विनोदी लेखन

MARATHI VINOD

Submitted by velekar.amit on 16 February, 2012 - 03:53

थकलेल्या बंडूला डॉक्टर ने सल्ला दिला "तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. असे करा उद्या सुट्टी घ्या. बाजारातून रंग आणि कैनवास खरेदी करा आणि पेंटिंग करा. भरपूर मजा येईल."

जेव्हा दोन दिवसांनी बंडू सुजलेल्या डोळ्यांनी डॉक्टर कडे परत गेला.

डॉक्टर बोलले - हे काय झाले डोळे का सुजले आहेत?

बंडू - तुम्ही पेंटिंग करण्याचा सल्ला दिला होताना. दोन दिवस नेहमी दिवस रात्र जागून मी पेंटिंग करत होतो.

FOR MORE MARATHI JOKES AND FUN
CLICK HERE

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाककृती..

Submitted by Kiran.. on 11 February, 2012 - 00:25

अपरंपरागत पाककृतीसाठी या बाफचा उपयोग करावा.

साखरेचा पाक

एक/दोन तारी पाक

२ वाट्या साखर १ वाटी पाणी घ्यावे. पाणी पिऊन टाकावे. वरून साखर खावी. नंतर गॅसवर बसून पाक करायला ठेवावा. उकळी आली की गॅस मंद करावा. २ मिनिटे चांगले उकळल्यावर, दोन बोटाच्या चिमटीत एक तार धरून पहावी. ही तार पाच अ‍ॅम्पिअरच्या सॉकेटमधून आलेली असावी. एकच तार बोटात धरून बटण चालू करायला सांगावे. अशा पद्धतीने एकतारी पाक तयार होतो.

हा पाक रवाबेसन लाडू,मोतीचूर लाडू,राघवदास लाडू, जिलेबी (एकतारी) साठी छान असतो.

गुलमोहर: 

अमृततुल्य चहा स्पेशल

Submitted by राज जैन on 10 February, 2012 - 01:41

घरी कोणी नसणे व घरात दुध असणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. तर योगायोगाने हा योग आमच्या नशिबी आज चालू आला. मातोश्री लग्नकार्याकरिता म्हणून बाहेरगावी व आमच्या सौ. मुंबईत. तेव्हा किचन का राजा कोण Wink
काय ही तरी करावे.. काही तरी करावे ही मनात दडपून ठेवलेली इच्छा आज पुर्ण होण्याचा पुर्ण 'राज'मार्ग मला दिसत होता.
मस्तपैकी एक गाणे चालू केले (Rihanna-Dont Stop The Music).
स्वंयपाक घरात प्रवेश केला व चहा ठेवण्यासाठी पातेले शोधण्याचा महान उद्योग चालू केला. पण योग्य त्या आकाराचे भांडे काही केल्या सापडले नाही म्हणून सरतेशेवटी ( Wink ) ज्या मध्ये दुध होते तेच भांडे गॅसवर ठेवले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सूक्ष्म पातळीवरील गप्पा

Submitted by मंदार-जोशी on 7 February, 2012 - 01:52

काल दुपारी अमेरिका खंड अचानक वर आला अर्थात पहिल्या पानावर दिसू लागला. त्यातली काही पाने परिचयाची होती तर काही अस्तित्वात आहेत हे सुद्धा माहित नव्हते. भा.प्र.वे. प्रमाणे रात्री साधारण आठ ते साडेआठ दरम्यान अचानक युरोप खंड वर आला. मायबोलीवरच्या माझ्या दोन वर्ष आणि सदतीस आठवड्यांच्या आयुष्यात ही शहरे आणि देश मी पहिल्यांदाच बघत होतो. मग लक्षात आलं की मराठी भाषा दिनानिमित्त संयोजक जवळजवळ प्रत्येक गप्पांच्या पानावर जाहीरात डकवत आहेत.

गुलमोहर: 

डॉन २

Submitted by बेफ़िकीर on 30 January, 2012 - 06:08

डॉन टू हा चित्रपट आल्याचे मला मायबोली या एका मराठी संकेतस्थळावर समजले. त्या संकेतस्थळावर एक धागा आला होता की डॉन टू हा चित्रपट भिकार, सुमार व टुकार या विशेषणांचे रासायनिक मिश्रण आहे. (त्या संकेतस्थळावर किमान तीन विशेषणे लावल्याशिवाय कशाचेही वर्णन करण्यास मज्जाव आहे). त्यावर झालेली हमरीतुमरी व त्यात माझा अत्यल्प सहभाग यावर मी खरा तर थांबलोही असतो. पण काही नातेवाईकांच्या आग्रहामुळे प्रत्यक्ष याची देही याची डोळा तो चित्रपट पाहावा लागला. खरे तर चित्रपट पाहून झाले असतील पंधरा दिवस. पण आपण अठ्ठेचाळीस तासात काहीच लिहिले नाही याचे वैषम्य घालवण्यासाठी डॉन टू वर येथे लिहायचेच असे ठरवले.

गुलमोहर: 

टेलिफोनची ट्रॅजेडी !!

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 January, 2012 - 03:52

कुठलीही गोष्ट नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते…… असं कोणीतरी म्हटलंय ना……… ते अगदी मनापासून पटलं गेल्या काही दिवसात. ह्म्म्म्म……. आणि ती गोष्ट म्हणजे आमचा फोन. आमची Land Line. गेल्या दोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽन महिन्यापासून आमचा हा फोन अक्षरश: मृतवत पडला होता. अगदी बघवत नव्हतं हो…….. कधी मधी त्याच्या छातीला कान लावून थोडी तरी धुगधुगी उरलीये का………. हे बघत होतो आम्ही आळीपाळीने. पण कसलं काय…….. ! शेवटी चक्क कोमातच गेला !! कोमात गेला तो आणि मरणप्राय अवस्था झाली आमची.

गुलमोहर: 

माझं थोबाड...

Submitted by राज जैन on 27 January, 2012 - 02:16

" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर " बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.

गुलमोहर: 

पत्र लिहिनेस कारन की मापालिकेचा मासंग्राम !

Submitted by राफा on 19 January, 2012 - 01:13

प्रति :
मान्नीय आमदार भुजंगराव टोपे साहेब उर्फ दादा यासी
शिरसाश्टांग सप्रेम नमस्कार. इशेश इनंती.

कडून :
बबन बैदाबादकर
नगरशेवक

गुलमोहर: 

''भिकार्‍याची श्रीमंती''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 18 January, 2012 - 09:19

( रंगमंचावर फाटक्या जुन्या कपड्यांतला ,दाढीची खुंटे वाढलेला आणि हातात वाडगं घेतलेला भिकारी.)

भिकारी : अल्लाह के नाम पे दे दे बाबा...भगवान के नाम पे दे दे. दो दिनों सें भूखा हूं. काही तरी धर्म करा ओ माई. .... ए बाबा, अरी ओ मेमसाब..... भगवान के नाम पे दे दो. आप मुझे दोगी...भगवान आपको देगा. ... आपका हर टेन्शन दूर करेगा.

(रंगमंचावर युनिफॉर्म घातलेल्या इन्स्पेक्टरचा प्रवेश.)

इन्स्पेक्टर : टेन्शन...... ???? अटेन्शन. मी असताना इथे अजून कोण आला टेन्शन देणारा????

भिकारी : च्या आयला.....

इन्स्पेक्टर : काय? माझ्या आयला????

गुलमोहर: 

कोई 'लोटा' दे !

Submitted by A M I T on 16 January, 2012 - 04:28

'नदीकिनारे जब हगने को बैठते है, तब पीछवाडे मस्त हवा लगती है' इश्किया सिनेमात असाच काहीसा एक डॉयलॉग आहे आणि त्यात बर्‍यापैकी तथ्य आहे.
पण आजच्या घडीला आमच्या गावात त्या डॉयलॉगमधील ती मस्त हवा त्या तथाकथित अवयवाला लाभण्याचं भाग्य एका सरकारी योजनेनं हिरावून घेतलं आणि गावकर्‍यांनी सरकारच्या नावाने बोटे मोडली.

त्यादिवशी सकाळी पांड्या सुतार आपल्या ओसरीच्या पायरीवर दात घाशीत बसला होता. इतक्यात त्याला समोरून नार्‍या धूमाळ आपल्या घराकडे लगबगीने येताना दिसला. क्षणभर पांड्या सुताराची एका बोटाची बत्तीस दातांबरोबर चाललेली घासाघीस थांबली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन