फोनमय सकाळ

Submitted by राजेश्वर on 19 April, 2011 - 03:34

फ़ोनमय सकाळ

सकाळीच बायको फ़ोन शोधत हॊती, मी म्हटले एव्ह्ढे काय महत्वाचे काम आहे? तर ती म्हणाली, अहो, बहिणीकडे कुर्डया करण्यासाठी गहु भिजायला टाकले. ती वाट पाहत असेल म्हणुन फ़ोन करायचा आहे.
फ़ोन सापडल्यावर लगेच बहिणीला फ़ोन लावला,
(१)
हॅलो, अगं मी तुला नंतर फ़ोन करते, Biggrin
भिजले का गहु?
अगं बाई,
मग?
बर बर मी नंतर फ़ोन करते. Biggrin

हे सर्व ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली
मी: का गं काय झाले?
ती: गहु भिजले पण ते फ़ारच फ़सफ़स झाले आहे, आजच कुर्डया कराव्या लागतील Sad
मी: मग करुन टाक

तिने लगेच फ़ोन घेतला आणी बहिणीला सांगितले
(२)
अग हे म्हणतात, आजच करुन टाकु, Rofl
बर बर,
ये मग,
मी यांना पाठवते
तिने फ़ोन ठेवला

माझी झॊपच उडाली, Sad
मी बायकोला सांगीतले ये, मी कुर्डया वैगरे काही करणार नाही हं.
सौ: ठिक आहे, ठिक आहे, नाहीतरी कोणती मदत करता संसारात तुम्ही, तुम्हाला फ़क्त तिच्याकडचे भिजलेले गहु आणायचे आहे.
मी: अगं, पण मला वेळ कुठे आहे? आंघोळ, पुजा....
सौ: मग संध्याकाळी आणाल का? गव्हाचा चिक
मी: ठिक आहे देईल आणुन Happy

(३)
तिने लगेच फ़ोन हाती घेतला
अग ते राहु दे, संध्याकाळी हे आणुन देतील, मग आपण उद्या कुर्डया करु
आज आपण पापड करुन टाकु.
ठीक आहे.
फ़ोन बंद झाला

सौ:काहो खारोड्या करायच्या का?
मी:काही हरकत नाही
सौ: खाल्ल्या पाहिजे Biggrin
मी: व्वा खाईल की.

हा संवाद संपताच तिला काहीतरी आठवले तिने फ़ोन हातात घेतला आणी

(4)
हॅलो
अग मी बोलते, तु अस करना आज जेवायलाच इकडे ये, त्यांना पण इकडेच या म्हणावं
बर बर
ठेवते, यांची ऑफ़िसची वेळ झाली, थोडे फ़ोन वर निवांत बोलत नाहीतर, Biggrin ऑफ़िसची घाई
ठिक आहे मग, ये लवकर

एव्हढे बोलुन फ़ोन माझ्या हातात दिला

मी: चला मग येतो
सौ: अहो, लवकर या Happy

मला आजकाल ऑफिस मध्येच फोन चार्जींग करावा लागतो Biggrin फोन वर तासंतास बोलण्याची सवय, पाच पाच मिनिटांनी फोन करण्याची सवय योग्य नाही एव्हढेच. Happy

गुलमोहर: 

अरे कुर्डया झाल्या की सांग आईला सांगतो तु औरंगाबादला गेल्यावर घेऊन ये म्हणुन
पापड , ईतर वाळवण झालंकी हिला सुध्दा पाठवितो.

वा! राजे, एवढी कष्टाची वाळवणं करण्याच्या तुमच्या बायकोच्या उत्साहाचे कौतुक करण्याऐवजी तुम्हाला मोबाईल फोन चार्जिंगचीच जास्त चिंता का? Happy

ओ राजे! स्पाईस मोबाईल घ्या. बॅटरी खूप वेळ चालते.
अवान्तर : रच्याकने म्हणजे काय आणि अनुस्वार कसा द्यावा.

कुर्ड्या, खरोड्या, पापड ... गव्हाच अजुन कायकाय बनत? लहानपणी आम्ही शाळेत पताका चिटकवायला खळ बनवायचो Happy
वा! राजे, एवढी कष्टाची वाळवणं करण्याच्या तुमच्या बायकोच्या उत्साहाचे कौतुक करण्याऐवजी तुम्हाला मोबाईल फोन चार्जिंगचीच जास्त चिंता का? <<<<<<<<< १००% अनुमोदन