स्वप्न

Submitted by राजेश्वर on 9 December, 2011 - 04:38

स्वप्न,
दिवसा स्वप्न, रात्री स्वप्न, जागेपणी, झोपेत, उठता, बसता स्वप्न पाहता येतात. स्वप्न का पडतात यावर चर्चा न करता,या स्वप्नाचा आनंद घेण्यात मजा आहे. आता बघा ना. मला नेहमी झोपेत असतांना पडणारे स्वप्न वाचा , परीक्षा जवळ आली असते (कोणत्या वर्गाची ते कळत नाही) नेहमी प्रमाणे अभ्यास झालेला नसतो. मग खुप तणाव येतो आणी या तणावत मग एखाद्यावेळेस जाग येते. तेव्हा इतके हायसे वाटते म्हणुन सांगु. तो आनंद अवर्णनीय आहे कारण अभ्यास नाही परिक्षा नाही अन मग शांत झोप.
अजुन काही स्वप्न आहेत ते पुढे सांगेलच, तुर्तास आपल्या स्वप्नाचे स्वागत.

गुलमोहर: