विनोदी लेखन

फेक प्रोफाईल्स अन्याय निवारण समितीची स्थापना

Submitted by Kiran.. on 15 April, 2011 - 11:42

मित्रहो

आज आपण या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जमलेलो आहोत यावरूनच आजच्या सभेचं गांभीर्य लक्षात येतं. ( कोण ते म्हणतंय दहाच टाळकी दिसतात म्हणून ).
तर मंडळी नेट आणि फेक प्रोफाईल्स यांच अतूट असं नातं आहे. जसा व्हिलनशिवाय सिनेमा नाही तसं आपल्याशिवाय महाजाल नाही. ( उपमा चुकली का ?)
मंडळी
आपल्याच मुळे कित्येक संकेतस्थळांची संख्या वाढताना दिसते. आपल्याच जोरावर त्यांना जाहीराती मिळतात, लोकमान्यता मिळते, धागे प्रवाही होतात, काही जणं तर रातोरात स्टार होतात.
पण आपल्या हाती काय पडतं ?
अवहेलना, हेटाळणी, कुत्सित शेरे आणि टोमणे !

गुलमोहर: 

अकलेचे तारे

Submitted by Sanjeev.B on 13 April, 2011 - 02:27

माझं पहिलं इंटरव्यु आठवलं कि हसुच येतं. नित्य नेमाने सोमवार आणि बुधवार Times of India पारायण करत होतो (ही सवय आजही आहे). कात्रणे कापत होतो आणि अर्ज करत होतो. स्टेशनरी वाल्या कडे एन्वेलोप आणि स्टँप घ्यायला जात होतो, तर तो मना मध्ये विचार करत असणार, कुठे मिळत न्हाय वाटतं ह्याला. असेच पारायण करता करता एके दिवशी एक छोटी जाहिरात दिसली, Reqd 12th pass out candidates for clerical work, walk in with your bio data. पत्ता बघितलं, घरा पासुन अवघ्या १० मिनीटांवर होती, तिर्थरुपांना जाहिरात दाखवलं आणि सांगितलो जाऊन येतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टॅलेंट सर्च!

Submitted by आशूडी on 8 April, 2011 - 06:39

दार उघडण्याची क्षणभरही वाट न बघता 'खडकट कटखड खडकट कटखड' असा कडीचा सतत आवाज येऊ लागला, की समजावे शाळेत काहीतरी दवंडी पिटलेली आहे आणि ते सांगायला मनूबेटाच्या ओठात शब्द आता थांबू शकत नाहीयेत! तिसरीच्या मुलीकडे इतकं काय असेल महत्त्वाचं सांगण्याइतकं? हा प्रश्नच आता मी विसरुन गेले आहे. धावतच दार उघडलं. शू रॅकच्या डोक्यावर डब्याची पिशवी ठेवत बूट मोजे काढताना प्रादेशिक बातमीपत्र सुरु झालं.

गुलमोहर: 

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

Submitted by पाषाणभेद on 7 April, 2011 - 14:56

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

आधीचे तीन भाग:
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (दोन भाग एकत्र: १/४/ व २/४)

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग३/४)

पुर्वसुत्र: वगनाट्याच्या प्रथम प्रवेशात आपण वाचले आहे की - पहिल्या भागात पारंपरीक गण होतो. दुसर्‍या भागात बतावणी होते. त्यात पेंद्या, किसनदेव गौळणींना अडवतात, छेड काढतात. कराच्या रुपाने गौळणींच्या नाचाची मागणी करतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

Submitted by पाषाणभेद on 6 April, 2011 - 16:34

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

आधीचे भाग:
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१ व २)

(मंडळी काही खाजगी अन काही ऑफीशीअल कारणांमुळे 'देश प्रेमाला पुरत नाही' या वगनाट्याचा पुढील भाग लगोलग लिहीणे जमले नाही त्याबद्दल मी दिलगीर आहे. वेळात वेळ काढून खास आपल्या मनोरंजनासाठी हे वगनाट्य आता पुर्ण केले आहे. वाचनात सातत्य रहावे अन सर्वांना वाचन करणे सोईचे व्हावे म्हणून मी पुढील दोन भागात आज व उद्या प्रकाशीत करत आहे.)

==================
पुर्वसुत्र:

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असेल हिंमत तर...

Submitted by ऋयाम on 5 April, 2011 - 14:13

एक तरुणी प्रवाहाच्या विरोधात,
आव्हान शेकडो लोकांचं.
'सिग्नल' नुकताच 'सुटलेला',
आव्हान 'पार' होण्याचं!

सिग्नल पडलेला असताना, सगळ्या गाड्या थांबलेल्या असताना, झेब्राक्रॉसिंगवरून काय बारकं पोरगंही रस्ता क्रॉस करील. भर गर्दीच्या रस्त्यावर, सगळ्या गाड्या आपल्याच दिशेने भरधाव चालून येत असता, केवळ 'हिमतीच्या' जोरावर त्यांना ओलांडून, 'चालत' रस्ता पार करून दाखवेल तो खरा! आपलं, ती खरी!
रस्ता पार करताना तिच्या मनातली भावना म्हणजेच "असेल हिंमत तर, चालवा!"

बाकी आपल्या भारतीयांच्या हिमतीला दाद द्यावी तितकी थोडीच!

गुलमोहर: 

मी आणि बीपी

Submitted by निशदे on 3 April, 2011 - 22:37

"मला हाय बीपी dignose झाले आहे."

आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला.

पण या प्रस्तावानेकडे येण्याआधी अगदी जवळच्या भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे.

१५ दिवसांपूर्वी:

गुलमोहर: 

असेही एक "एप्रिल फूल"

Submitted by किंकर on 31 March, 2011 - 22:46

असेही एक "एप्रिल फूल"
मी एक जागरूक पुणेकर या नात्याने,सर्व कामे बाजूला ठेवून,चहा बरोबर पेपर वाचत होतो.काही प्रमुख बातम्यावरून नजर फिरवली आणि त्यावरील प्रतिक्रिया देण्या साठी हिला हकनाक हाक मारली.
कारण बातम्या होत्याच तशा सनसनाटी.....
चितळे बंधू मिठाईवाले यांनी पुण्यात स्वतःच्या १०० शाखा सुरु करण्याचे ठरवले. पाश्चिमात्य बाजार पेठेस अनुसरून मुख्य दुकान यापुढे २४*७ असे पूर्णवेळ ग्राहक सेवा देणार ...सकाळ पुणे.
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... महाराष्ट्र टाईम्स मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

’पुरुष’मय स्वप्न!

Submitted by मणिकर्णिका on 31 March, 2011 - 08:45

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.

गुलमोहर: 

क्रिकेट फिव्हर

Submitted by मी_मै on 30 March, 2011 - 03:07

आताच, ढकल पत्रातून आलेले काही. हे या आधी येथे आलेले असेल तर क्रुपया उडवावे.

ATT00001.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन