on 9 December, 2011 - 04:38

स्वप्न,
दिवसा स्वप्न, रात्री स्वप्न, जागेपणी, झोपेत, उठता, बसता स्वप्न पाहता येतात. स्वप्न का पडतात यावर चर्चा न करता,या स्वप्नाचा आनंद घेण्यात मजा आहे. आता बघा ना. मला नेहमी झोपेत असतांना पडणारे स्वप्न वाचा , परीक्षा जवळ आली असते (कोणत्या वर्गाची ते कळत नाही) नेहमी प्रमाणे अभ्यास झालेला नसतो. मग खुप तणाव येतो आणी या तणावत मग एखाद्यावेळेस जाग येते. तेव्हा इतके हायसे वाटते म्हणुन सांगु. तो आनंद अवर्णनीय आहे कारण अभ्यास नाही परिक्षा नाही अन मग शांत झोप.
अजुन काही स्वप्न आहेत ते पुढे सांगेलच, तुर्तास आपल्या स्वप्नाचे स्वागत.

गुलमोहर: 

ब्लु फिल्म.

Submitted by A M I T on 29 November, 2011 - 00:43

(वैधानिक इशारा : हा लेख वाचण्यासाठी वाचकाचे शारीरीक आणि मानसिक वय १८ वर्षे पुर्ण असणे
आवश्यक आहे. Proud )

"साला, जेव्हा मला नोकरी लागेल ना, तेव्हा आपण पिझ्झा ऑर्डर करायचा." पक्या आपल्या हातातील भेळेचा शेवटचा बकाणा तोंडात भरत भेळ संपवत म्हणाला.

"नायतर काय? किती दिवस नुसतीच भेळ चापायची..!" एव्हाना गोपाळनेही आपली भेळ संपवली होती.

पक्या आणि गोपाळला भेळेचा प्रश्न 'भेळ'सावत होता.

गुलमोहर: 

"तुमचं तुमच्या बायकोवर खरंच प्रेम आहे का हो???"

Submitted by भुंगा on 26 November, 2011 - 05:50

शनिवार तसा आरामाचाच असतो.......
ऑफिसातसुध्दा अगदी ड्रेसपासून ते कामापर्यंत सगळ्यातच सूट असते. थोडक्यात आठवड्याभराचा रिव्ह्यू आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करायचा वार म्हणजे शनिवार... अगदी सगळा स्टाफ पण अ‍ॅट इज असतो. त्यामुळे फावल्या वेळात गप्पा टप्पाच जास्त.

गुलमोहर: 

माझा स्पेलिंग बी स्पर्धेतील सहभाग

Submitted by मोहना on 22 November, 2011 - 19:53

"आई, मी स्पेलिंग बी मध्ये भाग घेतेय." मुलीने जाहिर केलं आणि माझा चेहरा खाडकन उतरला.
"अगं त्यासाठी स्पेलिंग यावी लागतात." माझ्या स्वरातली अजीजी तिच्या पर्यंत पोचली नाही.
"मग?"
"मला येत नाहीत."
"पण भाग मी घेणार आहे. खी खी खी...."
"हो, पण तुझी तयारी मला करुन घ्यावी लागेल नं." माझं केविलवाणं स्मित.
"ईऽऽऽ त्यात काय आहे. तू मला शब्द विचार, मी स्पेलिंग सांगेन."
"अगं पण ते शब्द विचारता यायला हवेत ना मला?"
मुलगा फजिती बघायला उभा होताच. फजितीची फटफजिती झाली तर पहावी म्हणून तोही मध्ये पडला.
"बाबा तर म्हणत होता तुझ्याकडे इथली पण पदवी आहे."
"शिक्षणाचा काही उपयोग नसतो काहीवेळेस"

गुलमोहर: 

‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी !

Submitted by राफा on 21 November, 2011 - 09:17

झुरळ हा पकशी आहे काय ? ह्या अंत्याच्या प्रश्नाने आमी गानगरुनच गेलो. अंत्या मदेच असे पायाखालची जमिन सळो कि पळो वाव्ही असे प्रशन विचारत आस्तो. पर्वा त्याची कटिंग जालेली आसल्याने तेच्या भांगाची लाइन दोन शेतामदल्या बांधासारखी दिसत होति व दोनी बाजूला साइडला हिरवे व मदे काळेकबिन्न अशा कापलेल्या केसांचे शेत त्याच्या डोक्याच्या वरती पसरले होते. खरोखरिच अंत्याचे डोके फारच सुपिक आहे ज्यातून की कुठला प्रशन कोणच्या वेळेस उगवेल हे कोणालाच सांगता येत नाही. (माईणकरच्या मात्र उजव्या मेन्दुची अवाजवी वाढ झाल्याने त्याचा भांग नीट पडत नाही).

गुलमोहर: 

दात-किती वेळा ?

Submitted by bnlele on 20 November, 2011 - 07:17

माणसांना दांत तीनदा येतात ... हॊ तीनदा

प्रथम दुधाचे, मग मधाचे,आणि तिसरे - विचकायचे !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ये दिल है नखरेवाला..!

Submitted by A M I T on 17 November, 2011 - 00:09

चिविंच्या एका विधानात शुल्लक बदल करून मी म्हणेन, 'ऑफीसातील रूक्ष जीवनातील शुष्कपणा घालवून त्यात नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठी ऑफीसात एखादी तरूण सुंदर 'रिसेप्शनिस्ट' असावी, अशी योजना ज्याच्या मेंदूतून साकार झाली त्या महाचतूर इसमास माझे त्रिवार दंडवत..!

१५ दिवसांपुर्वीच आमच्या ऑफीसातल्या 'लीला' नामल रिसेप्शनिस्टच्या प्रणय'लीला' संपुष्टात आल्या आणि आमच्या ऑफीसात अवकळा पसरली.

त्याचे झाले असे...
आमच्या ऑफीसातील तथाकथित रिसेप्शनिस्ट मिस लीला ही मिसेस लीला होण्याआधी तिची ऑफीसात हाता-पायांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत, इतकी लफडी अस्तित्वात होती. ती नेहमीच कुणाबरोबर तरी 'डेट'वर असे.

गुलमोहर: 

काका आणि राजेशाही लगीन

Submitted by प्रतिमध्यम on 13 November, 2011 - 08:15

पोंक्षे काका आज जरा गडबडीत होते. सकाळी सकाळी लुना काढून मार्केटात फिरत होते. पोंक्ष्यांची ठेवण जरा कोकणीच होती.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन