आग, वीज आणि पाणी या तीन गोष्टींशी माणसाने कधीही खेळू नये.'
जन्माला आल्यापासून समजायला लागल्यानंतर आमच्या घरातील वडीलधार्या मंडळींनी आम्हाला पोलिओनंतर जर कुठले डोस पाजले असतील, तर ते हेच 'उपदेशाचे डोस'..!
आता अगदी भोवरा फिरवण्यापासून आमचा आवडता 'डॉक्टर डॉक्टर' (या खेळात शेजारची सुमी पेशंट बनण्यास तयार झाल्यावर गोपाळ आणि माझ्यात डॉक्टर बनण्यासाठी प्रसंगी 'कुस्ती' नावाचा तिसराच खेळ होऊन जायचा.) इथपर्यंत इतके नाना प्रकारचे खेळ असताना आम्ही आग, वीज आणि पाण्याशी का खेळावे? हे समजायला मार्ग नव्हता.
धुळवडीची संध्याकाळ...सर्व जग रंगांत आणि बऱ्याच इतर गोष्टीनी रंगून जावून शांत झालेले . रस्त्या रस्त्या वर तुरळक वाहतूक . संसारिक आणि पेंशनर चेहेरे फक्त रस्त्यावर उरलेले....... अचानक जांभळी नाका तळपली जवळील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजव आनंद दिघे अवतरले. सुरुवातीला कोणाचच लक्ष त्यांच्याकडे गेले नाही . काही जुने जाणते शिवसैनिक ,असे की आता त्यांना कोणीही विचारात नाही तळ्याजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची अवस्था पाहायला आले होते .आनंद दिघे साहेबाना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा हा म्हणता त्यांच्या भोवती गर्दी जमली .
२००८ सालातील सप्टेंबर - ओॆक्टोबर चे दिवस. (म्हणजे ५ - ६ महिन्यापुर्वीची गोष्ट ... पण अस म्हटल की वाचणारा डोळे टवकारतो आणि लक्ष देउन वाचु लागतो...!!). मी आमच्या आलिशान अपार्ट्मेंट मधे जमीनीवर अंथरलेल्या ( आणि give away sell मधुन आणलेल्या ) चादरीवर निवांत पहुडलो होतो. थोड्या वेळापुर्वी हातात घेतलेल्या assignment ने प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे ती फेकुन देउन harry potter वाचायला घेण्याचा निर्णय मी नुकताच घेतला होता. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. बाहेरच्या दिवाणखान्यात आमचा एक roommate senior कडुन आणलेल्या cot वर बैठक लाऊन बसला होता. (हा असा दिवसें दिवस बसुन राहु शकतो...).
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.
मागे दौलताबादाला जाऊन आल्यापासून माझा धाकटा जरा इतिहासमय झाला होता. तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकणे हा त्याचा आवडता छंद बनला. यू ट्यूब वर जाऊन महाराजांचे ऍनिमेशनपट पाहणे, कलर्सवर चालू असलेली महाराजांची सीरियल (अतिशय टुकार असलेली) पाहणे ह्या गोष्टी तो अगदी मावळ्याच्या निष्ठेने करतो.
हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले.
१ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते . अश्या टुकार लोकांबरोबर काही चांगले कलाकार पण साईन केले जातात.
२ ) कलाकार ठरल्यानंतर फक्त लोकांना सांगण्याकरिता ( जमल्यास ) एखादी कथा शोधण्यात येते ( त्या कथे चा आणि मालिकेचा पुढे कसलाही संबंध उरत नाही हा भाग वेगळा )
हे लेखन पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी संबंध नाही. काही साधर्म्य असलेच तर निव्वळ योगायोग! दुसरे काय?
पुण्यातल्या मुठा नदीकाठची फ़सवण गल्ली ही आजकाल काव्यपंढरीच झालेली होती. पुणे विद्यापीठ परीसरातील विद्यार्थी आणि विद्यासाधकांचा राबता देखील या बोळातील नवोदीत कविंच्या वाढलेल्या राबत्यापुढे कमीच होता. या बोळातल्या पुरातन पिंपळवृक्षाच्या बगलेत असणा-या झुळझुळ्यांच्या वाड्याकडे पाहून नवोदीत कविंना हात जोडताना तेथील रहिवाशांनी अनेकदा पाहिले होते.
कलियुग
एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय 
विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me"