विनोदी लेखन

सेल्सगर्ल येता घरा..

Submitted by A M I T on 24 June, 2011 - 00:59

नेहमीप्रमाणेच रविवारची आळसावलेली सकाळ.

सौ. मासे आणण्यासाठी बाजारात गेलेली. चिरंजीव रविवारच्या सुट्टीचा जास्तीत जास्त सदूपयोग व्हावा, म्हणून सकाळीच शेजारच्या सोसायटीत क्रिकेट खेळायला गेले होते. मी वर्तमानपत्र जवळजवळ वाचून संपवलं होतं. शेवटी आपला मोर्चा राशीभविष्यकडे वळवला.
हम्म.. काय म्हणतेय माझी रास? मी राशीभविष्याचं पान उघडून त्यातली माझी रास वाचली. त्यातलं हे एक भविष्य...
'आज आपणांस अनपेक्षित धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.'
या राशीभविष्यमध्ये हे नेहमीच असं काहीतरी अपेक्षित नसलेलं वाचायला मिळतं.

गुलमोहर: 

आनंदी आनंद गडे......

Submitted by जुई on 19 June, 2011 - 10:18

ओरिजनल
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजीत रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे
- बालकवी
-----------------------------------------
विडंबन: Happy

गुलमोहर: 

'पाय'चीत.

Submitted by A M I T on 10 June, 2011 - 02:17

"अरे काय करून घेतलसं हे?" वसंत ऊर्फ वश्या गोपाळसह धावत येवून माझ्या कॉटवरील उरलेल्या जागेवर बसून धापा टाकीत म्हणाला. गोपाळनेही मुंबईमधील लोकलच्या सवयीनुसार सराईतपणे जागा पटकावली.
मी केविळवाण्या नजरेने एकवार आपल्या पायाकडे पाहीले. एका उंचशा स्टँडला 'टांग'लेला माझा बँडेजधारक पाय गरम चहातून बुडवून काढलेल्या ब्रेडसारखा सुजल्यामुळे मला तो सफेद हत्तीच्या पायासारखा भासू लागला. लोकं मला 'पांढर्‍या पायाचा' तर म्हणणार नाहीत ना? या चिंतेत असतानाच माझ्या उजवीकडून कारूण्यमय हुंदका माझ्या कानी आला. या आमच्या सौ होत्या.

गुलमोहर: 

मायबोली मदतपुस्तिका - रिलोडेड!

Submitted by लसावि on 8 June, 2011 - 06:51

आम्हाला मायबोलीवर स्थानापन्न होऊन आता काही वर्षे झाली. या कालावधीत आम्ही आमच्या दे धडक बेधडक पद्धतीने इथे सर्वत्र संचार केला आहे (याला काही लोक जिथे तिथे नाक खुपसणे असेही म्हणतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो). फ़िरताफ़िरता आमच्या असे लक्षात आले की माबोवर उपलब्ध असलेली मदतपुस्तिका अत्यंत उपयोगी असली तरी बदलत्या काळाला सामोरे जाण्यात तिला काही अंगभूत मर्यादा आहेत (काय वाक्य जम्या हय! चिनूक्स जमतय ना रे?). ही अडचण सोडवण्यासाठी आम्ही ही नवी मदतपुस्तिका प्रकाशित करीत आहोत. माबोवरील अनेक गोष्टींप्रमाणे ही पुस्तिकाही डायनॅमिक आहे, वाचकांनी त्यात भर टाकत रहावी.

गुलमोहर: 

Coming सून..!

Submitted by A M I T on 6 June, 2011 - 02:32

संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर थेट घरी आलो. हो.. म्हणजे एरवीही मी ऑफीस सुटल्यावर थेटच घरी येतो. "नाकासमोर चालणारा" की काय म्हणतात ना? त्या प्रकारात मोडणारा मी.
घरी आलो पाहतो तर काय?....
कुटूंबीय दोन बोटचं स्वर्ग उरलयं असल्या स्वर्गीय आनंदात...

गुलमोहर: 

लेकुरे उदंड झाली..!

Submitted by A M I T on 30 May, 2011 - 03:22

मी पुरातत्वीय उत्खनन खात्यात असताना आटपाट नगरीत सापडलेल्या बखरींवरून ही सत्यकथा आपणांस सांगत आहे. यातील सत्य पडताळून पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी वाचकांवर अवलंबून आहे, याची नोंद घ्यावी...

आटपाट नगरीतील 'मुहम्मद बिन लादेन' मोठा महत्त्वाकांक्षी इसम.
भारतीय पुराणातील इतके सगळे पुराणपुरूष सोडून मुहम्मद बिनने केवळ आणि केवळ "डोळे नसलेल्या" धृतराष्ट्रांचा आदर्श "डोळ्यांपुढे" ठेवला. तब्बल १०० वेळा पाळणा हलता ठेवणार्‍या या 'अ'मर्यादा पुरूषोत्तमाच्या या अपार कर्तुत्वाने मुहम्मद बिन भलताच प्रभावित झाला.

गुलमोहर: 

माझी पण लव्ह इष्टोरी...

Submitted by सुनिल जोग on 27 May, 2011 - 05:11

मी नुकतात 'गावातून' शहरात आलो. चांगली नोकरी वगैरे लागली आणि ऑफिसमधे,नातेवाईकांच्यात चढाओढ लागली माझे २चे ४ हात करण्याची. मी पण हिंदी पिक्चर्स बघू लागल्यामुळे स्वतःला हिरो वगैरे समजू लागलो होतो.

गुलमोहर: 

आज्जे उवाच.

Submitted by शोभा१ on 26 May, 2011 - 06:30

Aajje.jpg
हुश्श! पायाच पार टुकड़ जाल. हरी हरी... हरी हरी ! कोण न्हाय वाटत घरी. पोरी हो,...अग ए...
पोरी हो,...कुठल्या लस्करात गेल्या ग, भाकरया थापाया?

रक्मे,.....ए रक्मे,....अग ए रक्मे,.... अग ए xxx आता गपगुमान येती का घरला, का येऊ तित ज़िन्ज्या उपटाया? ये... लवकर. चार दिवसात घराचा पार उकिरडा करून ठिवलाय. हरी हरी. आलीस? ये ये. ये ग माजी बाय ती.[कड़ कड़ कड़(आता माया काढते, मग तुजी हाडच मोडते बग.)]

गुलमोहर: 

फक्त पुरूषांसाठी : विबासं जमलय का ? मग हे अवश्य वाचा. ( अल्पवयीन व सज्जन यांना प्रवेश निषिद्ध)

Submitted by Kiran.. on 24 May, 2011 - 16:09

अभिनंदन !

इथपर्यंत पोहोचलाय याचा अर्थ तुमचं जमलय कुठंतरी. ( आकडे सांगू नका :फिदी:)
विबासं मधे नवीन असल्याने ( असणारच) काही काळजीही घ्यायची असते हे तुमच्या गावीही नसणार. जसा पहिला खून केल्यावर खुनी घटनास्थळी येतो आणि पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकतो अशा चुका होणे स्वाभाविक आहे.

या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची हे सुचवत आहे.

१. विबासंग्रस्त पुरूष एकटेपंणात आनंदी दिसतो तर बायकोसमोर त्याला गिल्टी वाटत राहत. हे भाव बायकोच्या नजरेतून सुटणं कठीणच. संशयाची सुई फिरायला हे पहिलं कारण ठरू शकतं. तेव्हा नॉर्मल रहा. ( आधी कसे होतात हे आठवून पहा)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन