टीप : ही माझ्या मित्राची व्यथा आहे. तुमच्या मार्गदर्शनाची त्याला नितांत गरज आहे. तो सध्या हे वाचत आहे. त्याच्या टायपिंगच्या चुका मी दुरूस्त केल्या आहेत. त्या तशाच ठेवल्या असत्या तरीही माबोकरांची अंतःकरणं इतकी विशाल आहेत कि त्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन केल असतं याची खात्री आहेच..
उपटीप : या लेखाची प्रेरणा माझ्या मित्राला ताईंचा सल्ला या बाफमुळे मिळाली.
http://www.maayboli.com/node/11779
तेव्हा तिथं जसे भरभरून प्रतिसाद दिलेत तसेच मित्रालाही सल्ले देण्याची जबाबदारी आता माबोकरांवर आहे.
मुख्य टीप : सर्व टीपा संपल्या.
---------------------------------------------------------------------------------
मित्राची व्यथा.
माबोवर येऊन व्यथा मांडली कि कनवाळू माबोकरांकडून मार्गदर्शन मिळतेच. कित्येकदा पहिल्याच पोस्टमधे समस्येचा निकाल लागला असं वाटतं. पण काही काहींच्या समस्या डेली सोपसारख्या असतात. प्रत्येक पोस्टनंतर समस्येचे नवनवे पैलू समोर येतात आणि माबोकर देखील मोठ्या प्रेमाने त्या दुर्दैवी जिवाला / जिवीला किंवा त्याच्या/तिच्या मित्राला/मैत्रिणीला समस्यामुक्त करण्याचा प्रयत्न करतात.
मनात आलं माझी इतकी मोठी समस्या असूनही मी आजवर का लपवून ठेवलीय ? असं कुढत तरी किती बसावं ? दु:खं शेअर केल्याने हलकं होतं म्हणतात. पण शेअर तरी कुणाशी करावं हा विचार करत होतो. इथं ताईचा सल्ला हे सदर वाचलं आणि लिहायचा निश्चय केला...
माझ्या लग्नाला दीड वर्ष झालय पण सध्या माझ्या आयुष्याचा नरक झालाय. बायको माझ्यावर पाळत ठेवते. मला कुणाही मुलीशी / स्त्री शी बोलू देत नाही. सारखा मोबाईल चेक करते, मी कुणाकडे पाहून हसलो कि भांडण उकरून काढते. माझ्या मैत्रिणींचा पाण उतारा करते. मी कुणाशी बोलायचंही नाही का ?मी हसायचंही नाही का ?
त्याचं झालं असं..
मी सिक्स सीटर मधे बसलो होतो. हातात नवनीत भूमिती गाईड होतं. रिक्षात सहा जण बसतात पण आठ तर बसतातच. तर मी ज्या रिक्षात बसलो होतो त्यात सात सुंदर मुली आणि मी बसलो होतो. मला पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा अनुभव नव्हता पण त्या दिवशी मला ते कळालं. या रिक्षातल्या सातपैकी एक मुलगी माझी बायको होणार आहे हे मला कळालं. मला वेड लावणारी, माझी झोप उडवणारी मुलगी या सातपैकी एकच आहे हे जाणवलं.
हळूहळू रोजच त्या सातही जणींशी रिक्षात माझी गाठ पडू लागली. त्यातली एक जण माझ्या घराजवळ रहात होती. एक माझ्याच कॉलेजला होती. एक माझ्या मित्राची बहीण होती. तर चौथी बॅडमिंटन हॉलला यायची. इतर तिघी मात्र रिक्षातच भेटायची.
चौथीशी माझे सूर जुळले. बॅडमिंटन खेळताना लव्ह ऑल हे कानी पडायचं. मी नेहमी हरायचो. नेहमी मला लव्ह सेव्हन, सेव्हन लव्ह कानी पडायचं आणि मग मी हरलो असं जाहीर व्हायचं. मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालो.
त्याच वेळी मित्राकडे जावं लागलं. मला पाहून त्याची बहीण रिक्षाबद्दल भरभरून बोलली. तिला भूमितीबद्दल माहिती हवी होती. मी एकाच अटीवर होकार दिला. रोज एक शंका विचारायची त्याचं उत्तर मी दुस-या दिवशी देणार..
मग मी कॉलेज सुटल्यावर थांबून सरांना प्रश्न विचारू लागलो. सरांनी क्लासला यायचं निमत्रण दिलं. तिथं पाचवी भेटली !!
एकीचं उत्तर देता देता क्लासमधल्या पाचवीशी माझे सूर जुळले. इकडे भूमितीने आम्हा दोघांना जवळ आणलं. मी बॅडमिंटनचा खेळाडू असल्याने लव्ह ऑल हे ब्रीद अंगी बाणवलं गेलं होतं. हळूहळु माझी भूमितीत प्रगती झाली. माझे मार्क्स पाहून कॉलेजमधली तिसरी देखील माझ्याशी सलगी वाढवू लागली.
मी एक नेकदिल, दर्यादिल इन्सान असल्याने कुणालाच नाराज करणे शक्य नव्हतं. त्यातून सुंदर मुलींच्या डोळ्यात अश्रू... अय्य्ययो पापम !!
आणि अशातच कॉलेज संपलं...
भेटी कमी झाल्या.
आणि घराजवळची नेहमी दिसू लागली. मी तिच्या प्रेमात पडलो. घरच्यांनाही ती आवडली. पण तिच्या घरच्यांना मी आवडलो नाही. शेवटी बिनसलं..
मग पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. असच एकदा..
कांदेपोहे घेऊन आली तीच रिक्षातील सहावी...
मॉ होकार दिला
लग्न झालं..
आणि थोड्याच दिवसात घराजवळची पुन्हा भेटू लागली. मोठी चूक झाल्याचं मान्य करून ती एकदा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत सांगत असतानाच बायकोने पाहीलं आणि ती जे फणका-यानं निघून गेली ती आजवर आलेली नाही. आता एखादीची समजूत काढली तर माझं काय चुकलं ?
आता बायकोला तरी कसं दुखवायचं म्हणून तिच्या घरी गेलो. तिच्या विनवण्या केल्या..समजावून सांगितलं पण छे !!
मी निराश होउन बाहेर आलो.
समोरच्या दुकानात एक दोरखंड विकत घ्यायला गेलो तर तिथं सातवी भेटली
मग रिक्षाच्या आठवनी निघाल्या..
ओळखीचा कार्यक्रम पार पडला..
मी माझी कथा सांगितली. तिची मला सहानुभूती मिळाली. लवकरच आम्ही प्रेमात पडलो आणि आळंदीला.. पळून जाण्यात श्रम वाया जातील असा माझा विचार असल्याने.. रिक्षात बसून जाऊन लग्न केलं.
लग्नानंतर फिट राहण्यासाठी बॅडमिंटन सुरू केलं.. तिथं पुन्हा "ती " भेटली.
पुन्हा ते दिवस आठवले.
आता आधीच्या बायकोलाही पश्चात्ताप होतोय,
घराजवळचीही सारखी फोन करते..
मित्राची बहीण घरी वगैरे येते..
सतत फोन येतात.
बायको मला समजून घेत नाही. या सर्वांना मी हवा आहे पण त्या एकमेकींना पाण्यात पाहतात. त्यांच्या त्या मत्सराने माझ्या घराला आग लागलीये. बायको जगू देत नाही, आणि या सहा जणी मरू देत नाहीत. सगळ्या जणी म्हणतात तू बाकिच्यांना सोड...
हे कसं शक्य आहे ? मी काय करू ?
मला काहीच समजत नाही...
मला सल्ले हवे आहेत... .. प्लीज, प्लीज, प्लीज, इटस अर्जंट !!
विनोदी लेखन ?
विनोदी लेखन ?
अरे हो चुकलंच... कुनाशी तरी
अरे हो चुकलंच... कुनाशी तरी बोलायचय असं वाचावं... टेन्शन मधे चूक झाली
रिक्षात सहा जण बसतात पण आठ तर
रिक्षात सहा जण बसतात पण आठ तर बसतातच. तर मी ज्या रिक्षात बसलो होतो त्यात सात सुंदर मुली आणि मी बसलो होतो. >>>>
भाग्यवान आहात ! आमच्या अक्ख्या आयुष्यात असला प्रसंग कधी आला नाही !
बायको जगू देत नाही, आणि या सहा जणी मरू देत नाहीत. सगळ्या जणी म्हणतात तू बाकिच्यांना सोड... >>>>
कॄष्णाला सोळा सहस्त्र होत्या, त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आणि लढा.. 
जरा अतीच भाग्यवान आहात !
मला प्लीज सल्ले द्या.. आधी
मला प्लीज सल्ले द्या..
आधी इथं लिहायची आयडियाच नव्हती.. पण
http://www.maayboli.com/node/11779
इथं क्लिक केलं आणि प्रेरणा मिलाली. मी आबा री आहे या बाफचा
वत्सा...... लवकरच तुझ्या
वत्सा...... लवकरच तुझ्या आयुष्यात आठवी येणार आहे.........
आणि त्या आठवीला प्रत्यक्ष भेटण्याआधी तुला "सात खून माफ" आहेत. मग गड्या, बघतोस काय..... कामाला लाग....... आठवड्याच्या सात वारी सातही जणींचा खून कर......
बरोबर आठव्या दिवशी तुला तुझी "आठवी" येऊन भेटेल........
वरील उपाय माझ्या "मित्राने" करून पाहिलाय..... तू जर तुझ्या "त्रस्त मित्राचा" संपर्क क्रमांक दिलास तर मीही त्याला माझ्या मित्राचा संपर्क क्रमांक देईन..........
काय भुंग्या, आठवड्यात सात वार
काय भुंग्या, आठवड्यात सात वार नसतात का ? हाकानाका !!!
अरेरे ! आमच्या
अरेरे !
आमच्या प्रेरणास्थानावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. माझ्या समस्येबाबत माबोकर गंभीर नाहीत का ? खूप मोठ्या अपेक्षा ठेवून मी इथं आलो होतो - इति मित्र.
फक्त सहा , अजुन प्रयत्न करा ,
फक्त सहा , अजुन प्रयत्न करा , लक्षात ठेवा माबोवर २४ आकडा आला तरच दखल घेतली जाते.
किरण, तुझा मित्र फार भाग्यवान
किरण, तुझा मित्र फार भाग्यवान आहे. त्याला सांग निराश होऊ नकोस! तब्बल ७ मुलींना, त्या ही सुंदर... तो आवडतो, म्हणजे त्याच्यावर शुक्रदेवाची कृपादृष्टी आहे... सगळ्यांना लग्नाला तयार करायचा प्रयत्न करुन पहा... (असे मित्राला सांगा) जर त्या तयार झाल्याच, तर धर्म बदलून सगळ्यांशी लग्न करायला सांगा. माबोवर या विषयावर एक बाफ आहे, तो शोधून वाच म्हणावं त्याला... भुंग्याचा सल्ला अजिबात मानू नका... ७ खुन तो एकवेळ करेल, पण ते माफ होतीलच, याची खात्री नाही. तेंव्हा जपून... श्रीं चा सल्ला मात्र मान म्हणावं... तुझ्या मित्राच्या दु:खात सहभागी आहे.
(No subject)
किरण्यके, तुमच्या मित्राचं
किरण्यके, तुमच्या मित्राचं एवेअज झालेलं दिसतय. एकाच वेळी अनेक जणींशी.
चालू देत. श्रीने म्हटल्याप्रमाणे अजून बराच पल्ला गाठायचाय. वाहनं बदलून बघा. उपेग होतोय म्हन्त्यात!
अरेरे दोन दिवस झाले अजुन
अरेरे दोन दिवस झाले अजुन म्हणावे तशे प्रतिसाद नाही आलेत.
श्शी...आज पुन्हा टायपायचं काम.
.
.
.
.
.
.
.
.
.
[ ती सर्व आयड्यांच्या 'पासवर्ड' ची डायरी शोधावी लागेल]
रिक्षासोडा बस पकडा.... मग
तुम्ही जिंवत आहत हेच तुमचे
तुम्ही जिंवत आहत हेच तुमचे चुकले.........
आत्महत्या करा...............आणी स्वर्गात जाउन उरलेले अप्सरानां गटवा...................
चोवीस चा आकडा ऐकून मित्राचे
चोवीस चा आकडा ऐकून मित्राचे डोळे पांढरे झालेत..
(No subject)
चोवीस चा आकडा ऐकून मित्राचे
चोवीस चा आकडा ऐकून मित्राचे डोळे पांढरे झालेत.. >>सांभाळा त्याला आणखी थोड्यावेळाने 'आकडी' येईल.
किरण रिक्षा फिरवू नका. गाडी
किरण रिक्षा फिरवू नका. गाडी घ्या
तुमचे वाचुन तुम्हाला रिक्षा
तुमचे वाचुन तुम्हाला रिक्षा नाही..............बस च घ्यावी लागेल................. अजुन प्रवाशी भरती होतील बस मधे प्रयत्न केलात तर...............
पुनःश्च हरी ओम
पुनःश्च हरी ओम
अजिबातच विनोदी नाही वाटले.
अजिबातच विनोदी नाही वाटले. तुमचे इतर लिखाण वाचुन तुमच्याकडुन अपेक्षा वाढल्या आहेत बहुदा..