जाहिरात

Submitted by राजेश्वर on 26 April, 2011 - 01:06

जाहिरात कोठे लावतील याचा काही नेमच राहिला नाही, मंदिराच्या समोर एक विध्युत खांब होता त्यावर उंच कापडी फ़लक लटकत होता, फ़लक हवेने डुलत होता. त्यावर जाहिरात होती नो डोनेशन, त्वरीत अ‍ॅडमिशन, लिओ किडस. मला जाहिरात लावणार्‍याचे हसु आले.आश्चर्य वाटले विघ्युत खांबावर शाळेची जाहिरात! आणी इतक्या वर, दुसरी जागाच यांना सापडली नाही? अ‍ॅडमिशन घ्यायची असती तर अधिक माहितीसाठी खांबावर चढावे लागले असते.

जालना महामार्गावर रोडच्या कडेला एक चांभार आपले दुकान थाटुन बसला होता. बाजुला "विशाल शुज" नावाची पाटी पेटीला टेकुन ठेवली होती त्याचा आशावादी दृष्टीकोन भावला अन हसवुन गेला.

एका चहाच्या टपरीवर एक जहिरात दुसर्‍या जाहिराती मध्ये चहा साखरे सारखी पुर्णपणे मिसळली होती. व्यंकटेश देशपांडे स्पोकन
ऑप्टीकल्स इंग्लीश क्लास
ते देशपांडे स्पोकन इंग्लीश क्लास आणी व्यंकटेश ऑप्टीक्ल्स आहे हे तेथे चहा घेतल्यावरच कळते (असेल बिझनेस ट्रिक).

कंपनीच्या समोर एक जाहिरात वाचली "अमर लॉज"झोपण्याची उत्तम सोय. कशाला लोक या अमर लॉज मध्ये जातील?

आता कटिंगच्या दुकानात एक जाहिरात "भटजी पाहिजे?" भेटा ९९९९२२२२३५. एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ हे मनोमन पटले.

एका राजकिय पक्षाने हाय कोर्ट समोर डिजीटल पोष्टर वर लिहिले होते "तोंड वाजवुन जर काम होत नसेल तर तोंडात वाजवुन काम करु"

गुलमोहर: 

आता कटिंगच्या दुकानात एक जाहिरात "भटजी पाहिजे?" भेटा ९९९९२२२२३५. एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ हे मनोमन पटले... Lol

<<बाजुला "विशाल शुज" नावाची पाटी पेटीला टेकुन ठेवली होती त्याचा आशावादी दृष्टीकोन भावला अन हसवुन गेला.<< विशाल शुज...
Lol Lol

भारी लिहिलय राजेश्वर!!

सांगवीतल्या स्मशानभुमीतल्या इलेक्ट्रीक खांबावर दशक्रिया विधीसाठी भटजीचा मोबाईल नंबर दिलेला आहे.... लोकांना कुठे जाहिरात करायची ते बरोबर माहित असतं! Happy