विनोदी लेखन

गझलेची कार्यशाळा - १ (दोनच भाग आहेत)

Submitted by बेफ़िकीर on 31 March, 2012 - 12:07

सौ. अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर या नवतरुणीच्या नाजूक आवाजातील एक फोन मला आला तेव्हा मी चुकून 'कोण बोलताय भाऊ' असे विचारले आणि मी एक स्वतःच्याच धुंदीत असलेला यग्रकवी असल्याचे सिद्ध केले. यग्रकवी म्हणजे यमकांत व्यग्र असलेला कवी.

"सर मी 'प' बोलतीय"

'प' हे नांव असते याची मला कल्पना नव्हती. माझा सामाजिक व सांस्कृतीक विकासाबाबतच्या ज्ञानाचा विकास केव्हा खुंटला हे नक्की आठवत नाही.

"प? प म्हणजे?"

"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर"

"म्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर?"

"सर मला लाडाने सगळे प म्हणतात"

"प?"

गुलमोहर: 

पहिला पहिला क्रश ......

Submitted by पियु१२३ on 30 March, 2012 - 01:32

पहिला पहिला क्रश ......

प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता)
आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल .
त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते )
त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या
वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलींमधला
बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या !
म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......
चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ...

गुलमोहर: 

यशटी

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 00:03

यशटी

जगातलं सगळ्यात अलिशान वाहन... प्रवाश्यांच्या सेवेस (?) सदैव तत्परतेने हजर... या वाहनाने करायचा प्रवास काही मुख्य टप्प्यांतून पार पडतो. तसच एकदा प्रवासाचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला अनेक कसोट्यांना सामोरे जावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला विशेष पद्धतीने develop केलं पाहिजे.
टप्पा १ – बसची वाट पाहणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

..... आर्ट एग्झिबिशन ......

Submitted by मिलिंद महांगडे on 24 March, 2012 - 14:24

-- " मला यायला उशीर तर झाला नाही ना...? " मी घाबरत घाबरत नान्याला विचारलं... त्याने माझ्याकडे तुच्छतेचा कि काय म्हणतात तसा कटाक्ष टाकला. त्याची छोटीशी वेणी घातलेली दाढीही रागाने नकारार्थी हलल्याचा मला भास झाला .
-- " तुला किती वाजता यायला सांगितल होतं ?? "
-- " ३ वाजता..."
-- " आणि आता किती वाजलेत....??" माझ्यापुढे हातातलं घड्याळ नाचवीत त्याने विचारलं .
-- " साडेतीन ..." मी अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो.

गुलमोहर: 

कुत्रा-२

Submitted by सौरभ.. on 24 March, 2012 - 03:00

(विशेष सुचना - आपण जर श्वानप्रेमी असाल तर आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. पण आजकाल कोणी बालवाडीतल्या मुलाचा गालगुच्चा घेऊन जरी त्याला विचारलं "बाळ, कोणत्या शाळेत जातोस रे?" तरी त्याच्या भावना दुखावण्याची शक्यता असते. तात्पर्य, आम्ही हल्ली दुसर्‍यांच्या भावनांची जबाबदारी घेत नाही.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'कवितेची पाककृती' - हमखास कविता होणार याची ग्वाही

Submitted by बेफ़िकीर on 22 March, 2012 - 06:18

लागणारा वेळ -

एक सेकंद ते एक जन्म यातील कितीही

आपापल्या इच्छाशक्तीवर व कंपूबाजीवर अवलंबून

========================================

लागणारे जिन्नस -

एका भाषेतील बर्‍यापैकी शब्दसंग्रह

विरहाचा अनुभव

टक्केटोणपे खाण्याचा छंद

जगाचा राग

लय व वृत्त यांचे ज्ञान नसणे (होय, हा जिन्नसच आहे )

कशालाही कविता मानण्याची व दुसर्‍याला ते मान्य करायला लावण्याची (अनुक्रमे) विवशता व आक्रमकता

=======================================

लागणारे आपणबाह्य जिन्नस -

आजूबाजूला एक जग असणे आवश्यक

एक समाज असणे आवश्यक

गुलमोहर: 

न्हावी

Submitted by सौरभ.. on 18 March, 2012 - 09:03

साधारण २-३ वर्षांपुर्वी कधितरी अमेरिकेत आलो असेन. (ok. ३००-४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा नेमका कोणत्या दिवशी काढला एवढी जुनी आणी अवघड तारीख नाहीये ती. जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.) या आधीच्या आमच्या सर्व शिक्षित पिढ्यांपैकी शिकण्यासाठी पुण्याबाहेर पाऊल कुणीही टाकल नव्हतं. त्यामुळे यायच्या आधी प्रश्नच प्रश्न डोक्यात होते. MS कशाशी खातात ? 'course register' करायचे म्हणजे नेमक काय करायच ? Funding नावाची वस्तु कुठे मिळते ? ( यासाठी भिक्षेकर्याच सोंग घेऊन दारोदार भटकाव लागत हे नंतर कळल.) आणी हे सगळ गरज पडली तर English मधे लोकांना कसं विचारायच ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लग्न

Submitted by सौरभ.. on 15 March, 2012 - 11:29

१२ डिसेंबर २००८. फारसं काही घडलं नाही या दिवशी, पण मी 'उच्चशिक्षित' झालो.कसा झालो याची चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही.मातापितरांच्या अपेक्षेपेक्षा खुपच शिकलो म्हणुन त्यांना आनंदाचं भरतं आलं.पण शाळेमधे 'पास' आणी 'नापास' यामधली 'वर घातला' ही एक स्थिती असते, तसं काहीसं feeling होत. ( माझ्या मते 'वर घातला' यासारखा दुसरा संतापजनक प्रकार नसेल.एक तर सन्मानानी पास तरी करा नाहीतर अपमानानी नापास तरी करा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कुत्रं

Submitted by सौरभ.. on 13 March, 2012 - 11:10

मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे. सोन्यासारखा शनिवार होता. आदल्या रात्री तुडुंब जेऊन, internet वर movie मघुन आरामात झोपलो होतो. सकाळ सकाळ १० वाजता जाग आली होती. मग थोड इकडे तिकडे करुन दुपारचं जेऊन वामकुक्षी साठी १ च्या सुमारास लवंडल्यावर साधारण दोन अडीच तासांनी डोळे उघडले होते. चहा की आंघोळ या गहन प्रश्नावर विचार करत मी kitchen मधे उभा होतो. तेवढ्यात डोळ्याच्या एका कोपर्यातुन घराच्या उघड्या दारातुन काहीतरी पांढरं आत सरकताना पाहिल. Room वरच्या बाकीच्या ३ महाभागांपैकी कोणितरी दरवाजा उघडा ठेऊन नष्ट झाला होत. जवळ गेलो तर एक छोट कुत्रं आत शिरल होत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन