२०३ डिस्को ही कादंबरी आता शेवटच्या काही टप्प्यांमधे पोचलेली आहे. कदाचित चार किंवा पाच भाग व्हावेत असे वाटते. सर्व वाचक व प्रतिसादकांच्या प्रतिसादांचे व सपोर्टचे अनेक आभार!
-'बेफिकीर'!
==============================================
आपले रत्न काय दिवे लावून आले आहे हे ललिताला माहीत नसल्यामुळे रेखाला डिस्कोवर आणण्याचा प्रस्ताव वगैरे तिने फारसा विचारात घेतलाच नाही. ते माहीत असते तर तर मुळीच घेतला नसता आणि उलट गजूला रात का राजावर पाठवून दमबाजी करण्याचा प्रयत्न केला असता.
साहू... रेश्मा... थापा...
२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २
आयुष्यात पहिल्यांदा साहू चौकीवर गेला होता. कुणी कुणी काय काय पाहिले याचा तपास चाललेला होता. ९५% भाजल्यामुळे संगीता अर्ध्या तासात गेलेली होती.
गोपी आणि शालन यांनी घेतलेले बौद्धिक अत्यंत आश्चर्यकारक होते. असे बौद्धिक तेच घेऊ शकत होते आणि ते समजण्यासाठी साहूसारखाच मुलगा योग्य होता. सुसंस्कृत समाजात वावरणार्या अन मोठे होणार्या मुलांना ते बौद्धिक म्हणजे एक जगाबाबतची शिवीगाळयुक्त घृणास्पद भडास काढणे वाटले असते. किंवा भांडण किंवा झापणे! पण ते बौद्धिक होते. अत्यंत मौलिक!
साहू आणि गोपी ही जोडी मस्त जमली होती. डिस्कोतून साहू गेला तेव्हा जेमतेम आठ वर्षांचा असेल. आता चांगला तेरा वर्षांचा होता. पुन्हा डिस्कोला येऊन सहा महिने होत आले होते. डिस्कोतील प्रवेश फारच रंजकपणे झाला होता. सुरुवातीला गंगाबाईला ललिताच्या परत येण्यात काहीही इंटरेस्ट वाटला नव्हता. खरे तर तिला आता ललिता नकोच होती. संगीताचे आनि ललिताचे भांडण अन मारामारी झाल्यामुळे साडे तीन, चार वर्षांपुर्वी ललिता बाहेर पडली होती. आता तर संगीताही रस्त्यावर उभी राहू लागली होती. ललिताला पुन्हा कोठ्यावर घेण्यात गंगाबाईला इंटरेस्ट तर नव्हताच पण तिचा कडाडून विरोधही होता. इस्माईलला अजूनही ललिता हवीच होती.
मुलाला जीवे मारावे अन नंतर आत्महत्या करावी हा विचार अतिशय स्वाभाविकपणे येत होता ललिताच्या मनात! कबीर सलोनीचा बाप नाही, त्याचा एक डोळा अॅक्सिडेंटमधे गेलेला आहे ज्यात सलोनीचाही पाय दुखावला गेलेला असून तिला जिना फार चढवत नाही म्हणून ती तळघरात राहते अन तळघरात तिच्या समोर दिसणार्या खोलीच्या आतमधे एक अतिशय व्यवस्थित खोली आहे. सलोनीवर अमजदचे प्रेम असल्यामुळे त्याने तिला पाळलेले आहे. सुनंदाने कधीही पळून जायचा प्रयत्न केलेला नव्हता आणि रमासेठ हा वेलकमशी किंवा अमजदशी असोसिएट असलेलाच माणूस असून पोलिसांच्या लफड्यातून वेलकमला वाचवणे हे काम तो मन लावून करतो.
सुनंदा - शरीफा.. हफ्तेभरके लिये ये कमरा देदेना.. मै पुरानी कमाईमेसे पैसे दुंगी..
शरीफाबीने यावर विचारपुर्वक होकारार्थी मान हलवली.
साहूने वीस रुपये आणल्याला आता चौदा दिवस झाले होते. बरोब्बर दोन आठवडे!
आया कशा चुकतात किंवा कधी चुकतात ते काही आयांना स्वतःलाच समजत नाही हा प्रॉब्लेम बर्यापैकी मोठा आहे.
आयुष्याच्या जडणघडणीच्या काळातच असले विलक्षण सरांउंडिंग असले तर? तुमच्या आमच्या मुलांसारखी कशी व्हायची मुले? चूक कोणाची? ललिताच्या नवर्याची? ज्याने मरण्याआधी ललिता व्यवस्थित जगू शकेल याची तरतूद केलेली नव्हती? की भानूची? ज्याने ललिताला पळवून इथे आणून विकले? भानूची चूक निश्चीतच आहे. पण असे बरेच भानू आहेत. पेपरात वेगवेगळ्या नावांनी असे भानू रोज वाचायला मिळतात. समजा त्यांना पकडून ठार मारले.. नवीन भानू नाही निर्माण होणार? काय गॅरंटी? सगळे भानू कसे सापडतील? सगळ्यांवरचे आरोप कसे सिद्ध होतील. 'ही मुलगीच चवचाल होती, त्याशिवाय हा माणूस असे करूच शकणार नाही' म्हणायला आपल्यातील किती जण तयार होतील?
साहूच्या मनावर विलक्षणच संस्कार होत होते. नग्नता त्याला त्याच वयापासून सभोवताली दिसत होती. स्त्रीला लाज वाटते किंवा वाटू शकते किंवा वाटायला हवी हे माहीतच नव्हते त्याला.
नाना साठे गाजलेला ग्राहक समजला जाण्याची दोन भिन्नच कारणे होती. केवळ मजा मारायला येणार्या अन पैसे फेकून जाणार्या अनंत ग्राहकांऐवजी नाना साठे पैसे तर द्यायचाच पण आठवणीने येताना काही ना काही भेटवस्तू आणायचा. अगदीच मौल्यवान नसली तरीही त्या काळातही पाच सहाशेची वस्तू असायचीच! पैसे वेगळे! आणि दुसरे कारण म्हणजे झोंबाझोंबी करून स्वतःला हवे तेवढे मिळवून निघून जाणे असे तो वागायचा नाही. त्याच्याबरोबर रत असलेल्या वेश्येला जणू आपण याची प्रेयसीच आहोत असा भास व्हायचा.
हा मुंगुस नावाचा साधारण तीस एक वर्षाचा माणूस पार तिकडूनच्या तिकडून येऊन आपले का लाड करतो हे साहूला समजेना!
गंगाबाईने 'साहू सात ते एक गल्लीत बसला पाहिजे' हा फतवा काढल्याला केवळ आठ दिवस झाले होते आणि त्या आठ दिवसात मुंगुसने साहूला तीनवेळा भजी अन एकदा चहा प्यायला दिला होता. आणखीन एक फायदा झाला होता. मुंगूसकडूनच हेही समजले होते की आपल्या आईला दोन नावे आहेत. ललिता.. आणि रेश्मा!
मैने भजी दिया ये रेश्माको बताया के नही?
क्या बोली रेश्मा कल? बोला उसको मै मिला था करके??