विनोदी लेखन

विनोद

Submitted by मराठी टायगर on 2 July, 2012 - 03:06

मुलगा मुलीच्या घरी तिला पहायला गेला आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना एकटे सोडतात.

मुलगी : तुम्ही काय करता?

मुलगा मिश्किल स्वरात : अंघोळ (आता प्रश्न्न विचारण्याची त्याची पाळी.तो विचारतो तुम्हाला काय येत?)

मुलगी (मिश्किलपणे) : घाम

मुलगा चपापतो सावरतो : अं ते जाऊ दे तुम्हाला गाता येत का

मुलगी : हो

मुलगा : मग गाऊन दाखवा ना

मुलगी : बाहेर वाळत घातलाय

मुलगा : (आता पुरता FlaT होऊन कसाबसा) वाळू दे वाळू दे

(मुलगी आत जाऊन मूट्भर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुध्द पड्तो)

गुलमोहर: 

मुलगी पहायला गेलेला कवी.

Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 10:43

एका श्रीमंत घरी एक कवी मुलगी पहाण्यासाठी येतो. सोबत त्याचे बाबा आणि ताई असते.
तिघेही अलिशान घरातील कोचावर जाऊन बसतात. औपचारीक पाहुंचारा नंतर मुलीला बोलवलं जातं. ताईला तर वहीनी पहाण्याची केंव्हापासून घाई झाली होती. मुलगी येते, पदर सवरत अगदी न लाजता समोर येऊन बसते. आणि तिचा हाच बाणेदारपणा कवीच्या बोलघेवड्या ताईला खुप आवडतॊ. मुलीकडे पहात न राहून पहील्यांदा तिच बोलायला सुरुवात करते. आणि सुरुवात करते ती ही अशी की यापुर्वी खुप दिवसाची ओळख असल्याप्रमाने,

ताई : अं.... तुम्हाला कविता आवडतात? नाही म्हणजे आमचा दादा देखिल कवी
आहे म्हणुन म्हटलं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

" माझी फजिती - गाडीचा किस्सा "

Submitted by गारम्बीचा बापू on 30 June, 2012 - 23:44

" गाडीचा किस्सा "

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फि माफिचा अर्ज

Submitted by मराठी टायगर on 23 June, 2012 - 04:11

"आदरनिय सर,

गोष्ट आशी झाली की,माझ्या वडीलांनी मला फी भरण्यासाठी ५०० रुपये दिले होते.पण मी १०० रुपयाची मुव्ही बघीतली,१५० रुपयाची बिअर प्यालो,
५० रुपयचा गर्लफ्रेंड्चा मोबायील रिचार्ज केला,आणि २०० रुपयाची सायन्सच्या बाइनवर शर्यत हारलो की त्यांन्च गणिताच्या सरांबरोबर लफडं आहे.
पण त्यांन्च तर लफडं तुमच्याबरोबर निघालं.आता तुमच्यासमोर दोनचं पर्याय आहेत.
१) माझी फी माफ नाहितर तुमचा २)पर्दाफाश

तुमचा आज्ञाकारी तुमच्या मुलीचा बोयफ्रेंड

गुलमोहर: 

एक कविता आणि विडंबन

Submitted by चिखलु on 5 June, 2012 - 17:30

वैधानिक इशारा
ह्या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्ती तसेच इतर माबोकरानी हा लेख हलके घ्यावा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

वट पोर्णिमा

Submitted by Sanjeev.B on 4 June, 2012 - 12:06

ए मृ आज वट पोर्णिमा आहे ना गं, चल ना ऑफिस च्या खाली बॅनयन ट्री आहे ना, तिथे आपण बॅनयन ट्री ला रोटेट करुन होली थ्रेड टाय करुया.

ए हो गं चल.

पण एक प्रॉब्लेम आहे गं, सेवेन जन्म हाच हझबंड मिळणार गं.
अगं ते राहु दे, पण मला तर दुसराच प्रश्न भेडसावत आहे.
ए कोणता गं
अगं सातो जन्म हाच नवरा चालेल गं मला, पण सातो जन्म हीच मदर इन लॉ म्हण्जे...... टु मच गं.
ए टु मच कुठे गं, सेवन मच झालं ना. Wink
ए बरोबर, मला कसे नाही सुचले. Proud

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया

Submitted by चिखलु on 31 May, 2012 - 08:43

या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अ‍ॅप्रेझल / अप्राईझल

Submitted by Sanjeev.B on 28 May, 2012 - 05:32

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
एप्रिल / मे महिना उजाडलं कि सर्वच नोकरदार वर्गाला वेध लागतात एका गोष्टीचे ते म्हणजे अॅप्रेझल.

जेव्हा मी नवीन नवीन नोकरी ला लगलो होतो, तेव्हा मला असे वाटले होते कि वर्षारंभी अॅप्रिल महिन्यात होणारे पगार म्हणुन अॅप्रेझल म्हणत असावे.

गुलमोहर: 

या चिमण्यांनो परत फिरा रे... : सत्यमेव जयतेचा विशेष भाग

Submitted by Kiran.. on 28 May, 2012 - 03:22

मित्रांनो ,

आपल्याला माहीतच आहे कि आमीरच्या सत्यमेव जयतेचे तेरा भाग तयार आहेत. त्यातल्या पाच भागांचे प्रक्षेपण हे डिस्क्लेमर लिहीपर्यंत झालेले आहे. पण एक भाग असा आहे कि ज्याचे प्रक्षेपण आता लगेच होणार नाही. हा एक विशेष भाग असून, विशिष्ट वेळी त्याचं प्रक्षेपण हो‌ईल असं समजतं. आमच्या हातात त्याची सीडी लागल्याने त्या भागाचा यथासांग वृत्तांत वाचकांसाठी समोर ठेवत आहे. डिस्क्लेमर : या लेखात आलेले प्रसंग, नावं आणि व्यक्ती काल्पनिक असून कुठल्याही प्रकारच्या साधर्म्याबाबत काही तक्रार असल्यास वाचण्यापूर्वीच थांबावे ही नम्र विनंती.

गुलमोहर: 

कवितेवरील प्रतिसादासाठी १७ नियम (खुलाश्यासकट)

Submitted by धुंद रवी on 27 May, 2012 - 03:23

झेलतो छातीवरी तो... बोचरे प्रतिसाद सारे
टायीपले घाव ज्यांनी... विसरुनी माणुसकी !

ह्या माझ्या निवृत्त ओळी समस्त नवकवी माबोकर्स मित्रमैत्रिणींना अर्पण.... !

माबोकर्स हे संबोधन ‘अनेक माबोकर’ या अर्थाने आहे, ‘माबो Curse’ असे नव्हे. जगाला कितीही ‘शाप’ वाटला तरी कोणताही नवकवी हा फक्त ‘देवाने दिलेले वरदान’च असतो. फक्त तो गेल्यावर जगाला तसे वाटायला लागते.
हा एक Poetic Injustice आहे. (Poetic Injustice हा गंभीरतेने घ्यायचा विषय आहे. वरवर चाळुन फाडाफाडी करायला ती काही कविता नव्हे.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन