विनोदी लेखन

सावळा गोंधळ

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 12 February, 2011 - 14:42

कदमाचा बाब्या धापा टाकतच आला. एकानं विचारलं," काय जालं रं?"
धापा टाकतच तो म्हणाला," आवं लौकर चला कि तिकडं. त्यो शिरप्या नव्हं कां? त्यो पडलाय हिरित."
सगळ्यांनीच एकदम वळून पाहिले.

साधारण सातची वेळ. मारुतीच्या समोरच्या पारावर गावकरी निवांत बसलेले. माघ महिना संपत
आलेला, तरीहि,संध्याकाळची थंडी कमी झालेली नव्हती. शेतातली कामं जवळपास संपलेली होती. त्यामुळे
थोडा निवांत वेळ होता. कुणी घोंगड्या पांघरून, कुणी शेकोटी पेटवून तर कुणी बिड्या फुंकत गप्पा मारत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्यसनाधीनतेकडून व्यसनमुक्तीकडे

Submitted by सानी on 8 February, 2011 - 08:11

प्रेरणा:-पंतांचा धागा: मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

लग्नापूर्वी-सगळे अलबेल असतांना:

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

लग्नानंतर दारुड्या झालेल्या आणि वेगळ्यात धुंदीत रहाणार्‍या नवर्‍याविषयी बायकोचे मनोगत:

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

नवर्‍याचे त्यावरचे उत्तर:

साकीसे मुहोब्बत होती हैं
हर रोज शिकायत होती हैं
पिने को मेरे पिना ना कहो
युं भी तो इबादत होती हैं

गुलमोहर: 

शाळा : नसलेली कादंबरी.

Submitted by A M I T on 4 February, 2011 - 05:45

मध्यंतरी मिलिंद बोकील यांची "शाळा" कादंबरी वाचनात आली. साहजिकच माझ्या शालेय जीवनातील आठवणी चाळवल्या आणि आज किबोर्डावर बोटांची "चाळवाचाळव" करून त्या तुमच्यासमोर मांडतोय. कमी-अधिक फरकाने माझ्या या आठवणी तुमच्या शालेय आठवणींशी साधर्म्य राखतील, अशी आशा आहे.

गुलमोहर: 

ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

Submitted by मामी on 2 February, 2011 - 13:03

जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपले
तोची ड्युआय ओळखावा
भाव तेथेची जाणावा ||

वरील पंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे अनेक ड्युआयडी सांप्रतकाळी मायबोलीवर कार्यरत आहेत.

अवचिता परिमळू
ड्युआयड्यांचा सुकाळू
मी म्हणे गोपाळू
झाला गे माये ||

कोणा ओरीजिनल कर्त्याकरवित्याच्या हातात या ड्युंच्या दोर्‍या पक्षी पासवर्ड असल्याने ते नाचवतील तेथे जाऊन हवा तसा प्रतिसाद देणे हेच ड्युंचे जिवीतकार्य.

तुच घडवीशी तुच मोडीशी
कार्य करवीशी तू, तूच मारीशी
हित तुझे तू यात साधिशी
मुखी कुणाच्या देशी लोणी
कुणा मुखी अंगार ||

ड्युआयड्यांचा जन्मच याकरता झालेला असतो. किंबहुना,

गुलमोहर: 

माझ्या बंधु आणि....

Submitted by किश्या on 2 February, 2011 - 01:33

लहानपणाच्या आपल्या भरपुर काही आठवणी असतात काही गोड तर काही कडु तर काही मजेशीर, आणी काही घटना अश्या असतात तिथे आपल्याला काहीच करता येत नाही,ज्यात कि आपली फजीती होते..

अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडुन गेली होती. पण ती माझ्या मनावर कायम कोरली गेली आहे मी त्या गोष्टीला कधीही विसरणे शक्य नाही. तर झालं अस की....

गुलमोहर: 

गगोकरर्स येती स्वप्नी माझ्या....

Submitted by स्मितू on 29 January, 2011 - 03:31

असेच एकदा नेट वर फेरफटका मारतांना मायबोलिचे दर्शन झाले... मायबोलीवर लेख, कविता वाचतांना

गुलमोहर: 

सर्दी- एक वाहता अनुभव

Submitted by प्रज्ञा९ on 26 January, 2011 - 11:51

आक्छ्यी!!!आक्छ्यी....आक्छ्यी..!!!!!...........

एका सुखद वीकांताच्या सुसकाळी मी ६ शिंकांची सलामी दिली. सर्दीने वाजतगाजत आपल्या मुक्कामाची वर्दी दिली.
खरंतर सर्दी माझी खूप जवळची, जुनी मैत्रीण आहे. आली की ४-५ दिवस खूप लाडाने पाहुणचार करून घेतेच ती! पण सायनस ची पीडा म्हणून आली तरी सायलेंट मोडवर असते. म्हणजे डोकं जड, नाक ब्लॉक झालेलं, आवाज खर्जात गेलेला असा प्रकार असतो. शिंकांची फैर वगैरे नसते कधी. याच वेळी कय बाई हे नवीन, म्हणून मी विचारात पडले!

गुलमोहर: 

लेखकाचे घर असावे शेजारी

Submitted by भरत. on 26 January, 2011 - 06:36

नेहमीप्रमाणे अकरा महिन्यांनी आमची गृहदशा बदलली. ती बदलली की पत्रिकेतले शेजारग्रहही ओघाने बदलायचेच. तसं ते फ़ारसं कधी जाणवायचं नाही, कारण दोन दोन दारांच्या, टाइट्ट शेड्युलच्या (काम आणि टीव्ही दोन्हीची बरं) आणि मी माझ्यापुरता या अ‍ॅटिट्युडच्या कडेकोट बंदोबस्तातून `इकडून तिकडे गेले वारे’ इतके म्हणण्याएवढीही फ़ट कशी ती नसायची. त्यामुळे नव्या घरात प्रविष्ट झाल्याच्या संध्याकाळीच आमच्या द्वारघंटिकेवर कुणीतरी अंगुलीप्रहार केल्याने नवल वाटतच दार...नाही दारावर दारे उघडली, तर मध्यमवयाकडून ज्येष्ठतेकडे म्हणजे काकी ते आजी या मधल्या स्टेशनावरच्या एक बाई दारात चक्क सस्मित उभ्या. आणि त्यांनी काय म्हणावे?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सरकार राज

Submitted by चिमण on 24 January, 2011 - 12:58

सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्‍या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता.

गुलमोहर: 

“भगवा, हिरवा की लाल?...” कॉमेडी शो!

Submitted by विनायक_पंडित on 22 January, 2011 - 09:40

आठवडाभराचं रूटीन संपलं की माझ्यासारखा माणूस आख्ख्या देशाचं नव्हे तर जगाचं ओझं आपल्या डोक्यावरून उतरल्यासारखा जे तंगड्या वर करतो ते रविवारी रात्री नको तेवढ्या आरामामुळे तंगड्यांची चाळवाचाळव होत राहिली की खरय़ा अर्थाने जागा होतो असा माझा एक समज झालाय.तेव्हा त्याला मग काय काय आठवायला लागतं.काय काय जाणीवा व्हायला लागतात.कसले कसले साक्षात्कार व्हायला लागतात.आपली स्वप्नं साक्षात्कारांसाठीच आंदण दिली गेली आहेत असा काहीतरीही माझा आणखी एक समज त्यावेळी होत असतो.मी तो करून घेत असतो असं म्हणूया.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन