विनोदी लेखन

Driving??? नको रेऽऽऽ बाबा!!!

Submitted by प्रज्ञा९ on 2 May, 2011 - 22:02

"छे!गेली १० वर्षं गाडी चालवतेय,पण असलं भयानक ट्रॅफिक बघितलं नाही कधी!"

मी जामच वैतागले होते. आईपण कशीबशी माझ्या मागे जीव मुठीत धरून बसली होती.
तशी मी भित्री नव्हेच, किंबहुना शूरवीरच म्हणायला हवं मला, पण आज मी हात टेकले! खरं म्हणजे गाडी चालवायचा परवाना नसताना पुण्यासारख्या ठिकाणी मी व्यवस्थित ड्राइव्हिंग केलं होतं, तेही १७ व्या वर्षी. मस्तपैकी रस्ता-बिस्तापण चुकले होते, पण त्यातलंही थ्रिल(?) एन्जॉय केलं होतं. आईला हे समजलं तेव्हा तिने चांगलीच हजेरी घेतली होती माझी!
***********************
पण नाशिकचं ट्रॅफिक बघुन मात्र ती चकित झाली होती.

गुलमोहर: 

माझं काय चुकलं ? प्लीज..मला सल्ले द्या.. प्लीज, प्लीज, प्लीज, इटस अर्जंट !!

Submitted by Kiran.. on 2 May, 2011 - 13:14

टीप : ही माझ्या मित्राची व्यथा आहे. तुमच्या मार्गदर्शनाची त्याला नितांत गरज आहे. तो सध्या हे वाचत आहे. त्याच्या टायपिंगच्या चुका मी दुरूस्त केल्या आहेत. त्या तशाच ठेवल्या असत्या तरीही माबोकरांची अंतःकरणं इतकी विशाल आहेत कि त्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन केल असतं याची खात्री आहेच..

उपटीप : या लेखाची प्रेरणा माझ्या मित्राला ताईंचा सल्ला या बाफमुळे मिळाली.
http://www.maayboli.com/node/11779
तेव्हा तिथं जसे भरभरून प्रतिसाद दिलेत तसेच मित्रालाही सल्ले देण्याची जबाबदारी आता माबोकरांवर आहे.

मुख्य टीप : सर्व टीपा संपल्या.

गुलमोहर: 

विश्वकरंडकः एका न बघणारीच्या चष्म्यातून...

Submitted by सानी on 2 May, 2011 - 09:53

तुम्ही हापूस आंबे खात नाही??? मग तुम्ही आजवर काय जगलात? ह्या प्रश्नाइतकाच जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मलाही नक्कीच विचारु शकाल... सारं जग क्रिकेटवर फिदा आणि तुला ते आवडत नाही? कसं शक्यय? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे??? पण नाही, लोकहो! मी एकटीच नाहीये क्रिकेट न आवडणारी. एकतर सारं जग क्रिकेटवर फिदा नाहीच. बरंचसं जग फुटबॉलवर फिदा आहे, टेनिसवर फिदा आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात हे ही माहिती नाही, असे प्रगत राष्ट्रातलेसुद्धा लोकही आहेत!!! दचकायला होतं ना? अहो खरंच! माझ्या एका युरोपियन मित्राने कधीही क्रिकेटचा 'क' पण पाहिला नव्हता...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमच्या बिल्डिंगची वरल्ड कप 'फायनल'

Submitted by मामी on 30 April, 2011 - 11:44

कारुण्यातून जन्माला येणारा विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो असं म्हणतात. हे जर खरं असेल ना तर मग आमच्या बिल्डिंगमध्ये तो 'तसा' विनोद (म्हणजे वर म्हटलाय तसा, उगाच इकडे तिकडे बघू नका) घडला असं म्हणावं का? तुम्हीच ठरवा.

गुलमोहर: 

पानाख्यान !

Submitted by ऋयाम on 26 April, 2011 - 14:11

जापान मधे 'ब्रेड' ला 'पान' म्हणतात. आणि तिथं 'आपलं' पान मिळत नाही.
हे म्हणजे त्या 'बँडबाजाबारात' मधल्या 'व्यापार मे नो प्यार!' सारखं आहे, "जापान मे नो पान."
त्यामुळे जापानला असताना एखाद्याला "जा पान ला" असं म्हटलं, तरी काही उपयोग नाही. खरंच नाही.
जपान्यांचं असलं सगळं मला काही केल्या कळत नाही.
- मी जापान सोडून येण्याच्या बहुविध कारणांपैकी 'पान' हे एक!

एकदा आमच्या एका जापानी क्लायंटाला भारतीय व्यंजनं खाण्याची लय हुक्की आली. मग आम्ही नेहेमीप्रमाणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाहिरात

Submitted by राजेश्वर on 26 April, 2011 - 01:06

जाहिरात कोठे लावतील याचा काही नेमच राहिला नाही, मंदिराच्या समोर एक विध्युत खांब होता त्यावर उंच कापडी फ़लक लटकत होता, फ़लक हवेने डुलत होता. त्यावर जाहिरात होती नो डोनेशन, त्वरीत अ‍ॅडमिशन, लिओ किडस. मला जाहिरात लावणार्‍याचे हसु आले.आश्चर्य वाटले विघ्युत खांबावर शाळेची जाहिरात! आणी इतक्या वर, दुसरी जागाच यांना सापडली नाही? अ‍ॅडमिशन घ्यायची असती तर अधिक माहितीसाठी खांबावर चढावे लागले असते.

जालना महामार्गावर रोडच्या कडेला एक चांभार आपले दुकान थाटुन बसला होता. बाजुला "विशाल शुज" नावाची पाटी पेटीला टेकुन ठेवली होती त्याचा आशावादी दृष्टीकोन भावला अन हसवुन गेला.

गुलमोहर: 

स्वाभिमानी असाल तर

Submitted by बेफ़िकीर on 25 April, 2011 - 11:21

स्वारगेटच्या स्थानकापासल्या सिग्नलवर स्वयंचलीत दुचाकीवर मी भर उन्हात थांबलेलो होतो. सिग्नल चालू होते पण दिवे दिसण्यापलीकडे त्यांचा उपयोग नव्हता. कारण सर्व चौक ठप्प झालेला होता. एक मोठा मोर्चा निघाला होता. लोकशाहीला शिव्या देत मी जमेल तितके कडवट तोंड करून डोळे ताणून न होणार्‍या प्रगतीकडे पाहात होतो.

गुलमोहर: 

बातम्या

Submitted by Sanjeev.B on 25 April, 2011 - 02:09

मला नेहमीच एक प्रश्न पडत राहिलंय, टिवी वर दिले जाणारे बातम्या हे ऐकण्यासाठी असतं कि बघण्यासाठी हेच क़ळत नाही, काय ते सुटाबुटातली पोरी, काय त्यांचं फाडफाड विंग्रजी बोलणं, मनात इतकं गुदगुल्या होतात, काही विचारुच नका, घरी कोणाला सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही अशी गत होते. असं वाटतं बातम्या बघतच (I mean ऐकतच Proud )रहावं, बातम्या कधी संपुच नये; निरस, माहित असलेली बातमी ही परत परत पहावसं वाटतं. कित्येक वेळा या बातम्यां च्या पायी माझ्यात आणि सौ मध्ये वाद झालेत. तिला बातम्या झी २४ तास किंवा स्टार माझा वरच्या पहायचे असतात आणि मला CNN IBN.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्हॉट अ‍ॅन आयडीया..!

Submitted by A M I T on 20 April, 2011 - 01:30

माझा मोबाईल पुन्हा वाजला.
आतापर्यंत तिसर्‍यांदा दुर्लक्षित केलेला बायकोचा चौथा कॉल मी रिसीव्ह केला.
"हॅलो." आवाजात जमेल तितका शिष्टपणा आणत मी. बे"शिष्ट"पणा आयमीन बेशिस्तपणा माझ्या बायकोला खपत नाही.
"काय हो..! कुठे आहात? आणि फोन का उचलत नाही? मघापासून कितीवेळा मी ट्राय करतेय." बोलायची संधी मिळताच तिने संधीचं सोनं केलं.
आता आली ना पंचाईत..! मी मनातच उत्तराची जुळवाजुळव सुरू केली.
"अगं काही नाही. फोन ना सायलेंटवर होता आणि निघता निघता बॉसने काम दिलं, म्हणून थोडासा ओव्हरटाईम करतोय."
वास्तविक या क्षणाला मी आमच्याच ऑफीसातल्या कामिनीसोबत कॉफी शॉपमध्ये कॉफी ढोसत होतो.

गुलमोहर: 

फोनमय सकाळ

Submitted by राजेश्वर on 19 April, 2011 - 03:34

फ़ोनमय सकाळ

सकाळीच बायको फ़ोन शोधत हॊती, मी म्हटले एव्ह्ढे काय महत्वाचे काम आहे? तर ती म्हणाली, अहो, बहिणीकडे कुर्डया करण्यासाठी गहु भिजायला टाकले. ती वाट पाहत असेल म्हणुन फ़ोन करायचा आहे.
फ़ोन सापडल्यावर लगेच बहिणीला फ़ोन लावला,
(१)
हॅलो, अगं मी तुला नंतर फ़ोन करते, Biggrin
भिजले का गहु?
अगं बाई,
मग?
बर बर मी नंतर फ़ोन करते. Biggrin

हे सर्व ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली
मी: का गं काय झाले?
ती: गहु भिजले पण ते फ़ारच फ़सफ़स झाले आहे, आजच कुर्डया कराव्या लागतील Sad
मी: मग करुन टाक

तिने लगेच फ़ोन घेतला आणी बहिणीला सांगितले
(२)
अग हे म्हणतात, आजच करुन टाकु, Rofl
बर बर,
ये मग,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन