"छे!गेली १० वर्षं गाडी चालवतेय,पण असलं भयानक ट्रॅफिक बघितलं नाही कधी!"
मी जामच वैतागले होते. आईपण कशीबशी माझ्या मागे जीव मुठीत धरून बसली होती.
तशी मी भित्री नव्हेच, किंबहुना शूरवीरच म्हणायला हवं मला, पण आज मी हात टेकले! खरं म्हणजे गाडी चालवायचा परवाना नसताना पुण्यासारख्या ठिकाणी मी व्यवस्थित ड्राइव्हिंग केलं होतं, तेही १७ व्या वर्षी. मस्तपैकी रस्ता-बिस्तापण चुकले होते, पण त्यातलंही थ्रिल(?) एन्जॉय केलं होतं. आईला हे समजलं तेव्हा तिने चांगलीच हजेरी घेतली होती माझी!
***********************
पण नाशिकचं ट्रॅफिक बघुन मात्र ती चकित झाली होती.
"इथे शिस्त कशी ती नाहीच! त्यातून हा पुणा-नाशिक हायवे! जीव थार्यावर नसतो घरी परतेपर्यंत."
माझ्या ड्राइव्हिंगवर वर आईचा खूप विश्वास. मी नीट सांभाळून गाडी चालवते असं तिचं मत. (खरंच आहे ते!)मी जेव्हा कायमचा परवाना काढायला RTO मधे गेले होते तेव्हा तिथल्या एजंटने सहज विचारलं होतं, कुठे कुठे गाडी चालवलीय म्हणून. मी बिन्धास्त सांगितलं होतं, पुण्यात चालवल्याचं.
"हो ना!मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गाडी चालवाल!"
पुण्यातलं ट्रॅफिक अतिशय बेकार असल्याचं अनेक पुणेकरांनीच कबूल केलं होतं..
आज हे सगळं आठवलं कारण आज अगदी पडता पडता वाचले मी. सिग्नल वगैरे आपल्यासाठी नसतातच असा इथल्या रिक्क्षावाल्यांनी ग्रह करून घेतला असावा. मला हिरवा सिग्नल मिळल्यावर मी निघाले तेव्हा शेजारून एक रिक्षावाला सुसाट गेला. वर पुन्हा मलाच काहीतरी बोलून गेला.
मी गाडी थांबवली नि सरळ ट्रॅफिक पोलिस शोधून त्यांना विचारलं.
"काय सांगू म्याडम, आहो यातल्या येकाला जरी आमी पकडलेलं कळलं तरी कोन्तातरी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरतोच बगा! आमी तरी काय करनार? आमालाबी फ्यामिली न् पोरंबाळं हायेत."
या उत्तरावर मला पुढे काही सुचेचना. मी शांतपणे गाडीला किक मारली. आई आणि मी घरी निघालो. ती बिचारी माझी समजूत घालत होती. मागे बसून मधेच वहातुकीचं धावतं वर्णन करत होती.
"...थांब, मागून व्हॉल्वो येत्येय, ती जाऊदेत.."
"..अगं अगं, जरा हळू घे! समोर बघत्येस ना?"
"लाल सिग्नल आहे, लक्ष आहे ना?.."
शेवटी, "घे! तूच चालव आता!!"असं मी म्हटल्यावर ती शांत झाली. कारण तिला माहिती होतं, तिने नुसती किक मारायचा प्रयत्न केला असता तरी आसपासचे ४ लोक गोळा झाले असते.
या सगळ्या गोंधळातून वाट काढत, २५ च्या स्पीडने मी गाडी चालवत होते, नि आई मात्र वाणसामानाच्या पिशवीचं टोक, पदर आणि जीव मुठीत घट्ट धरून बसली होती!
घरी आलो तेव्हा मला जाणवलं, माझ्या हातांत आणि पायांतही गोळे आले होते!
**********************************************************
माझं माबोवरचं पहिलंवहिलं लिखाण. बाकी सगळ्यांची रंगीत पानं खणताना स्वतःचं पण काहीतरी असावं म्हणून, कुठेतरी विस्मरणात गेलं होतं ते शोधून पुन्हा कॉपी-पेस्टून आणलं वर. 
छान आहे. लिहीत रहा
छान आहे. लिहीत रहा
प्रज्ञा, लेखन वाचलं नाहीये
प्रज्ञा, लेखन वाचलं नाहीये अजून पण 'licence' नव्हे, तर ' license'. तेवढी चूक सुधार.
सुधारते. पन मी माझ्या खर्र्या
सुधारते.
सुधारून समदं मराठीतच लिवते झालं! 
पन मी माझ्या खर्र्या परवान्यावर बघूनच लिवलंय त्ये स्पेलिंग!
चांगलं लिहिलसं. रच्याकने ,
चांगलं लिहिलसं.
रच्याकने , मला वाकडं बसुन , जोरजोरात स्पिकर लावुन , गळ्यात रुमाल बांधुन रिक्षा चालवायला आवडेल .
चांगल लिहीलय. पु ले शु.
दरवर्षी देशात जातो तेव्हा ट्रॅफिक आणखिनच भयाण झालेला जाणवतो
आता देशात गेले की गाडी, टु व्हिलर चालवणे साफ बंद केलय. खरतर ड्रायव्हिंग खुप आवडतं पण ५-६ आठवड्यांसाठी जाणार आणि त्यात काही झालं तर कशाला? म्हणुन बंद.. घरच्यांचा पूर्ण विरोध
British Spelling - licence
British Spelling - licence (noun), license (verb)
American Spelling - license (noun), license (verb)
तर आपण मग ब्रिटीशच वापरूया
तर आपण मग ब्रिटीशच वापरूया ...
ह्या अमेरिकन्सना खरेच काय गरज होती बरे उगाच स्पेलिंग्स बदलण्याची ?
भारतीय कायदे ब्रिटीश
भारतीय कायदे ब्रिटीश ज्युरिसप्रुडन्स वर आधारित असल्याने भारतात गुंडांची आणि मवाल्यांची इंग्लिश कायद्यात वापरीत नाहीत. licence च बरोबर आहे.
छान लिहिलय. मुंबईत इतकी गर्दी
छान लिहिलय. मुंबईत इतकी गर्दी असूनही, ट्राफिकला खरेच एक शिस्त असते.
रच्याकने, परवा नैरोबीतले ट्राफिक इतके भयानक होते कि पाच वाजता शहराच्या एका टोकाकडून निघालेला माणूस, रात्री साडेअकराला घरी पोहोचला. एरवी फक्त पाउण तास लागतो. कारण काय तर म्हणे जोडून आलेल्या सुट्ट्यांमूळे पेट्रोलचे टँकर्स पोहोचले नाहीत, कृत्रिम टंचाई निर्माण झाली, आणि परवा ते आलेय असे कळल्यावर, सगळ्यांना ते घ्यायचे होते.
नायजेरियात, बदागिरी एक्स्प्रेस हायवे वर ४० किलोमीटर अंतर कापायला, मला सहज ५/६ तास लागत.
तेवढ्या काळात, गाडीतून खाली उतरायला / काचा खाली करायला आम्हाला परवानगी नसे.
रस्त्यावर काहि विकत घ्यायची इच्छा झाली, तर सगळा व्यवहार खुणेने करायचा. त्याने वस्तू दाखवायची, बंद काचेआडून मी पैसे दाखवायचे, त्याने परत द्यायचे पैसे दाखवायचे. मग गाडीची काच वस्तूच्या कमीतकमी बाजू इतकीच खाली करायची, आणि मोजून १५ सेकंदात, हा व्यवहार पार पाडायचा.
खर असलेलं आणि सहजपणे लिहिलल
खर असलेलं आणि सहजपणे लिहिलल आवडलं !

पुणे तिथ काय उणे !
दिनेशदा,

पण तिथे एवढी खबरदारी घेण्याच कारण काय ?
इकडे मागे काही घटना भारतात घडलेल्या वाचल्या आहेत, त्या काही टोळ्या सापडल्या होत्या.
मग नायजेरिया म्हण्जे चोर्या,फसवणुक करणारे लोक अस आहे का ?
अनिल, लेगॉसमधे रहायला
अनिल, लेगॉसमधे रहायला गेल्यावर, ६ महिन्यात घरी चोरी झाली नाही... तर ती बातमी होते.
धन्यवाद सर्वांना!!
धन्यवाद सर्वांना!!