कादंबरी

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 20 October, 2010 - 08:14

पहिल्या वर्षी झालेलं दु:ख का कुणास ठाऊक, या वर्षी कुणालाच फारसं झालं नाही.

'चल मग, निघतो मी' असे करून एकेक जण रूम नंबर २१४ मधून बाहेर पडत होता.

ते वर्ष संपलं होतं! परिक्षा झालेल्या होत्या आणि तिसरं वर्ष चालू होऊन महिना झाल्यावर सुट्टी मिळालेली होती. दिवाळीच्या या सुट्टीतील संपूर्ण तीन आठवडे आपल्या घरात बसून काढता येतील या आनंदात सामानाची आवराआवरी चाललेली होती.

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2010 - 02:15

" ए... अरे.. तो ठोंबरे कुठेय??? हां... रूमवर ये लेका... वडील आलेत तुझे..."

मध्यरात्री एक वाजता फुल्ल चढलेल्या दिल्याच्या ग्रूपला होस्टेलवरच्या एका मुलाने अंधारात धावत धावत येऊन हे वाक्य ऐकवले तेव्हा चौघेही कंप्लीट टाईट झालेले होते. त्या मुलाला वन्याने 'जा जा, तू हो पुढे, आम्ही येतो' असे सांगून हाकून लावले अन मग त्याही परिस्थितीत चर्चा सुरू झाली...

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 18 October, 2010 - 02:21

साडे अकरा?????

ही काय उठण्याची वेळ? दोन वर्ग संपून तिसरा सुरू झाला असेल. आणि आपण आत्ता उठतोय??? आई गं!

'कराग्रे वसते लक्ष्मी' या तीन शब्दांऐवजी आत्म्याच्या तोंडात आयुष्यात पहिल्यांदाच हे विचार आले होते जागा होताना! आणि त्यातले शेवटचे 'आई गं' हे डोके दुखण्याला उद्देशून होते.

एक क्वार्टर??? आपण प्यायली?? काय झालंय आपल्याला? आणि... अगं आई गं! काय डोकं दुखतंय!

यालाच... यालाच हॅन्ग ओव्हर म्हणतात का?? याचसाठी प्यायल्यानंतर खायचे असते का? पिण्याआधी आणि नंतर, नंतर तर जवळ जवळ एक लिटर पाणी प्यायचे असते का? ते सगळे उपाय याचसाठी असतात बहुतेक!

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 15 October, 2010 - 04:48

"ते काय असं सांगण्यासारखं आहे होय???"

अशोकचे हे वाक्य ऐकून दिल्याने भडकून शिव्या घातल्या आणि म्हणाला...

"मी काय केलं होतं गगनबावड्याला त्याचं अगदी डिटेल वर्णन पाहिजे! आं?? आणि तुम्ही दोघं राजमाचीला त्या झुडुपात गेलात ते मात्र सांगण्यासारखं नाही... "

अशोक - अरे दिल्या... आईशप्पथ आम्ही हातात हात घेण्याशिवाय काहीही केलं नाही रे...

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2010 - 09:07

खंडुजी उमरे या माणसाला गो. नी. दाण्डेकरांनी खरच 'माचीवरचा बुधा' असे विशेषण लावले असेल का असा निरागस प्रश्न दिल्या सोडून सगळ्यांच्या मनात सततच येत होता.

झालं काय! की आत्म्याने बिंदिया नैन आणि तिच्या आठ मैत्रिणी, होस्टेलवरची किमान सोळा मुले आणि सापत्नीकर सर या सर्वांदेखत सांगीतले..

"मी सिगारेटी ओढायला तिथे जायचो, अचानक प्रकाशझोत पडल्यामुळे घाबरून पळालो, बाकी काही नाही"

आणि त्या प्रकरणावर कसबासा पडद पडणार तेवढ्यात शांभवी नावाची एक मुलगी पचकली!

"याच्या तोंडाला दारूचाही वास येतोय सर!"

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 11 October, 2010 - 07:16

बिंदिया नैन ही धाडसी मुलगी होती हेच त्याला माहीत नव्हतं!

नॉर्मली मुली आपल्या गप्प बसतात आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या मागे लागतात. पण ही होती सिलिगुडी येथे वास्तव्यास असलेल्या एका मेजरची मुलगी! ती बिनधास्तच असणार!

कधीकधी लाईट जातात आणि अभ्यासात खंड पडतो म्हणून तिने आज एक कमांडो टॉर्च विकत आणला होता आणि आपल्या रूममेट्सना दाखवत होती. रूममधे लाईट घालवून निर्माण केलेला प्रकाश तर भरपूर होता. पण उत्सुकता म्हणून 'हा प्रकाशझोत किती लांबवर जातो' हेही मुलींना पाहायचे होते आणि त्या तिघीही गॅलरीत आल्या होत्या.

आणि बिंदियाने सरळ आपला प्रकाशझोत टाकला की होस्टेलच्या मागच्या टेकडीवर!

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2010 - 05:28

डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळणारे पाण्याचे चार प्रवाह कोसळताना एका धबधब्यात मिसळणे व काही अंतर तसेच मिसळून पुढे वाहणे व आणखीन पुढे गेल्यानंतर आपापल्या मार्गात आलेल्या दगड धोंड्यांमुळे किंवा अडथळ्यांमुळे पुन्हा दिशा वेगवेगळ्या होणे....

.... अशी मैत्री होती रूम नंबर २१४ मधली!

मिसळण्याआधी न मिसळण्याचा प्रयत्न करता करता, मिसळल्यावर मात्र एकमेकांना एकमेकांचा रंग देऊन आणि एकमेकांचा रंग घेऊन वाहत होते आणि काही दिवसांनी वेगवेगळे होताना मात्र स्वतःच्या रंगात आमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवत वेगळे होणार होते .... आणि मग.... काही विशिष्ट कारणाने पुन्हा एकत्र येणार होते...

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 6 October, 2010 - 06:08

"काय तब्येत करून घेतलीयस रे नंदू"

आत्मानंदची आई एकटीच आत्म्याला नंदू म्हणायची! बाकी सगळे 'आत्मू' अशी हाक मारायचे. बहीण त्रिवेणी सोडून! ती दादा म्हणायची!

आत्मा घरात प्रवेशल्या प्रवेशल्या त्याच्या आजीने त्याला आंघोळ करायला पिटाळले. आणि त्रिवेणीने त्याचे सामान उघडायला सुरुवात केली. अत्यंत काळजीपुर्वक वागून आत्म्याने दारूची शंका सुद्धा येणार नाही अशी तयारी केलेली होती. अर्थातच दारू त्याच्या पिशव्यांमधे नव्हतीच! त्रिवेणी बघत होती की तिला काय आणलंय! आणि आंघोळ करून, सगळ्यांना नमस्कार करून आत्मा चहा घ्यायला स्वयंपाकघरात आल्या आल्या आईने हे वाक्य उच्चारले!

"काय तब्येत करून घेतलीयस रे नंदू"

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 5 October, 2010 - 08:00

गॅदरिंगचा परिणाम केव्हाच पुसला गेलेला होता. गॅदरिंगला आता सहा महिने होत आले होते. वन्याची सुमार कविता कुणी नीट ऐकलीही नव्हती! रूम नंबर २१४ वरचे उरलेले तिघे आणि दीपा बोरगे सोडून! आणि आत्मानंदला तर नावही नोंदवता आले नव्हते. त्याच्या दृष्टीने खूप विनोदी असलेली त्याची आचारसंहिता 'हे चालणार नाही कॉलेजमधे' या कारणास्तव केव्हाच नाकारण्यात आली होती संयोजन समीतीकडून! आणि त्यानंतर सहा महिन्यांनी कॉलेजमधील वातावरण खूप खूप वेगळे झालेले होते.

गुलमोहर: 

ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2010 - 08:40

अत्यंत गंभीर चेहरे धारण करून होस्टेलवरची सोळा मुले रूम नंबर २१४ मधे उभी होती. प्लस मूळचे त्या रूममधले चौघे होतेच! एका मुलाने एक चित्र काढलेले होते ते अशोकने लावलेल्या तीन चित्रांच्या बाजूला चिकटवून ठेवण्यात आले होते. चार सिगारेटी पेटवून त्या चित्राशेजारी उदबत्ती म्हणून खोचण्यात आल्या. निरांजन म्हणून काडेपेटीची काडी पेटवायची, दोन चार वेळा ओवाळायची आणि विझली की दुसरी पेटवायची या कामावर आत्मानंदची नेमणूक सर्वानुमते झालेली होती. कारण त्याचे वडील कीर्तनकार होते. अशोक सर्वात पुढे हातात एक रिकामी ओल्ड मंकची बाटली व एक चमचा घेऊन उभा होता. हे टाळ होते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी