कॅफे सेन्ट्रल!
जंगली महाराज मंदिरासमोरचे एक इराणी हॉटेल! जे रात्री साडे बारा, एक पर्यंत व्यवस्थित चालू असायचे. इतर इराणी हॉटेल्सप्रमाणेच!
पुण्याच्या डेक्कन व आसपासच्या भागातील ती मजा, सहसा पुरुष लुटू शकतात, पण अफलातून मजा आहे.
महेशने चकार शब्दही तोंडातून काढला नाही मात्र नैनाला भयंकर शिव्या बसल्या. हे मंगळसुत्र अर्चना नावाच्या मैत्रिणीचं आहे ही थाप काही केल्या पचेना! कारण तसं असतं तरी ते आत्ता तिच्या जवळ का होत? ते मगाशी तात्यासाहेबांसमोरच पडलं असतं तर काय झालं असतं? मैत्रिणीने स्वतःसाठी विकत आणलेलं मंगळसुत्र तुझ्याकडे कसं काय? आणि ते जवळ ठेवून का वावरतीयस? यातल्या एकाही प्रश्नावर समर्थनीय उत्तर नव्हतं नैनाकडे! ती सांगत होती. अर्चनाने ठेवायला दिलं होतं! ती आज दुपारी मला भेटणार होती तेव्हा मी तिला ते परत देणार होते. ते खोटं, स्वस्तातलं आहे. ती बहुतेक पळून जाऊन लग्न करणार आहे.
गंभीरपणे घेण्यासारखे काहीही नाही यावर नैना आणि महेश दोघांचेही जवळपास एकमत झालेले होते. कारण जगतापांचा गिरीश जरी व्यवसाय सांभाळत असला तरीही नैना आत्ता कुठे अकरावी झालेली होती. आणि अजून दोन वर्षे लग्न करणेच बेकायदेशीर होते. त्या दोन वर्षांमध्ये त्या गिरीशला पन्नास स्थळे आली असती अन त्याचे चार हात झालेही असते.
आधीच ती एक षोडषा! त्यात सुंदर! त्यात आपल्याला आवडणारी! त्यात तिचा गाल तिच्याहूनही नाजूक! त्यात बसमधे अंधार! त्यात तिची परवानगी असणे! आणि त्यात आपण तिच्या गालावर किस करणे...
दुसर्या दिवशी सकाळपर्यंत पाणीही प्यायला नाही महेश!
न जाणो ओठांवर असलेले पुसट फीलिंग जायचे निघून!
त्याच्यासाठी आता जग अत्यंत सुंदर झालेले होते आणि दास्ताने वाडा हे नंदनवन!
त्या पहिल्या किसची जरा नीट आठवण वगैरे काढावी म्हणून तो चक्क एकटाच फिरायला बिरायला गेला पहाटेच! शनिवार वाडा, कसबा पेठ, लाल महाल वगैरे रपेट करून परत आला.
"पूर्ण चाळीसच्या चाळीस माणसे भरणार नसतील तर हा माने हा दास्ताने वाडा पेटवून देईल"
एक भयानक गर्जना करून मानेकाका सर्व जमलेल्यांकडे जिवा काटदरेच्या आवेशात पाहू लागले अन त्यांच्या त्या रौद्र रुपातली हवा पवार मावशींनी पार काढून टाकली.
"पेटव... बरीच वर्षं ऐकतीय वाडा पेटवण्याचं... पेटव आज"
वाड्यातला चार वर्षाचा मुलगाही त्यावर हसला. आता मोजणी सुरू झाली.
पवार मावशी - १
बेरी - ४
माने काका - १
पेंढारकर - २
कर्वे - ३
शिंदे - ३
अभ्यंकर आजी - १
नंदा - १
घाटे - ५
"घाटेंकडे पाच कोण?" - मावशींनी तेल ओतले.
सॉम, टॉम, एम.डी!
हे तीन शत्रूच इतके मोठे होते की बाबांचे रागावणे क्षुद्र वाटू लागले होते. पण कशी कुणास ठाऊक महेशला तीनही विषयांमधे बर्यापैकी गती होती.
अलंकार टॉकीजला उत्सवची पोस्टर्स लागली अन महेशच्या मनातून अमिताभ बच्चन खर्रकन खाली उतरला अन त्याची जागा भर्रकन रेखा या दाक्षिणात्य एव्हरसुंदरीने घेतली.
ही बाई अशी का वागत असावी हे काही वाडियातील फर्स्ट इयर डिप्लोमाच्या नवतरुणांना समजेना! एकतर डोळे फाडून ती पोस्टर्स धड बघता येत नाहीत, बघितली तर उडत उडत, 'माझे चुकून लक्ष गेले, मी सिग्नलकडे पाहात होतो' असे म्हणत म्हणत बघावी लागायची अन एकमेकांमधे काही बोलताही यायचे नाही त्याबद्दल! हो मग? उगाच कुणीतरी म्हणायचे 'हा मवाली आहे'!
समीरदादा बारावीत, राजश्रीताई अकरावीत, गट्टू दहावीत अन नैना नववीत!
एकेका यत्तेला एकेक बालक लाभलेले होते दास्ताने वाड्यातर्फे!
आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आपण बाबांना अन आजीला वाटेल ते बोललो, पण आपल्याला बाबांचा वाढदिवस कधी असतो हेही माहीत नाही? आपल्याला ते कधी विचारावेसेही वाटले नाही?
गट्टू - तुम्हाला कंटाळा नाही आला?
श्री - मला? हा हा हा हा! छे? कसला?
गट्टू - नुसत बसून राहण्याचा?
श्री - नुसता कुठे बसलोय? तुझ्याशी बोलतोय, तुला पाणी देतोय, औषध देतोय, बर्फी मागीतलीस ती आणली. उलट इथे बसून तुझ्याशी भरपूर बोलता येतंय, सगळा वेळ तुझ्याबरोबर घालवायला मिळतोय म्हणून मला आनंदच वाटतोय. नाहीतर नुसता पळत असतोस इकडे तिकडे!
गट्टू - बाबा, तुमची बोटं गेली तेव्हा... मी काहीच मदत केली नाही ना?
श्री - कित्तीतरी मदत केलीस! आणि मुख्य म्हणजे तू केवढासा होतास तेव्हा.. तू काय करणार?
गट्टू - पण... मी.. लक्षच दिलं नाही ना?
श्री - अरे वेडायस का? तू होतास... किती बरं...
गट्टू - आठ..