डेली सोप मालिका कशी बनते .

Submitted by यशू वर्तोस्की on 2 March, 2012 - 00:11

हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले.
१ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते . अश्या टुकार लोकांबरोबर काही चांगले कलाकार पण साईन केले जातात.
२ ) कलाकार ठरल्यानंतर फक्त लोकांना सांगण्याकरिता ( जमल्यास ) एखादी कथा शोधण्यात येते ( त्या कथे चा आणि मालिकेचा पुढे कसलाही संबंध उरत नाही हा भाग वेगळा )
३ ) साधारणतः १०० भाग बनतील एवढा माल मसाला असला तरी चालतो .....कारण भारतीय सणांची यादी खूप मोठी आहे त्या मुले वर्षभर गुढी पाडवा , गणपती संक्रांत, दिवाळी, दसरा पासून ते ईद , मोहरम अगदी सर्वपित्री अमावास्या देखील मालिकेतून दाखवता येतात या मुळे आणखी २०० दिवस मालिका वाढवता येते . या मध्ये एखादी आपत्ती उदा. अपघात , पूर , दुष्काळ , भूकंप वगैरे दाखवून प्रत्येक आपत्तीला १० असे एपिसोड वाढवू शकतो .
४ ) या सर्वात २-३ वर्षे संपली की इतर गोष्टी शोधल्या जातात उदा. मुख्य पत्राची स्मृती जाणे ( या मुळे दोन मुलांची आई असलेली व्यक्ती सुद्धा परकर पोलका घालून वावरू शकते , किंवा नव्या नवऱ्याला विसरून जुन्या नवऱ्याबरोबर परत संसार करायला जातात ) अगदी चुकून ? दोन लग्ने करणे ......हॉस्पिटल मध्ये मूल बदलणे.
५ ) आणखी आवडीचा विषय म्हणजे उतार वयात झालेल लग्न किंवा बाल विवाह ..त्यातून बिंदाडी, मासा वगैरे पात्रे आणता येतात ...सध्या मध्यमवर्गीय घरात वावरणारी मी माणसे अतिशय बेगडी वाटत असतात .
६ ) मग काय मजाच मजा चार दिवसा करता सुरु झालेली मालिका १० वर्ष झाली तरी संपत नाही. मुले,नातवंडे यांच्या पुढे जावून पंतवनडे ,खापर पंतवनडे झाली तरी चार दिवसाची सासू मारायचे नाव घेत नाही पाहावे तर प्रयेक भागात पूर्वीपेक्षा अधिक तेजपुंज.
७ ) या काळात क्रियेटिव्ह टीम चे मुख्य काम काय ? ते म्हणजे " brain storming " करणे , कश्याकरता तर संकटे शोधण्याकरता. मनात कल्पना करा की ८-१० लोकांची टोळी घोळका करुन बसत असेल आणि संकटे शोधात असेल म्हणजे कंटाळवाणी झाली मालिका की टाका संकट . ...उदा. खून , अपहरण , चारित्र्य हनन ,अश्लील फोटो, निनावी पत्रे ,राजकारण , सासूने विष देणे , पेयात अमली पदार्थ टाकणे , इथपासून धंदा बुडने, राजकिय कारकीर्द संपणे , कर्ज बाजरी होणे , गुंडांचा ससेमिरा , घरावर जप्ती आल्याने बेघर होणे , धंद्यातील फसवणूक संकटे जेवढी जास्त तेवढे मालीकेचे भाग जास्त .
८ ) मालिकेतील पुरुष पत्रे बहुदा कणाहीन आणि बुळी असतात ( अगदी लापुझंना ) आणि स्त्री पात्रे प्रमाणाच्या बाहेर आक्रमक आणि घाणेरडी असतात . बहुदा स्त्री पत्राची निवड करताना गरागरा डोळे फिरवणे , उग्र चेहेरेपट्टी करणे , आक्रमक हावभाव करणे , भुवया उडवणे अश्या टेस्ट घेतल्या जात असतील.

या आणि अश्या पुष्कळश्या बऱ्या वाईट गोष्टीने भरलेल्या मालिकेतून मूळ कथा केव्हाच हद्दपार झालेली असते . महागाई आणि संसारिक त्रासाने गांजलेला प्रेक्षक वर्ग स्वस्त करमणुकीच्या शोधात असतो ..पण त्याच्या डोक्यावर मारल्या जातात त्या अश्या बिनडोक मालिका . काळात नकळत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संदर्भ मालिकेतील कथानकात किंवा पात्रांच्या वागण्या बोलण्याशी जोडले जातात . मुळात बेफामपणे वागणारी आक्रस्ताळी पात्रे लोकांच्या ताणात भरच घालत असतात
मध्यम स्त्री वर्गाला नजरेसमोर ठेवून बनलेल्या अश्या या मालिकांमधून काय दिसते तर एकीकडे बालिशपणे वागणारी आणि सर्व अन्याय कारण नसतानाही सहन करणारी नायिका आणि दुसरीकडे सत्यापासून अगदी दूर असणारी आणि अतिशय हीन पातळीवरून रागावलेली खलनायिका . खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाला ब्लाक आणि व्हाईट अश्या दोन्ही शेडस असतात पण एकतर्फीपणे रंगवलेली ही पात्रे आपल्याला विकृत करमणुकीचे समाधान मिळवून देतात परंतु नीट विचार केल्यास आपल्या जवळची वाटत नाहीत.

आज कोणालाही याबद्दल विचारल्यास तुम्हाला थोड्या अधिक प्रमाणात याच प्रतिक्रिया मिळतील. या मालिकांमधून करमणूक किंवा विरंगुळा मिळतो की मनस्ताप हा विवादाचा मुद्दा आहे . सुरुवाती सुरुवातीला उत्तम वाटणारी मालिका ५० भाग झाले की अतिशय बालिश आणि विकृत वाटू लागते . आपल्याला हे कळत असते पण वळत नाही....... कारण तरीपण आपण मालिका बघतो .

यशोधन

गुलमोहर: 

>> ८ ) मालिकेतील पुरुष पत्रे बहुदा कणाहीन आणि बुळी असतात ( अगदी लापुझंना ) आणि स्त्री पात्रे प्रमाणाच्या
>> बाहेर आक्रमक आणि घाणेरडी असतात .

पाश्चात्य देशांत अशीच पात्रयोजना असते. थोडक्यात म्हणजे भारतीय मालिकालेखक सरळ कॉपी करतात. त्यांच्याकडे स्वत:चं असं काहीच कौशल्य नाही.

खरंतर भारतीय कलाकार एव्हढे कल्पनादरिद्री नाहीयेत. पण लक्षात कोण घेतो.

-गा.पै.

या अश्या मालिकांचा सार्वजनिक छळ सर्वप्रथम आभाळमाया आणि सर्वात मोठा त्रास अवंतिका ने चालू केले होता . etv वर चार दिवस सासूचे आणि या गोजिरवाण्या घरात असे वेगळे त्रास होते. मी तर रात्री ८ वाजता बाहेर पासून १० वाजता परत येत असे.