विनोदी लेखन

राशी भविष्य

Submitted by sahebrao ingole on 13 July, 2011 - 03:29

तो हळदी कुंकवाचा दिवस होता. तिने आज हि रोजच्या प्रमाणे साधीच साडी नेसली होती. बायका नटून आल्या होत्या.न राहवून मी हलकेच म्हणालो,
"काय ग, तिथे सर्वन समोर हि साडी चांगली दिसते काय..?..एखादी दुसरी घालायची असती..ती गुलाबी नेस ना..फार छान दिसते.."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गणप्या-भाग १

Submitted by पियु१२३ on 8 July, 2011 - 02:06

(कथेचा नायक गनप्या ,मु.पो.नरसोबावाडीचा,अवखळ ,बिलिन्दर,करामती)
गणप्या भाग-१
नुकतच आमच्या गनप्यास्नी सोळावं (धोक्याच ) वरीस लागलया ,मिसरूड फुटू लागल आन आवाज बी घोगरा व्हाया लागला, रिंगटोन न गडी माणसांचा ना बायकावणी मधीच चीर- चीर चीरकायाचा !
गणप्याला , गणप्या म्हणाल कि तो गडी डाफरायचा म्हणयचा ,"आर तुमच्या बा... ची ,मला गणपत म्हणा कि जरा, गणप्या काय लावलय ?म्या मोठा झालोय आता! तवा गणपत म्हणा कि लेकाच्यानो "

गुलमोहर: 

लवगुरू काळू

Submitted by देवनिनाद on 8 July, 2011 - 01:04

काळूबाळू हे तसे जुळे बंधू. तब्बल ४० वर्ष तमाशातील आपल्या खुमासदार वगनाट्याने अवघ्या महाराष्ट्राला या दोघांनी वेड लावलं ... तमाशा कलावंत काळू तथा लहू खाडे आज आपल्यात नाहीत, आपले भाऊ बाळू यांना जोडीदार म्हणून साथ देणारे काळू यांनी आपल्यातून कायमची एक्झीट घेतली, बाळू यांचा विनोद एकपात्री करून गेले ... तमाशासम्राट काळू यांना मायबोलीकरांकडून भावपुर्ण श्रध्दांजली ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोकणातलो जोक....

Submitted by पियु१२३ on 7 July, 2011 - 02:19

नमस्कार मायबोलिकरानो,
मि पियु ,नविन सदस्य Happy
लिहायला भारी आवडत आणी वाचायलाही
म्हणून सुरुवात एका जोकने करावी म्ह्ट्ल (चु.भु.देने घेने)
कोकणातलो जोक..
(कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस चालु ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापापासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.)

तात्या : मला सांगा बालानु ,जल्ला आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ?
मुले : आई शपथ तात्या,आम्हाला माहित न्हाई हो कुणी ढकलला ?
तात्या :- अस्सा ,खरेच बोलताव काय ,तुका खरच काही माहित नाय?

गुलमोहर: 

हाताची घडी तोंडावर बोट!

Submitted by मोहना on 6 July, 2011 - 11:54

(बदली शिक्षक म्हणून आमच्या राज्यात शाळांमध्ये काम करता येतं. त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील पदवी नसली तरी चालते, पण प्रशिक्षण घ्यावं लागतं. मी तीन चार वर्ष हे काम केलं, तेव्हा आलेल्या अनुभवांपैकी ह्या गमतीदार आठवणी. स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं मात्र झोप उडवतात त्यांच्या वागण्याने आणि ती ज्या परिस्थितीत वाढत असतात ते पाहून. त्यावर नंतर केव्हातरी.)

गुलमोहर: 

वडापाव

Submitted by देवनिनाद on 6 July, 2011 - 06:13

भाऊ- वडापाव वडापाव ...गरम गरम ... स्पेशल लसणाची चटणी असलेला चविष्ट वडापाव

अण्णा - अय्योयो !! अय्यो बाबा काय करतो ...

भाऊ - काय राव, आता मी एवढं मोठ्याने ओरडतोय ... वडापाव वडापाव तरी कळत नाही का.

अण्णा - ते कळतयं कि रं. ........... मला बी नी पब्लीकला बी ... गप गुमान विक की ... माझ्यासारखं

भाऊ- माझी गाडी नवीन आहे ... धंदा चालला पाहीजे .. तूझी इडली बी जूनी आणि धंदा बी ... वडापाव, वडापाव ... गरम गरम ..

अण्णा - अरे ये, ते ओरडायचं सोडून दे की रं. ............ वडा चांगला आसलं तर वासानचं पब्लीक येईल की ..

भाऊ - लेका, वासाचे दिवस गेले. आता, वडा वासानं नाही नावानं कळतो ..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाहिरात

Submitted by प्रसन्न अ on 4 July, 2011 - 11:54

मायबोलीकरांची क्रियेटीव्हता आजमावण्यासाठी हा धागा... Happy

तर विषय हा आहे कि.. प्रत्येक प्रतिसाद कर्त्याने, एक प्रोडक्ट द्यायचं, आणि त्या खालच्या मेम्ब्राने त्याची जाहिरात करून दाखवायची
ति पण एकदम हटके.आणि नवीन प्रोडक्ट टाकायचं
प्रोडक्ट पण एकदम झकास द्यायचं गड्यांनो (आणि गडींनो Wink )

तर सुरुवात मी करतो..
माझ प्रोडक्ट -- "वास" डीओ - डी वास इफ्फेक्ट

असो डीओ जो सर्व पब्लिक ला करील.. बेहोष.. धुंद..
असा वास जो सर्व लोकांना ठेवेल दहा फुट लांब तुमच्यापासून .., गर्दीत ट्राफिक मध्ये तुमची स्वतःची स्पेस जपणारा ..
आणि ह्याचा परिणाम चालेल संपूर्ण १२ तास .....
आजच मारा

गुलमोहर: 

डोक्याची 'आय-झेड'..!

Submitted by A M I T on 1 July, 2011 - 08:02

आमचं ऑफीस जेव्हा फोर्टात होतं, तेव्हा आम्हां समस्त ऑफीसबॉयना काही पावलांच्या अंतरावर बँका होत्या. आम्ही मात्र हाकेच्या अंतरावर स्वर्ग असल्यासारखे आनंदात होतो.

पण जेव्हा ऑफीस बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्सला शीफ्ट झालं, तेव्हा मात्र आमच्या पायांवर गदा आली. साहजिकच नव्याने तिथल्या बँका शोधणं आलं. त्यात काही अंशी आम्ही यशस्वीदेखील झालो.

तरीही व्हायचं ते झालचं..!

बॉसने मला अबक बँकेत एक चेक डिपॉझिट करावयास सांगितला. पण ती बँक तोवर आमच्या पाहण्यात आली नव्हती.

झालं..! आता आली ना पंचाईत..!

मी वश्याला माझी ही बँकेच्या पत्त्याविषयीची अडचण सांगितली.

गुलमोहर: 

बाळ

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2011 - 08:21

लिमये प्रसूती गृहातील एका गूढ खोलीच्या बाहेर एक माणूस अस्वस्थपणे येरझारा घालत आहे. बाहेर येणार्‍या आणि आत जाणार्‍या अशा सर्व नर्सेस प्रचंड वेगात धावत असल्यामुळे आत नेमके काय चालले आहे हा प्रश्न विचारण्याची त्याची छातीच होत नाही आहे. या माणसाची म्हातारी आई जपाची माळ हातात घेऊन वर आढ्याकडे बघत काहीबाही पुटपुटत आहे. या माणसाचा म्हातारा बाप या माणसाला सांगत आहे की तुझ्यावेळेस इतका वेळ लागलेला नव्हता, तू लगेच झाला होतास.

गुलमोहर: 

तो हा विठ्ठल बरवा.. (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)

Submitted by दाद on 24 June, 2011 - 02:04

हे आपलं माझं मत. आपण परदेशात स्था‌ईक होण्यासाठी आपला देश सोडतो ना, तेव्हा आपल्याबरोबर आपल्या संस्कृती-बिंस्कृतीचा एक तुकडा बरोबर घे‌ऊन येतो. तो फ़्रीज़ करतो आणि जपून ठेवतो.... फ़्रोझन अवस्थेत. मग प्रत्येक सुट्टीत गेलो की, किंवा जसं जमेल तसं, त्याला शोभतील असे किंवा बरेचदा विशोभित असे बरेच ’लेटेस्ट हॉट’ तुकडे आयात करतो.... आणि मग आपल्या सो कॉल्ड संस्कृतीची एक तुकड्या-तुकड्यांची गोधडी किंवा बर्‍या भाषेत दुल‌ई तयार होते. मग त्या फ़्रोझन ओरिजिनल तुकड्याला लावलेल्या हॉट तुकड्यांच्या दुल‌ईच्या उबेत बर्‍यापैकी "इन्क्युबेटेड" परदेशी आयुष्य जगतो.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन