बातम्या

Submitted by Sanjeev.B on 25 April, 2011 - 02:09

मला नेहमीच एक प्रश्न पडत राहिलंय, टिवी वर दिले जाणारे बातम्या हे ऐकण्यासाठी असतं कि बघण्यासाठी हेच क़ळत नाही, काय ते सुटाबुटातली पोरी, काय त्यांचं फाडफाड विंग्रजी बोलणं, मनात इतकं गुदगुल्या होतात, काही विचारुच नका, घरी कोणाला सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही अशी गत होते. असं वाटतं बातम्या बघतच (I mean ऐकतच Proud )रहावं, बातम्या कधी संपुच नये; निरस, माहित असलेली बातमी ही परत परत पहावसं वाटतं. कित्येक वेळा या बातम्यां च्या पायी माझ्यात आणि सौ मध्ये वाद झालेत. तिला बातम्या झी २४ तास किंवा स्टार माझा वरच्या पहायचे असतात आणि मला CNN IBN.

सौ : अहो, झी २४ तास लावा. किती वेळा पाहत बसणार आहात त्या अनुभाला अजुन.
मी : का, जानकी कशी आंधळी झाली, कि महाअप्सरा कोण होणार आहे ह्यावर परिचर्चा आहे झी वर.
मला तर वाटतं महागुरुच, महाअप्सरा होणारंय. Proud
सौ : गप्प बसा महागुरुं बद्दल असं काहीबाही बोलेलं मला चालणार नाही, अनुभा बद्दल मी काही बोलले तर तुम्हाला चालतं का ??
मी : गप्प बैस, माझं महत्वाचं बातमी घालवली.
सौ : माहित आहे कोणतं महत्वाचं बातमी आहे ते
मी : माहेत आहे ना, तर मग बघु दे i mean ऐकु दे ना

बातम्या ही आजकाल कैच्याकै असतात, काय तर म्हणे मुन्नी जास्त हिट कि शीला हिट. मला तर असं वाटतं कि त्यांना हिट म्हणायचं नसुन हॉट म्हणायचं असेल.

काही विंग्रजी न्युझ चॅनेल वर आजकाल शेलेब्रिटी लोकं पब मध्ये जाऊन आपलं कला कौशल्य (किंचाळणे व धिंगाणा घालणे) दाखवतात ते ही दाखवायला लागले आहेत, तिकडे पब मध्ये जाउन त्यांची मुलाखत काय घेतात, त्यांच्या बरोअबर काय नाचतात (झिंगतात), त्यांचे मुलाखात ही अफलातुन असते बरं का, त्याचे सुरुवात नेहमी असं होतं :-

वार्ताहार : Heyyyyyyyy, Hova u (How r u), wassup (what's up) man.
शेलिब्रिटी : (किंचाळत) Yeaaaaaaaaaaaaaah
वार्ताहार : What are you wearing
शेलिब्रिटी : Abu & Sandeep designed........ (गोंधळा मुळे पुढचं काही ऐकु येत नाही)
वार्ताहार : You looking like a darling
शेलिब्रिटी : Ohhhhhhhhhhhhhhhhhhhhh
वार्ताहार : Have great fun n njoy the party
शेलिब्रिटी : (किंचाळत) Yeaaaaaaaaaaaaaah

वार्ताहर दुसर्या एका बाई शेलिब्रिटी कडे आपला मोर्चा वळवते.

वार्ताहार : हेलो पुसी, Hova u
शेलिब्रिटी : (किंचाळत) Yeaaaaaaaaaaaaaah (दारु चा ग्लाझ उंचावत)
वार्ताहार : What are you wearing.

शेलिब्रिटीनं जे घातलं असतं ते अंग झापायला घातलं असतं कि दाखवायला घातलं असतं हे एक कोडंच असतं, माझ्या मना मध्ये उगाच किडा वळवळतं आणि विचारतं, What are you wearing, नाही नाही , ते बहुधा असं असायला हवं होतं Why are you wearing ???

शेलिब्रिटी : Ritu's designed ........ (परत गोंधळा मुळे पुढचं काही ऐकु येत नाही)
वार्ताहार : You looking too sexy
शेलिब्रिटी : ummmmmmmmmm, thanks.

मी : ????

कधी कधी तर असं वाटतं सर्वोतकॄष्ट विनोदी कार्यक्रमाचे पुरस्कारा बातम्यांना मिळावं.

रविवार ची बातमीपत्र तर अगदीच कैच्याकै असतात, म्हणजे समजा एखादी माशी जरी शिंकली तर असं बोभाटा करणार कि जसे त्सुनामी आली आहे. रविवार म्हणजे ह्या न्युझ चॅनल च्या लोकांना अडचणी चा वार असावा, कारण त्या दिवशी कोणाला बुकलावं, काय दाखवावं आणि चघळावं हा त्यांचा समोर मोठा यक्ष प्रश्न असावा.

मित्रांनो, मला सांगा बातम्यां मध्ये हे सर्व दाखवण्याचे काय प्रयोजन. मागे एकदा कोणत्या तरी विंग्रजी न्युझ चॅनल वर पाहिल्याचं आठवतंय, पोलिसांनी मध्यरात्र उलटल्यावर एका पब वर धाड टाकली होती तेव्हा ह्या शेलिब्रिटींचं थोबाड शेळीब्रिटी सारखं झालं होतं.

- संजीव बुलबुले / २५.०४.२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy